मकर संक्रांति ला 14 दिवे कसे दान करावे केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील
मकर संक्रांति हा नवीन वर्षांचा पहिला सण आहे. भारतात प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. ह्या दिवशी विष्णु भगवान व लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने सुख-शांती व पुण्य मिळते तसेच ह्या दिवशी 14 दिव्यांचे दान करतात असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
The Makar Sankranti 2022 Where To Daan Donate 14 Diya For Desire can be seen on our YouTube Makar Sankranti 2022 Daan Donate 14 Diya For Desire
आपण ह्या अगोदरच्या विडियो मध्ये किंवा लेखामध्ये कोण कोणत्या वास्तू राशी नुसार दान कराव्या ते पाहिले. पण त्याच बरोबर आपण 14 दिवे देवांना किंवा त्यांच्या निवास स्थानी ठेवल्यास आपल्याला पुण्य तर मिळतेच त्याच बरोबर आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
आपल्याला 14 दिवे एका थलीमद्धे घ्यायचे आहेत. दिवे आपण आपल्या आयपती नुसार घ्यायचे आहेत. दिवे आपण मातीचे, पितळ्याचे किंवा स्टीलचे घेतले तरी चालतील पण ते नवीन असावेत जून वापरलेले दिवे नसावे. जर आपणाला नवीन दिवे आणणे शक्य नसेलतर तर आपण घरी कणकेचे दिवे बनवू शकता.
दिवे घेतल्यावर त्याच्यामध्ये फूल वात लावून त्यामध्ये तिळाचे तेल किंवा तूप घालावे. जर आपल्या जवळ तिळाचे तेल नसेल तर मोहरीचे तेल वापरले तरी चालेल ह्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते.
दिव्यामद्धे तेल घातल्यावर त्यामध्ये थोडेसे तिळ घालावे. मग दिवे लावावे. दिवे लावल्यावर त्या दिव्यांची पूजा करून खाली दिल्याप्रमाणे प्रतेक ठिकाणी एक एक दिवा दान करावा.
आपण 14 दिवे खाली दिलेल्या ठिकाणी दान करावे.
पहिला दिवा: आपल्याला घरातील देवघरात ठेवावा.
दूसरा दिवा: आपल्या अंगणातील तुळशीच्या समोर ठेवावा.
तिसरा दिवा: आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या समोर हळद वापरुन स्वस्तिक काढून त्यावर ठेवावा.
चौथा दिवा: आपल्या घराच्या बाहेर आपल्या पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला हळद वापरुन स्वस्तिक काढून त्यावर ठेवावा.
पाचवा दिवा: पवित्र नदीमध्ये सोडावा किंवा आपल्या घरं जवळ जी नदी असेल तेथे सोडावा. हे जर शक्य नसेल तर घरीच एका थाळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दिवा सोडावा.
सहावा दिवा: कदंब ह्या झाडा जवळ ठेवावा.
सातवा दिवा: आवळ्याच्या झाडाजवळ ठेवावा. आवळ्याचे झाड पवित्र मानले जाते,
आठवा दिवा: बेलाच्या झाडाजवळ ठेवावा. बेल पत्र आपण भगवान शिव ह्यांना अर्पित करतो.
नववा दिवा: अशोकाच्या झाडांजवळ ठेवावा. अशोकाचे झाड पण आपण पवित्र मानतो.
दहावा दिवा: शंकर भगवान ह्यांच्या मंदिरात शिवलिंग जवळ ठेवावा.
आकरावा दिवा: पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावा. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास आहे.
बारावा दिवा: वडाच्या झाडाजवळ ठेवावा.
तेरावा दिवा: गाईच्या गोठ्याचा जवळ दान करावा.
चौंदावा दिवा: देवळात जेथे यज्ञ कुंड आहे म्हणजे जेथे यज्ञ करतात तेथे दान करावा.
जर आपल्याला ह्या चौदा ठिकाणी दिवा दान करणे शक्य नसेलतर जेथे शक्य आहे तेथे दान करावे.