डिंक | गोंद सेवनाचे आरोग्यदायी फायदे व काही तोटे
थंडीमध्ये डिंक सेवन केल्याने शरीरात गरमी निर्माण होते. डिंक सेवन केल्याने हाडे मजबूत बनतात व हार्ट संबंधित तक्रारी कमी होतात. आपल्याला आपल्या डाएटमध्ये डिंक जरूर शामील केला पाहिजे.
The Health Benefits Of Gond | Dink | Edible Gond can be seen on our YouTube Health Benefits Of Gond | Dink | Edible Gond
आपण आता पाहूया डिंक म्हणजे काय?
कोणत्यापण मोठ्या आकाराच्या झाडांच्या चिरामद्धे जो स्त्राव निघतो मग नंतर तो घट्ट होऊन कडक बनतो त्यालाच डिंक असे म्हणतात. डिंक शीतल व पौस्टिक असतो. तसेच त्याच्यामध्ये त्या झाडातील औषधी गुणधर्म सुद्धा येतात. आयुर्वेदामध्ये औषधे बनवण्यासाठी म्हणजेच गोळ्यांच्या आवारणांसाठी डिंकाची पावडर वापरली जाते. थंडीमध्ये डिंक सेवनाने जुना खोकला, सर्दी, ताप, फ्लू व इनफेकशन सारख्या समस्या दूर होतात. रोज डिंक भाजून सेवन केलातर शरीरात गरमी निर्माण होऊन बऱ्याच आजारानपासून आराम मिळतो.
डिंकमध्ये प्रोटीन, फाइबर, विटामिन व एंटीऑक्सीडेंट सारखे भरपूर गुण आहेत. डिंक सेवनाने कॅन्सर पासून हार्ट पर्यन्तच्या आजारांवर गुणकारी आहे.
डिंक कसा सेवन करावा:
एका जड बुडाच्या भांड्यात ½ चमचा तूप घेऊन त्यामध्ये डिंक घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर भाजावा किंवा डिंक पूर्ण फुले पर्यन्त भाजावा. डिंक भाजताना पॉपकॉर्न सारखा फुलतो. मग तो मिक्सरमध्ये बारीक वाटून वापरावा.
डिंक सेवनाचे फायदे:
1. रोज सकाळी डिंक व गव्हाचे पीठ वापरुन बनवलेला एक लाडू व दूध सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ति वाढते.
2. डिंक वापरुन बनवलेले पदार्थ सेवन केल्यास हार्ट संबंधित रोग बरे होण्यास मदत होते व मांसपेशी मजबूत बनतात.
3. डीलेव्हरी नंतर महिलानि डिंकाचे लाडू सेवन करावे. त्यामुळे दूध जास्त तयार होते.
4. प्रेगनेंट महिलासाठी फायदेमंद आहे डिंकाचे सेवन करणे. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत बनतो.
5. डिंक सेवन केल्याने शरीरात ताकद येते व थंडीमध्ये गरमी निर्माण होण्यास मदत होते.
डिंकाचे सेवन अश्या प्रकारे करा:
1. आपण डिंकाची पावडर बनवून गव्हाचे पीठ तुपात भाजून त्यामध्ये ड्रायफ्रूट, मखाने व पिठीसाखर मिक्स करून सेवन करू शकता.
2. डेसिकेटेड कोकनट, खारीक पावडर, खसखस, बदाम व डिंक सर्व तुपात भाजून त्याचे लाडू बनवून सेवन करू शकता.
3. थंडीमध्ये आपण डिंक वापरुन चिक्की सुद्धा बनवू शकता. अश्या प्रकारची चिक्की थंडीमध्ये खूप फायदेशीर आहे.
4. थंडी मध्ये डिंकाचे लाडू खूप स्वादिष्ट लागतात. आपण डिंक दुसऱ्या लाडूमध्ये सुद्धा मिक्स करून घालू शकता.
5. डिंक भाजताना विस्तव मंद ठेवा व तो पूर्ण भाजला गेला पाहिजे कच्चा राहता कामा नये. किंवा जळला सुद्धा नाही पाहिजे.
डिंकाचे झटपट लाडू:
साहित्य: –
3 टेबलस्पून डिंक, 4-5 टे स्पून तूप
1 ¼ कप गव्हाचे पीठ, ½ कप साखर
½ चमचा वेलची पावडर, डिपफ्राय करण्यासाठी तूप
कृती:
प्रथम कढईमध्ये 3 ½ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्याच कढईमध्ये ½ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये डिंक भाजून फुलला की काढून घ्या. आता ड्रायफ्रूट, पिठीसाखर, गव्हाचे पीठ, डिंक, वेलची पावडर 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून छोटे छोटे लाडू बनवून घ्या. मिश्रण जर कोरडे वाटले तर अजून थोडेसे तूप घाला.
डिंक सेवनाचे नुकसान:
डिंक सेवनाचे जसे फायदे आहेत तसेच डिंक सेवनाचे नुकसान सुद्धा आहे.
मळमळणे, भीती वाटणे, भ्रष्ट वाटणे, तोंडात झिणझिण्या येणे, पोट फुगल्या सारखे वाटणे