इलायची वेलचीची साल फेकून देण्याच्या अगोदर त्याचे फायदे बघा
इलायचीची साल फेकून देण्याच्या अगोदर त्याचे आपल्या आरोग्यासाठी दोन प्रकारची चूर्ण बनवून सेवन केल्यास मळमळ व एसिडिटी दूर करण्यास फायदेमंद होते.
वेलचीच्या सालाचा अजून एक फायदा हा की त्याची पावडर बनवून त्याचा उपयोग चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरू शकता. चला तर मग आपण पाहूया वेलचीच्या सालाचे चूर्ण कसे बनवायचे.
The Health Benefits Of Elaichi Peel can be seen on our YouTube Health Benefits Of Elaichi Cardamom Peel
इलायची सेवन करणे हे सर्वाना आवडते. इलायचीच्या सेवनाने काही मिनिटांत आपला मूड चेंज होतो. पण आपण इलायचीचे दाणे खातो व त्याची साल फेकून देतो. आज आपण इलायचीच्या सालाचे फायदे पाहू या. खर म्हणजे इलायचीची साल आपल्या शरीरातील डाइजेस्टिव एंजाइम्स प्रोडक्शनला वाढवतात व पचन क्रिया चांगली करतात. त्याच बरोबर इलायची ची साल आपल्या शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करतात. व त्याच बरोबर रक्त शुद्धी करण्यास पण मदत करतात. अश्या प्रकारे इलायचीची साल आपल्या शरीरसाठी फायदेमंद आहेत.
आपण आता पाहू या की इलायचीच्या सालानचा कसा फायदा करून घ्यायचा.
1. इलायचीच्या साला पासून बनवा पोट साफ करायचे चूर्ण:
इलायचीच्या साला पासून आपण खास चूर्ण बनवू शकता. खरम्हणजे इलायचीच्या दाण्यामद्धे जे गुणधर्म आहेत तसेच त्याच्या सालामध्ये सुद्धा गुणधर्म आहेत. जसे त्याच्या मध्ये सुगंधी ही भरपूर प्रमाणात आहे त्याच बरोबर ते रेचक गुण सुद्धा आहेत. म्हणजेच पोट साफ करण्यास मदतगार सुद्धा आहेत. म्हणूनच आपण इलायचीच्या साला पासून त्याचे चूर्ण बनवू शकता.
सर्वात पहिल्यादा इलायचीची साल जास्त प्रमाणात जमा करून ठेवा.
मग हिंग, ओवा, मसाला वेलचीचे दाणे व काळे मीठ घ्या.
सर्व जिन्नस तव्यावर थोडेक्षे गरम करा. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
वाटलेले चूर्ण एका हवबंद डब्यात भरून ठेवा. मग रोज जेवण झाल्यावर एक चमचा सेवन करा.
2. जर मळमळ सुरू झाली तर हे चूर्ण सेवन करा.
बरेच वेळा अपचन किंवा जास्तीचे जेवण झालेतर मळमळ सुरू होते. अश्या वेळी इलायचीच्या साला पासून बनवलेले चूर्ण फायदेमंद आहे. त्यासाठी ते चूर्ण असे बनवा.
इलायचीची साल बारीक वाटून घ्या. त्यामध्ये ½ ग्राम जावित्री चूर्ण, ½ टी स्पून मिश्री मिक्स करून ठेवा. जेव्हा जेव्हा मळमळ सुरू होईल तेव्हा तेव्हा आपण हे चूर्ण सेवन करू शकता.
इलायची च्या सालाचे फायदे-Cardamom peel benefits
1. पोटासाठी फायदेमंद:
इलायचीच्या साला पासून बनवलेली ही दोन्ही चूर्ण फायदेमंद आहेत. खरम्हणजे हे चूर्ण सर्वात पहिल्यादा तोंडात लाळ उत्पन्न करतात त्यामुळे डाइजेशनचा स्पीड वाढतो. त्यामुळे आपण जेपण सेवन करतो ते पचायला हलके होते. व त्यामुळे पोट साफ होते. रोज रात्री झोपताना एक चमचा सेवन केल्यास कब्ज च्या समस्या दूर होऊन पोट साफ होतो.
2. एसिडिटी वर रामबाण इलाज:
इलायचीची साल एसिडिटी वर रामबाण इलाज आहेत. ही दोन्ही चूर्ण बनवताना जे जिन्नस वापरले आहेत ते पचनक्रियासाठी फायदेमंद आहेत. काळे मीठ व मिश्री हे दोन्ही बेसिक नेचर आहेत. ते पोटातील अॅसिड न्यूट्रीलाइज करून शांत करते. त्याच बरोबर धने, जावित्री, हिंग व ओवा हे सर्व एसिडिटी कमी करण्यास मदत करते.
3. मळमळ थांबवते:
जेव्हा मळमळ सुरू होते तेव्हा इलायचीची साल खूप उपयोगी पडतात. तसेच मूड फ्रेशनरचे काम करते. हे दोन्ही चूर्ण फायदेशीर आहेत.
आपण इलायची च्या सालाचे पाणी सुद्धा पिऊ शकता. त्यासाठी इलायचीची साल पाण्यात टाकून ते पाणी उकळून गाळून थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून पिऊ शकता. त्यामुळे पचनशक्ति चांगली होऊन वजन सुद्धा कमी होते. जर आपण वेलची पावडर बनवून झाल्यावर इलायचीची साल फेकून देत असाल तर ती फेकून न देता ती साठवून त्याचा असा वापर करू शकता.