राम नवमी 2022 मुहूर्त पूजाविधी महत्व व खास उपाय
राम नवमी 2022 पूजाविधी मुहूर्त व आपली किस्मत चमकवण्यासाठी खास उपाय काय आहेत.
चैत्र महिन्यातील नवमी तिथी ला राम नवमी साजरी करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये राम नवमी हा दिवस अगदी खास मानला जातो. कारण की राम नवमी ह्याच दिवशी श्री राम ह्यांनी आयोध्या ह्या ठिकाणी राजा दशरथ ह्यांच्या घरी जन्म झाला होता. ह्या वर्षी 10 एप्रिल 2022 रविवार ह्या दिवशी राम नवमी साजरी करायची आहे म्हणजेच श्री राम जन्मोत्सव साजरा करायचा आहे. ह्याच दिवशी भारत भर श्री राम नवमी साजरी करतात. धार्मिक स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे श्री राम जन्मोत्सव साजरा करतात त्याच बरोबर घरांमध्ये सुद्धा श्री राम जन्मोत्सव साजरा करतात. श्री राम ह्यांचा आशीर्वाद आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहावा व आपल्याला सुख समृद्धी मिळावी म्हणून श्री राम नवमी ह्यादिवशी काही सोपे उपाय केले तर त्याची आपल्याला शुभ फळे मिळतात.
The Ram Navami 2022 Muhurat Puja Vidhi Mahatva Mantra w Upaybe seen on our You tube Chanel Ram Navami 2022
श्री राम नवमी शुभ मुहूर्त:
श्री राम नवमी तिथी – 10 एप्रिल 2022 रविवार
नवमी तिथी आरंभ – 10 एप्रिल सकाळी 1.32 पासून सुरू
नवमी तिथी समाप्ती – 11 एप्रिल 2022 सकाळी 3.15 पर्यन्त
श्री राम पूजा शुभ मुहूर्त -10 एप्रिल सकाळी 11.10 पासून 01.32 पर्यन्त
श्री राम नवमी ह्या दिवशी श्री राम ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी कन्या पूजन करून व्रताची सांगता करतात.
श्री राम नवमी ह्या दिवशी काही शुभ योग येत आहेत. ज्योतिषशास्त्र अनुसार राम नवमी ह्या दिवशी रवी पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग हा त्रिवेणी योग येत आहे. ह्या त्रिवेणी योग मुळे ह्या दिवसाचे महत्व अजून वाढले आहे.
राम नवमी ह्या दिवशी भगवान श्री राम ह्यांच्या बरोबर माता सीता, दुर्गा माता व बजरंगबली ह्यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम ह्यांची मनोभावे पूजा अर्चा केल्यास भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात. राम नवमी च्या बरोबरच चैत्र नवरात्री समाप्त होते.
श्री राम नवमी महत्व:
विष्णु भगवान राम नवमी ह्याच दिवशी भगवान राम ह्यांच्या रूपात अवतरले होते. असे म्हणतात की पृथ्वी वरील राक्षस व असुरी शक्तिचा नाश करण्यासाठीच श्री राम ह्यांचा जन्म झाला होता. म्हणूनच पृथ्वी वरील रावण सारख्या बलशाली राक्षसाचा वध त्यांनी केला होता. श्री राम नवमी ह्यादिवशी श्री राम, श्री लक्ष्मण, माता सीता व श्री हनुमान ह्यांची मनोभावे पूजा करतात.
राम नवमी पूजा विधि:
राम नवमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. मग हातात थोडेसे तांदूळ घेऊन संकल्प करून सूर्य देवाला जल अर्पित करावे. मग प्रभू श्री राम ह्यांची पूजा करून त्याना गंगाजल, फूल, माळ, 5 प्रकारची फळ, मिठाई अर्पित करावी. भगवान श्री राम ह्यांचा तुळशीची पाने व कमळ जरूर अर्पित करावे त्यांचा फार आवडते. त्या नंतर रामचरितमानस, रामायण किंवा रामरक्षास्तोत्र म्हणावे.
राम नवमी च्या दिवशी हे खास उपाय करावे:
1. घरातील वास्तु दोष, नजर दोष, तंत्र-मंत्र बाधा दूर करण्यासाठी राम नवमी ह्या दिवशी एका वाटीत गंगाजल घेऊन खाली दिलेला श्री राम रक्षा मंत्र 108 वेळा म्हणावा.
ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्रीं नम:
मंत्र म्हणून झाल्यावर वाटी मधील गंगाजल घरात व घरं बाहेर सर्व ठिकाणी शिंपडावे.
2. धनलाभ होण्यासाठी व आपल्या सर्व कामात सफलता मिळावी ह्यासाठी रामाष्टकचे पठन करावे.
3. आपल्या सर्व कामात सफलता मिळावी म्हणून प्रभू श्री राम ह्यांना चंदनाचा टिळा लावावा. मग राम स्तुतिचे पठन करावे.
4. राम नवमी ह्या दिवशी श्री राम ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करून भोग दाखवून तुलसीची पाने अर्पित करावी त्यामुळे श्री राम लवकर प्रसन्न होतील.
5. श्री राम नवमी ह्या दिवशी रामचरितमानस, सुदंरकांड ह्याचे पठन केल्यास लाभ होतात व आपली सर्व कामे निरविघ्न पार पडतात.
6. राम भक्तनी राम नवमी ह्यादिवशी श्री राम स्तुतिचे पठन केले तर खूप लाभ दायक होते. त्याच बरोबर राम रक्षा स्त्रोत म्हणावे.