बदाम मिल्कशेक 2 पद्धतीने घरच्या घरी पार्लर सारखे
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. मग मुलांना शाळेला सुट्या सुद्धा लागल्या आहेत. मग रोज दुपारी किंवा रात्री थंडगार पाहिजे असते टे पण पौष्टिक पाहिजे. मग आपण बदाम मिल्क शेक बनवले तर किती छान पौस्टिक सुद्धा आहे व थंड गार सुद्धा आहे.
बदाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावाह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यासाठी चांगले फायदे सुद्धा होतात. त्याचे काय फायदे आहेत ते आपण बदामाचे गुणधर्म ह्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
The Homemade Badam Milk Shake 2 Style Restaurant Style For Summer Special Recipe Video In Marathi be seen on our You tube Chanel Homemade Badam Milk Shake
बदामाचे मिल्क शेक आपण दोन् प्रकारे बनवू शकतो. दोन्ही पद्धती खूप सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. पहिली पद्धतीमध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. ह्या पद्धतीने बदाम मिल्क शेक खूप स्वादिष्ट लागते. व दुसऱ्या पद्धत पण खूप सोपी व झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
पहिला प्रकार
साहित्य:
½ लीटर दूध
3 टे स्पून साखर
15 बदाम (भिजवून)
1 टे स्पून कस्टर्ड पावडर
1 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून फ्रेश क्रीम
सजावटी करिता:
बदाम-पिस्ता तुकडे
कृती: बदाम 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. मग त्याची साल काढून मिक्सरमध्ये ¼ कप दूध व बदाम घालून चांगली पेस्ट करून घ्या. सजावटी करिता बदामचे काप करून घ्या.
दूध गरम करून त्यामध्ये साखर विरघळवून घेऊन परत 2 मिनिट गरम करून घ्या. एका वाटीत नॉर्मल दूध घेऊन त्यामध्ये कस्टर्ड पाउडर मिक्स करून घ्या. मग गरम दुधात हळू हळू घालून मिक्स करून 5 मिनिट मंद विस्तववर आटवून घ्या. मग त्यामध्ये बदाम पेस्ट घालून दोन मिनिट गरम करून मग विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर फ्रीजमद्धे 2 तास थंड करायला ठेवा.
आता 3 काचेचे छान ग्लास घेऊन त्यामध्ये थंड झालेले मिश्रण ओतून त्यावर बदाम काप व बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा.
दुसरी पद्धत:
साहित्य:
½ लीटर दूध
3 टे स्पून साखर
15 बदाम (भिजवून)
1 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून फ्रेश क्रीम
सजावाटी करिता:
बदाम तुकडे
कृती: बदाम 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. मग त्याची साल काढून मिक्सरमध्ये ¼ कप दूध व बदाम घालून चांगली पेस्ट करून घ्या. सजावटी करिता बदामचे काप करून घ्या.
दूध गरम करून थंड करून घ्या, मिक्सरच्या भांड्यात दूध, साखर, बदाम पेस्ट, वेलची पावडर, फ्रेश क्रीम घालून ब्लेंड करून घ्या. मग मिश्रण एका भांड्यात ओतून फ्रीजमद्धे 2 तास थंड करायला ठेवा.
थंड झाल्यावर 3 काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये मिश्रण ओतून वरतून बदाम काप व बर्फ घालून थंडगार बदाम मिल्क शेक सर्व्ह करा.