मकर संक्रांति 2022 संक्रांतीचे स्वरूप, शुभकाळ व आपल्या राशि नुसार कोणते दान करावे
मकर संक्रांति ह्या वर्षी 14 जानेवारी 2022 शुक्रवार ह्या दिवशी आहे. मकर संक्रांति हा नवीन वर्षातील पहिलाच सण आहे. हिंदू लोक मकर संक्रांति हा सण अगदी मनोभावे साजरा करतात. हा सण महिला अगदी उत्साहाने साजरा करतात.
The Makar Sankranti 2022 Shubh Muhurat And What To Donate According To Your Zodiac Signs can be seen on our YouTube Makar Sankranti 14 January 2022
भारतामध्ये मकर संक्रांति हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा करतात. महाराष्ट्रात मकर संक्रांति म्हणून, पंजाबमध्ये माघी म्हणून, गुजरात मध्ये उतरायण म्हणून, उतराखंडमध्ये उतरायणी म्हणून तर केरळमध्ये पोंगल म्हणून. अश्या विविध नावांनी साजरा होतो.
मकर संक्रांति ह्या दिवशी आपल्या राशी नुसार दान धर्म केल्यामुळे काही अनिष्ट होत नाही तसेच भय व चिंता नष्ट होऊन त्यापासून बरेच लाभ होतात.
संक्रांतिचा पुण्य काळ: 14 जानेवरी 2022 शुक्रवार दुपारी 2 वाजून 28 मिनिट पासून सूर्यास्ता पर्यन्त
पर्व काळात द्यायचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळ गूळ, सोने, गाय, वस्त्र
मकर संक्रांतिचे स्वरूप काय आहे ते आपण पाहूया:
संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे.
तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा आहे.
कपाळावर केशरी कपाळावर टिळा लावला आहे. वयाने कुमारी आहे. हातात वासा करिता जाईचे फूल आहे.
उत्तरे दिशेकडून दक्षिण दिशे कडे जात असून नैऋत्य दिशेकडे पाहत आहे.
13 जानेवारी 2022 गुरुवार ह्यादिवशी भोगी आहे.
14 जानेवारी 2022 शुक्रवार ह्यादिवशी मकर संक्रांति आहे.
15 जानेवारी 2022 शनिवार ह्यादिवशी कींक्रांत म्हणजेच करिदिन आहे.
राशीनुसार कोणती वास्तू दान करावी:
मकर राशी व कुंभ राशी ह्यांनी काळे तिळ व जरूरतमंदना कंबळ दान करावी त्यामुळे राहूचा अशुभ प्रभाव दूर होतो.
मेष, तूळ, सिंह व मिथुन राशी ह्यांनी कंबळ दान करावी.
वृश्चिक, धनु व मीन राशी असणाऱ्यानी खिचडी व फळ दान करावी. ह्यामुळे शनिची प्रसन्नता प्राप्त होते.
वृषभ, कर्क व कन्या राशी ह्यांनी वस्त्र दान करावे. वस्त्र दान करताना जुने किंवा वापरलेले दान करू नये.