शमीचे रोप घरात लावण्याचा शुभ दिवस दिशा व फायदे
हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप शुभ मानले जाते. आपण पहिले असेल प्रेतक घरामध्ये तुळशीचे रोप लाऊन त्याची पूजा केली जाते. पण आपल्याला माहिती आहे का? तुळशीच्या रोपा सारखेच शमीचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते. शास्त्रा नुसार शमीच्या रोपाचे विशेष महत्व आहे व ते घरात लावणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की शमीचे रोप हे भगवान शिवजीचे अतिप्रिय रोप आहे.
The Shami Plant Benefits As Per Astrology can be seen on our YouTube Shami Plant Shami Tree Benefits As Per Astrology
शमीचे रोप घरात लावणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सुख-शांती राहते. आज आपण पाहू या शमीचे रोप घरात लावल्याने त्याचे काय फायदे होतात. त्याच बरोबर आपण पाहणार आहोत ते कोणत्या शुभ दिवशी लावावे व कोणत्या दिशेला लावावे. त्यामुळे काय फायदे होतात.
शमीचे रोप घरात लावल्याचे फायदे:
- शास्त्रा नुसार असे म्हणतात की घरात शमीचे रोप लावल्याने सुख समृद्धी येते व पैशाची कधी कमतरता होत नाही.
- घरात शमीचे रोप लावल्याने सर्व दुख दूर होऊन सुख समृद्धी येते.
- शमीचे रोप घरात लावल्याने वास्तू दोष दूर होऊन घरातील सर्व बाधा नष्ट होतात.
- हिंदू धर्मानुसार असे म्हणतात की घरात शमीचे रोप लावल्यास विवाहामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात.
- आपल्या घरातील कोणत्यासुद्धा व्यक्तिची साडेसाती चालू असेलतर शमीचे रोप घरात लावण्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
शमीचे रोप घरात लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
- असे म्हणतात की घरात शमीचे रोप लावताना शनिवार ह्या दिवशी लावंणे शुभ मानले जाते.
- दसरा ह्या शुभ दिवशी शमीचे रोप घरात लावणे शुभ असते. कारणकी दसरा हा दिवशी साडेतीन मुहूर्ता पैकी एक आहे त्यामुळे पूर्ण दिवस शुभ मानला जातो.
- आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की शमीचे रोप कधी सुद्धा घरात ठेवू नये घराच्या बाहेर मेन डोर जवळ किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर ठेवावे.
- समजा आपल्याला घराच्या मेनडोरवर शमीचे रोप लावायचे असेल तर आपण घराच्या बाहेर पडताना आपल्या उजव्या हाताच्या बाजूला पाहिजे.
- जर आपण टेरेसवर शमीचे रोप लावणार असालतर दक्षिण दिशेला लावावे. जर तसे संभव नसेलतर पूर्व दिशेला लावावे.
- आपण जसे तुळशीच्या रोपाची रोज पूजा करतो तसेच शमीच्या रोपाची पण रोज पूजा करून दिवा लावावा.
- शमीच्या रोपाचे हे 4 उपाय करून पहा त्यामुळे आपली परेशानी दूर होऊन शनिदेव प्रसन्न होतील.
ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रह आहेत त्यामध्ये शनि ग्रह हा न्यायाधीश मानला जातो. कुंडलीमध्ये शनिचा प्रभाव आपल्या जीवनावर डायरेक्ट होत असतो. त्यामुळे हे उपाय केलेतर शनिग्रह शांत होऊ शकेल.
- शनि भगवान वर शमीचे पत्ते अर्पित करा:
आपण शनि ग्रहचा दोष कमी करू इच्छिता तर शनिवार ह्या दिवशी शनि भगवान वर शमीची पाने अर्पित करा. त्यामुळे लवकरच शनि भगवान प्रसन्न होऊन आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतील.
- घरात शमीचे रोप लावा:
घरातील उत्तर-पूर्व च्या कोन्यामद्धे शमीचे रोप लावावे. कोणत्या सुद्धा शुभ दिवशी शमीचे रोप लाऊन नियमित त्याची पूजा करा. असे केल्याने शनिचा दोष निघून जाईल.
- गणेशजिंना अर्पित करा शमीची पाने:
गणेशजीची रोज पूजा अर्चा केल्याने घर-परिवार, नोकरी किंवा व्यापारामधील परेशानी दूर होतात. गणेशजीना दर बुधवारी शमीची पाने अर्पित करा. शमीची पाने दूर्वासारखीच गणेशजिना प्रिय आहेत. असे म्हणतात की शमीच्या रोपामध्ये भगवान शिव ह्यांचा वास आहे. म्हणूनच गणेशजिना शमीची पाने अर्पित करतात. शमीची पाने गणेशजिना अर्पित केल्याने आपली बुद्धी तेज होऊन घरातील अशांती नष्ट होते.
- भगवान शिव ह्यांना शमीची पाने अर्पित करा:
शमीचे रोप हे भगवान शिवजीचे अतिप्रिय रोप आहे. भगवान शिवजी ह्यांच्यावर जल अर्पित करताना त्यामध्ये शमीचे फूल किंवा शमीची पाने घालून अर्पित केली तर भोलेनाथ प्रसन्न होतात. व सर्व ग्रह शांत होतात असे म्हणतात. तसेच आपल्याला रोज हे करणे शक्य नसेलतर दर सोमवारी करावे.