माघी गणेश जयंती 2022 तिथी पूजा मुहूर्त, पूजाविधी व महत्व
गणेश जयंतीलाच माघी गणेश उत्सव असे सुद्धा म्हणतात. माघ महिन्यात गणेश जीनचे दोन महत्वाचे दिवस आहेत ते म्हणजे संकष्टी चतुर्थी व दूसरा म्हणजे गणेश चतुर्थी हे दोन महत्वपूर्ण व्रत दिवस आहेत. माघ महिन्यालाच मोक्ष दिवस सुद्धा म्हणतात.
The Maghi Ganesh Jayanti 2022 Thithi Pooja Muhurtha Importance can be seen on our YouTube Maghi Ganesh Jayanti 2022
माघ महिन्यात गंगा यमुना ह्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यामुळे आपली सर्व पाप धुतली जातात असे म्हणतात. हिंदू कॅलेंडर नुसार
माघ महिन्यात विष्णु भगवान व सूर्यदेव ह्यांची पूजा अर्चा करण्याचा महिना मानला जातो. त्याच बरोबर गणेशजीनचे दोन उपवासपण ठेवले जातात. आपली सर्व दुख: व संकट दूर करण्यासाठी हे उपवास केले जातात. गणेश जयंती ह्या दिवशी गणशजींचा जन्म झाला. आपल्याकडे कोणते सुद्धा शुभ कार्य असले तर प्रथम गणेश पूजन केले जाते.
गणेश जयंती तिथी व मुहूर्त:
गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थ ह्या तिथीला 4 फेब्रुवारी 2022 शुक्रवार सकाळी 4 वाजून 38 मिनिट सुरू होणार असून शनिवार 5 फेब्रुवारी 2022 सकाळी 3 वाजून 47 मिनिट पर्यन्त आहे.
4 फेब्रुवारी गणेश जयंती सकाळी 11 वाजून 30 मिनिट पासून दुपारी 1 वाजून 41 मिनिट पर्यन्त गणेशजींची पूजा करण्यास वेळ शुभ आहे.
गणेश जयंतीची खासियत:
हिंदू धर्म अनुसार माता पार्वतीनी ज्या दिवशी श्री गणेशजी ह्यांची रचना करून त्यांच्या मध्ये प्राण प्रतिष्ठा केली होती तो दिवस म्हणजे माघ महिन्याची शुक्ल पक्ष मधील चतुर्थी होती.
ह्या दिवशी जो भक्त गणेश भगवान ह्यांची मनापासून पूजा अर्चा करेल त्याला दिव्य सुखाची प्राप्ती होईल. व त्याच बरोबर सर्व मनोकामना पूर्ण होतील.
गणेश जयंती पूजाविधी:
गणेश जयंती हया दिवशी ब्रह्म मुहूर्तवर लवकर उठून नित्यकर्म करून स्नान करून पूजा घराची सफाई करा. मग पूजा घरला फूल व दिव्यानि सजवा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरूण त्यावर भगवान गणेशजीनची मूर्ती ठेवा. गणेशजिना अभिषेक करा. मग शंकर पार्वती गणेश व कार्तिक ह्यांची पूजा करा. मग गणेशजिना हळद-कुंकू व 21 दूर्वा अर्पित करून (21 दूर्वा का वहाव्या तर मातृ देवता 21 आहेत व गणपती मातृ भक्त आहे म्हणून) 21 लाडूचा नेवेद्य अर्पित करा तसेच लाल रंगाचे फूल नक्की अर्पित करा. मग त्यातील 5 लाडू गणेशजिना अर्पित करून बाकीचे लाडू गरीब लोकांमध्ये किंवा ब्रह्मनांमद्धे वाटून द्या. मग गणेशजीनची आरती, कथा, चालीसा वाचून त्यांचा आशीर्वाद घ्या. पूजा अर्चा पूर्ण श्रद्धेने व आनंदाने करावी. म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. ह्यादिवशी अथर्वशीष ह्याचे पठन नक्की करावे. ह्या दिवशी रात्री चंद्र दर्शन करू नये कारण त्यामुळे काही मानसिक आजार होऊ शकतात. असे म्हणतात.
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला मोदक दाखवण्याची प्रथा आहे तर माघ महिन्यात गणेश जयंतीला तिळाचे लाडू नेवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे. गणपतीला 14 विद्या व 64 कला अवगत आहेत, व त्याची उपासना केल्याने आपली मनाची एकाग्रता होते. व हातात घेतलेले कार्य पूर्ण होते.
गणेश जयंतीच्या दिवशी मंत्र जाप करावा:
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥