पुत्रदा एकादशी 2022 मुहूर्त, महत्व, मंत्र, पूजा विधि, लाभ व मंत्र
नवीन वर्षात पौष महिन्यात पुत्रदा एकादशी गुरुवार 13 जानेवारी 2022 ह्या दिवशी आहे. दरवर्षी पुत्रदा एकादशी पौष महिन्यात शुक्ल पक्ष ह्या तिथीला येते. पुत्रदा एकादशीच्या व्रताचे फळ हे त्याच्या नुसारच मिळते.
The Putrada Ekadashi 2022 Muhurta Mantra Puja Vidhi Labh can be seen on our YouTube Putrada Ekadashi 2022
पुत्रदा एकादशी ही शुभ मानली जाते. म्हणून ज्याना संतान नाही त्यांनी ह्या दिवशी उपवास करून संतान प्राप्तीची कामना करावी. त्यामुळे त्यांची मनाप्रमाणे इच्छा पुरी होईल. प्राचीन मान्यता अनुसार संसारामध्ये पुत्रदा एकादशी सारखे दुसरे कोणतेसुद्धा संतान प्राप्ती सारखे व्रत नाही. ज्याना संतान नाही त्यांनी ह्या एकादशीचे व्रत करावे.
दशमी म्हणजे आधल्या दिवशी सूर्यास्त नंतर भोजन करू नये व रात्री भगवान विष्णुचे ध्यान करून मग झोपावे.
पुत्रदा एकादशी ह्या दिवशी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठून रोजच्या क्रिया करून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्री विष्णु भगवान ह्यांचे ध्यान करावे.
जर शक्य असेलतर पाण्यामध्ये गंगा जल मिक्स करून त्या पाण्यानि स्नान करावे.
पुत्रदा एकादशी ह्या दिवशी श्री विष्णु भगवान ह्यांच्या फोटो समोर दिवा लाऊन व्रत संकल्प करून कलश स्थापना करावी.
मग कलश लाल रंगाच्या कापडात गुंडाळून त्याची पूजा करावी,
भगवान विष्णु ह्यांच्या प्रतिमाला स्नान घालून नवीन वस्त्र घालावे.
मग दिवा अगरबत्ती लाऊन पूजा करून फळ व नेवेद्य दाखवावा.
त्यानंतर विष्णु भगवान समोर फूल, फळ, नारळ, पान सुपारी, लवंग, बोरम आवळा अर्पित करावे.
एकादशीच्या दिवशी रात्री भजन-कीर्तन करावे.
पूर्ण दिवस उपवास करावा. संध्याकाळी कहाणी आइकून मग फलाहार करावा.
दुसऱ्या दिवशी ब्रह्मणाला दान दक्षिणा देवून मग उपवास सोडावा.
एकादशीच्या दिवशी दीपदान करण्याचे महत्व आहे.
पुत्रदा एकादशी 2022 पूजा मुहूर्त
पौष शुक्ल पुत्रदा एकादशी गुरुवार 13 जानेवारी 2022
प्रारंभ संध्याकाळी 4:49 मिनिट पासून संध्याकाळी 7:32 मिनिट पर्यन्त
पौष शुक्ल पुत्रदा एकादशी गुरुवार, 13 जनवरी, 2022।
मंत्र- Putrada Ekadashi Mantra 2022
– ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’।
– ‘ॐ विष्णवे नम:’।
– ‘श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवा’।
– ‘ॐ नमो नारायण’।
– ‘ॐ नारायणाय नम:’।
– ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:’।
– ‘ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:’।
एकादशी व्रत करण्याचे लाभ-Ekadashi Vrat ke Labh
एकादशीचा उपवास केल्याने व पितृ तर्पण केल्याने पितृ प्रसन्न होऊन जीवनात आलेल्या परेशानी दूर करतात.
एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
धार्मिक दृष्ट्या दर महिन्यातील एकादशीही महत्व पूर्ण असते. ह्या दिवशी विष्णु भगवान ह्याची पूजा केल्याने पुण्यदाई फळ मिळते.
एकादशी व्रत केल्याने व त्याचे माहात्म्य वाचल्याने मनुष्याची पाप धुतली जातात व सुखी जीवन जाऊन वैकुंठची प्राप्ती होते,
धार्मिक पुराणानुसार एकादशी व्रत सर्व मनोकामनाची पूर्ती करणारा व्रत दिवस आहे.