रसम वडा खाल तर इडली वडा सांबर विसराल साऊथ इंडियन स्टाईल
आपण नेहमी इडली-वडा सांबर बनवतो. इडली-वडा सांबर सर्वाना आवडतो. आपण ब्रेकफास्ट किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवतो पण आपण रसम वडा कधी बनवला आहे का? तर नक्की बनवून पहा सर्वांना आवडेल.
The Tasty Swadisht Rasam Vada South Indian Style can be seen on our YouTube Rasam Vada South Indian Style
आपण रसम अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. त्यामध्ये चिंच, टोमॅटो व थोडासा gul वापरल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. तसेच रसम बनवताना जी रसम मसाला पावडर बनवली या त्याने तर त्याची टेस्ट अजून मस्त लागते व त्याचा सुगंध तर लाजवाब येतो. त्यामध्ये मेदू वडे घालून सेवन केले तर अगदी निराळी टेस्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य: वडा बनवण्यासाठी:
1 कप उडीदडाळ
2 टे स्पून तांदळाचे पीठ
2 हिरव्या मिरच्या (कुटून)
1” आल (कुटून)
¼ टी हिंग
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
रसम बनवण्यासाठी:
1 वाटी तुरडाळ (शिजवून)
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हळद
7-8 कडीपत्ता पाने
1 टी स्पून लाल मिरची पावडर
½ कप चिंचेचे पाणी
1 छोटा टोमॅटो (चिरून)
1 टे स्पून गूळ
मीठ चवीने
कोथिंबीर (चिरून)
रसम मसाला पावडर कशी बनवायची:
1 टी स्पून धने
½ टी स्पून जिरे
½ टी स्पून मिरे
2 लाल सुक्या मिरच्या
1 टी स्पून उडीदडाळ
7-8 कडीपत्ता पाने
सर्व जिन्नस मंद विस्तवावर 2 मिनिट भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कृती: प्रथम उडीदडाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. तुरीची डाळ शिजवून घ्या. रसम मसाला बनवून बाजूला ठेवा.
रसम बनवण्यासाठी: एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून कडीपत्ता पाने, घालून थोडेसे परतून घेऊन मग त्यामध्ये चिंचेचे पाणी घालून एक मिनिट गरम करून त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून 4 कप पाणी घालून एक उकळी येवू ध्या. उकळी आलीकी त्यामध्ये शिजलेली डाळ घालून, रसम पावडर, मीठ, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून 10 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग त्यामध्ये गूळ व कोथिंबीर घालून 2 मिनिट शिजवून विस्तव बंद करा.
वडा बनवण्यासाठी: उडीदडाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग एक बाउलमध्ये वाटलेली डाळ काढून त्यामध्ये हिरवी मिरची व आल वाटून घाला, हिंग, कडीपत्ता, मीठ व कोथिंबीर व तांदळाचे पीठ घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. मग कढई मध्ये तेल गरम करून छोटे छोटे वडे तळून घ्या.
आता गरम गरम रसममध्ये तळलेले वडे घालून सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा.