स्वीट डीलीशीयस खव्याची (मावा) पाकातली करंजी कोंकणी पद्धतीने
करंजी महाराष्ट्रियन लोकांची आवडते पक्वान्न आहे. आपण सणावराला किंवा दिवाळीह्या सणाला अगदी आवर्जून बनवतो. आपण नारळाची करंजी नेगमी बनवतो पण खव्याची करंजी बनवून बघा ते पण पाकातली घरात नक्की सर्वाना आवडेल. दिवाळी फराळमध्ये लाडू व करंजी ही मुख्य पदार्थ आहेत.
The Tasty Delicious Soft Khavyachi (Mawa) Pakatali Karanji Konkani Style Recipe can be seen on our You tube Chanel Khavyachi (Mawa) Pakatali Karanji
खव्याची पाकातली करंजी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच स्वादिष्ट लागते. दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. प्रथम खव्याचे सारण बनवून त्याची करंजी बनवून पाकामध्ये बुडवून खूप मस्त लागते.
बनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट
वाढणी: 20 करंज्या बनतात
साहीत्य:
आवरणांसाठी:
2 कप मैदा
2 टे स्पून तूप
मीठ चवीने
तेल करंजी तळण्यासाठी
सारणांसाठी:
1 कप किंवा 200 ग्राम खवा
½ कप रवा
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
½ कप काजू/बदाम/किसमिस (तुकडे करून)
1 टी स्पून वेलची पावडर
¼ टी स्पून जायफळ
पाकासाठी:
1 ½ कप साखर
1 कप पाणी
7-8 केशर काड्या
कृती:
आवरणांसाठी: प्रथम मैदा, मीठ व तूप मिक्स करून घ्या. मग थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून बाजूला झाकून 20-30 मिनिट ठेवा.
सारणांसाठी: पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग रवा काढून बाजूला थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट थोडे गरम करून करून काढून बाजूला ठेवा. आता खवा कुस्करून थोडा परतून घ्या. मग थंड करायला ठेवा. काजू-बदाम-पिस्ते बारीक चिरून घ्या.
एका बाउलमध्ये रवा, खवा, डेसिकेटेड कोकनट, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, जायफळ पावडर व पिठीसाखर मिक्स करून सारण बनवून घ्या.
करंजी बनवण्यासाठी: भिजवल्या पिठाचे तीन एकसारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन मोठी पोळी लाटून घ्या. मग एक मध्यम आकाराची वाटी घेऊन गोल गोल चकत्या कापून घ्या. एका चकतीला कडेनी अगदी थोडेसे पाणी लाऊन पुरीच्या मध्ये सारख ठेवा व पुरी मुदपुन घ्या. पाणी लावलेने पुरी लगेच चिटकेल मग ती कतरनी कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
एका पॅनमध्ये 1 ½ कप साखर व 1 कप पाणी घालून मध्यम विस्तवावर पाक बनवायला ठेवा. आपल्याला पाक थोडा चिकट असा बनवायचा आहे.
कढईमध्ये तेल गरम करून करंज्या छान गुलाबी रंगावर तळून घ्या. करंजी तळून झाल्यावर 1 मिनिट टिशू पेपरवर ठेवा. मग पाक थोडा गरम असतानाच त्याच्यामध्ये करंज्या घालून वर खाली करून 1-2 मिनिट तश्याच ठेवा. मग चाळणीवर निथळत ठेवा. म्हणजे जासतीचा पाक निथळून प्लेटमध्ये येईल. मग करंज्या डब्यात भरून ठेवा.
टीप: खव्याच्या पाकातल्या करंज्या स्वादिष्ट लागतात पण त्या 3-4 दिवस चांगल्या राहतात. खवा वापरला आहे त्यामुळे त्या लवकर संपवाव्या.