हनुमान जयंती स्वादिष्ट रोट नेवेद्य दाखवून आपली मनोकामना पुरी करा
हनुमान जयंती 16 एप्रिल 2022 शनिवार ह्या दिवशी आहे. हनुमानजी ना रोट बनवून नेवेद्य दाखवा कारणकी बाल हनुमान ह्यांना रोट खूप आवडतात. त्यांचा आवडतीचा नेवेद्य दाखवला की त पण खुश होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात.
The Hanuman Jayanti Bhog Sweet Swadisht Roat Video In Marathi be seen on our You tube Chanel Sweet Swadisht Roat
रोट बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच खूप पौष्टिक सुद्धा आहेत व मस्त खमंग लागतात. आपण हनुमान जयंतीला किंवा हनुमानजिनच्या मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवशी सुद्धा अश्या प्रकारचा भोग दाखवू शकतो.
रोट बनवताना गव्हाचे पीठ, रवा, काजू, बदाम, सुके खोबरें, बडीशेप, गूळ, साखर, तूप वापरली आहे. त्यामुळे ते पौस्टिक सुद्धा आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 20 बनतात
साहीत्य:
1 कप गव्हाचे पीठ
1 कप रवा
2 टे स्पून तूप
½ कप साखर
¾ कप गूळ
¼ कप सुके खोबरे (किसलेले)
¼ कप काजू-बदाम
1 टे स्पून बडीशेप (कुटून)
1 टी स्पून वेलची पावडर
तूप रोट भाजण्यासाठी
कृती: सुके खोबरे किसून घ्या, बडीशेप कुटून घ्या, ड्रायफ्रूट कुटून घ्या, गूळ ½ कप पाण्यात थोडा गरम करून विरघळवून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, साखर, सुके किसलेले खोबरे, ड्राय फ्रूट, बडीशेप, वेलची पावडर व तूप मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये गुळाचे पाणी घालून मिक्स करून पीठ मळून झाकून ½ तास बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे जाडसर लाटून घेऊन बाजूला ठेवा. वरतून सुके खोबरे लावून दाबून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तूप लावून त्यावर बनवलेले रोट मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी तूप लाऊन भाजून घ्या. छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व रोट बनवून घ्या.
हनुमानजी ना बनवलेले रोट नेवेद्य म्हणून दाखवा.