चैत्र नवरात्री 2022 घट स्थापना शुभ मुहूर्त तिथी वास्तु उपाय व वाहन
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा चैत्र नवरात्रि प्रारंभ 02 एप्रिलला सुरू होणार असून 11 एप्रिल पर्यन्त आहे. ह्या वर्षी पूर्ण 9 दिवस नवरात्री आहे त्यामुळे ती खूप शुभ मानली जाते. ह्या वर्षी माता दुर्गा घोड्यावर सवार होऊन येणार असून जाताना म्हशीवर बसून जाणार आहे.
दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला नवरात्रीची सुरवात होते. ह्या वर्षी नवरात्री ला शुभयोग येणार असून ग्रहांची स्थिति पण शुभ होणार असून सर्व कार्य सिद्धी होणार आहे.
The Chaitra Navratri 2022 Ghatasthapana Shubh Muhurat Tithi Vastu Upay can be seen on our You tube Chanel Chaitra Navratri 2022
चैत्र नवरात्रि 2022 तिथि:
पंचांग नुसार चैत्र महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा प्रारंभ 1 एप्रिल 2022 शुक्रवार सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी सुरू होणार आहे. व दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 शनिवार ह्या दिवशी 11 वाजून 58 मिनिट पर्यन्त आहे. पण चैत्र नवरात्री 2 एप्रिल शुक्ल पक्ष ह्या तिथीला सुरू होणार आहे.
चैत्र नवरात्रिला सर्वार्थ सिद्धि योग:
ह्या वर्षी चैत्र नवरात्रीला सर्वार्थ सिद्धि योग व अमृत सिद्धि योग आहे. हे दोन्ही योग 1 एप्रिल सकाळी 10:40 ते 2 एप्रिल 6:10 पर्यन्त आहेत. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी इंद्र योग और रेवती अश्विनी नक्षत्र योग आहे.
इंद्र योग 01 एप्रिलला सकाळी 9 वाजून 37 मिनिट पासून सुरू होणार असून 2 एप्रिल सकाळी 8 वाजून 31 मिनिट पर्यन्त आहे. रेवती नक्षत्र 1 एप्रिल सकाळी 10 वाजून 40 मिनिट पासून 2 एप्रिल 11 वाजून 21 मिनिट पर्यन्त आहे. मग अश्विनी नक्षत्र सुरू होणार असून चैत्र नवरात्री च्या पहिल्या दिवशी शुभ योग व नक्षत्र शुभ सफलता देणारा योग आहे.
चैत्र नवरात्रि 2022 ग्रह स्थिति:
चैत्र नवरात्रीला कुंभ राशी मध्ये शुक्र व गुरुची साथ आहे. व मकर राशीमध्ये मंगळ व शनि बरोबर राहणार आहेत. मंगळ व शनिची साथ म्हणजे साहस व पराक्रम मध्ये वृद्धी करणारा योग आहे. तसेच वृश्चिक मध्ये केतू, मीन मध्ये सूर्य , बुध, वृष मध्ये राहु व मेष मध्ये चंद्र आहे.
चैत्र नवरात्रि 2022 घटस्थापना मुहूर्त:
घटस्थापना शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 10 मिनिट पासून ते सकाळी 8 वाजून 31 मिनिट पर्यन्त
घटस्थापना शुभ मुहूर्त दुपारी 12:00 वाजता सुरू होणार असून 12 वाजून 50 मिनिट पर्यन्त आहे.
हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला चैत्र नवरात्री साजरी केली जाते. तेव्हा दुर्गा माताच्या नऊ रुपांची विधी पूर्वक पूजा अर्चा करतात. माता दुर्गाहयाना सुख समृद्धी व धनाची देवी मानले जाते.
नवरात्री मध्ये माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. माताचे भक्त जे श्रद्धा पूर्वक पूजा अर्चा करतात त्यांना माताचे आशीर्वाद मिळतात.
चैत्र नवरात्रीमध्ये वास्तु उपाय:
घटस्थापना उत्तर-पूर्व ह्या दिशेला करावी. त्याच्या मुळे घरात सुख समृद्धी येते.
नवरात्रीमध्ये भक्त 9 दिवस अखंड दिवा लावतात पण दिवा लावताना अग्नेय दिशेला लावावा. पण नऊ दिवस अखंड लावावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्याच बरोबर आपल्या शत्रू पासून छूटकारा मिळतो. व घरात भांडणे होत नाहीत.
नवरात्री किंवा दिवाळीमध्ये काही जन माताची पावल घराच्या समोर लावतात. पण काही जन चुकीची लावतात पावल लावतात ती घराच्या आता येत आहेत अश्या प्रकारे लावावी म्हणजे घरात धनाचे आकर्षण होते.
आपल्याला मान सन्मान हवा असेलतर नवरात्री मध्ये उत्तर दिशेला ॐ चे चिन्ह लावावे आपले मन शांत ठेवावे.
नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी ह्या तिथीला 9 कन्याचे पूजन करावे. ह्या 9 कन्याना माता दुर्गाची ची 9 रूप मानले जाते. त्यांची पूजा करताना दक्षिण ह्या दिशेला बसवून पूजा करावी. असे केल्याने घरात सुख समृद्धी राहून सकारात्मक ऊर्जा राहते व मान सन्मान वाढतो.
चैत्र नवरात्री माता दुर्गा वाहन महत्व:
2 एप्रिल ला नवरात्री आरंभ होणार असून शक्ति आराधनाचे हे नऊ दिवश विशेष महत्वाचे आहेत. कारणकी शक्तिची आराधना केल्याने सृष्टिमध्ये परिवर्तन होते. त्याच बरोबर मानवी जीवनात सम्पन्नता येते. माताला आहवान करून नऊ दिवस पूजा केली जाते. माताला आहवान केल्यावर माता कोणत्या वाहनावर विराजमान होऊन येणार आहे ते सुद्धा महत्वाचे आहे. कारणकी माताचे वाहन शुभ व अशुभ फळ देते. ह्या वर्षी माताचे वाहन घोडा आहे. माता आदिशक्तीच्या प्रतेक वाहनाचे वेगवेगळे महत्व आहे. वर्षात दोन वेळा नवरात्री येते दोन्ही वेळेस माताचे वाहन निराळे असते. व त्याचा प्रभव पूर्ण दुनियावर पडतो. माता दुर्गाचे वाहन डोली, नाव, घोडा, म्हैस, मनुष्य व हत्ती असते.
माता दुर्गा जर हत्तीवर विराजमान होऊन येणार असेलतर पाऊस येतो. घोडा वाहन असलेतर युद्ध होऊ शकते. नाव वाहन असेलतर शुभ असते जर डोलीहे वाहन असेलतर महामारी येणार असा आदेश असतो.
माताचे प्रस्तान होणारे वाहन निराळे असते रविवार किंवा सोमवार ह्या दिवशी प्रस्थान म्हशीवर असते त्यामुळे देशात रोग राई व कष्ट वाढतात. शनिवार किंवा मंगळवार ह्या दिवशी जनता दुखी व कष्टी होते. बुधवार व शुक्रवार ह्या दिवशी माता हत्तीवर प्रस्थान करते तर पाऊस जास्त पडतो. गुरुवार ह्या दिवशी माताचे वाहन मनुष्य असते तर ह्याचा अर्थ सुख-शांती राहते.