महाशिवरात्रि 2022 तिथि पूजा मुहूर्त महत्व मंत्र
हिंदू कॅलेंडर नुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या तिथीला महाशिवरात्री व्रत आहे. आता आपण पाहू या महाशिवरात्रि 2022 तिथि पूजा मुहूर्त महत्व मंत्र काय आहे.
The Mahashivratri 2022 Thithi Puja Muthurtha Importance And Mantra can be seen on our YouTube Mahashivratri 2022 Thithi Puja Muthurtha Importance And Mantra
हिंदू धर्मामध्ये शंकर भगवान ह्यांची पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे. असे म्हणतात की एक लोटा जल त्यांना अर्पित केले की ते प्रसन्न होतात. दर महिन्याला शिवरात्री असते पण ही महाशिवरात्री खूप महत्वाची असते. महाशिवरात्रीचे व्रत ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आपले दुख कष्ट दूर होतात, भय मुक्ती मिळते त्याच बरोबर शिव कृपा मिळून आरोग्य चांगले राहते व सुख सौभाग्य वाढते. महाशिवरात्री हा दिवस शिव भगवान ह्यांची आराधना करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
महाशिवरात्री 2022 तिथी:
पंचांगनुसार महाशिवरात्री 1 मार्च मंगळवार 2022 ह्या दिवशी सुरू होणार असून पहाटे 3:16 मिनिट पासून सुरू होणार असून 2 मार्च 2022 बुधवार सकाळी 10 वाजता संपणार आहे.
बेलपत्र वाहताना नियम:
महाशिवरात्री ह्या दिवशी शिवलिंगवर बेल पत्र वाहणे खूप महत्वाचे आहे तसेच बेल पत्र वाहताना बेलपत्राची चकाकी असणारी बाजू शिवलिंग वर असावी म्हणजे उलटे बेलपत्र वहावे.
महाशिवरात्री ह्या दिवशी बेलपत्र तोंडताना काही नियम आहेत. असे म्हणतात की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व अमावस्या ह्या तिथिला व संक्रांति ह्या तिथीला बेलपत्र तोडू नये. म्हणजेच ह्या तिथीच्या अगोदर बेलपत्र तोंडलेले वाहिले पाहिजे.
Mahashivratri 2022: महाशिवरात्रिचे महत्व:
हिंदू पौराणिक कथा अनुसार असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून ह्या दिवशी व्रत केलेले फलदाई असते. खर म्हणजे शिवायल मध्ये जाऊन पूजा करणे जास्त फलदाई असते पण जर काही कारणाने आपण शिवालय मध्ये जाऊ शकत नसाल तर आपण घरी सुद्धा यथासांग पूजा करू शकता.
महाशिवरात्री पूजाविधी:
फाल्गुन मास मधील महाशिवरात्री सर्वात मोठी शिवरात्र आहे. ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करावे. मग एक कलश पाणी भरून स्थापन करून शंकर पार्वतीची मूर्ती स्थापना करावी पंचामृतनि अभिषेक करावा चंदनाचा टिळा लावावा. मग अक्षता, पान, सुपारी, रोली, मौली, चंदन, लौंग, इलायची, दूध, दही, मध, तूप, धतूरा, बेलपत्र, कमलगट्टा ह्या सर्व वस्तु अर्पित कराव्या. मग खिरीचा नेवेद्य दाखवावा आरती म्हणून ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय, रूद्राय शम्भवाय भवानीपतये नमो नमः मंत्र का जाप करावा.
महामृत्युंजय मंत्र म्हणावा:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।
महाशिवरात्री स्पेशल थंडाई:
महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात.. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक पेय आहे.
साहित्य:
10-12 बदाम 10-12 काजू 25-30 मिरे 10-12 किसमिस 10-12 वेलची 1 टी स्पून खसखस
1 टी स्पून बडीशेप 1 टी स्पून खरबूस बी 3 कप दूध 1/4 कप साखर 1 चिमुट केशर (1 टे स्पून दुधात भिजून) 1/2 टी स्पून रोझ वॉटर
कृती:
1/2 कप दुधात बदाम, काजू, मिरे, किसमिस, वेलची, खसखस, बडीशेप व खरबूज बी 5 तास भिजवून ठेवा.
मग मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्या. गरज वाटली तर थोडे दूध मिक्स करा. नंतर बाकीचे राहीलेले दूध मिक्स करा.
मिक्सर मधून बारीक केलेली पेस्ट गाळणीनी गळून घ्या. मग साखर, भिजवलेले केशर व रोझ वॉटर घालून साखर विरघळेस तोवर मिक्स करा.
थंडगार थंडई ग्लासमध्ये ओतून वरतून गुलाब पाकळ्या व ड्रायफ्रूटने सजवा.