दोन मिनिटांत आरोग्यदाई प्रीमिक्स शरबत-सरबत 2 प्रकारे भयंकर गरमीमध्ये थंडावा मिळण्यासाठी
2 मिनिटात आरोग्य दाई बडीशेप (सौंफ शरबत) प्रीमिक्स सरबत 2 प्रकारे उन्हाळा सीझनसाठी
बडीशेप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने पचनशक्ति सुधारते. डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेणंद आहे. शरीराचे वजन नियंत्रणात राहते. अस्थमा किंवा श्वास संबंधित समस्यापासून आराम मिळतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. कफ कमी होतो. बडीशेप मध्ये विटामीन ए व विटामीन सी आहे.
बडीशेपचे सरबत बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे, आता कडक उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपली पचन शक्ति कमी होते तेव्हा बडीशेपचे सरबत सेवन केले तर फायदेशीर आहे.
The Healthy In 2 Minutes Premix Saunf Sharbat 2 Types For Summer Season Video In Marathi be seen on our You tube Chanel Healthy In 2 Minutes Premix Saunf Sharbat 2 Types
आपण बडीशेपच्या सरबताची प्रीमिक्स पावडर बनवूण ठेवू शकतो. मग पाहिजे तेव्हा सरबत बनवून सेवन करू शकतो. त्याची पावडर बनवून ठेवायची असेलतर त्याचे सुद्धा प्रमाण दिले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 2 मिनिट
वाढणी: 4 ग्लास
साहित्य:
2 टे स्पून बडीशेप
4 टे स्पून साखर
3 हिरवी विलची
8-9 मिरे
½ टी स्पून खसखस
मीठ चवीने
2 ग्लास थंड पाणी किंवा
2 ग्लास थंड दूध
बर्फ तुकडे
साठवणीसाठी प्रीमिक्स पावडर बनवायची असेलतर
साहित्य:
1 कप बडीशेप
2 कप साखर
15 हिरवी विलची
25-30 मिरे
1 टे स्पून खसखस
मीठ चवीने
कृती: बडीशेप ½ तास उन्हात ठेवा. मग मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, साखर, मिरे, खसखस, हिरवे वेलदोडे घालून ग्राइंड करून घ्या. मग चालनिणी चाळून घ्या. जाड राहिलेली बडीशेप परत ग्राइंड करून चाळून घ्या. जर आपल्याला ही प्रीमिक्स पावडर जास्त दिवसांसाठी ठेवायची असेलतर एयरटाइट डब्यात भरून ठेवा.
सरबत बनवताना एका काचेच्या ग्लासमध्ये दोन टेबल स्पून प्रीमिज पावडर घेऊन त्यामध्ये थंड पाणी व बर्फ घालून मिक्स करून सर्व्ह करा.
जर आपल्याला पाणीच्या आयवजी दूध वापरायचे असेलतर ग्लासमध्ये थंड दूध, बर्फ व 2 टे स्पून प्रीमिक्स पावडर घालून मिक्स करून सर्व्ह करा.
टीप: जर आपण प्रीमिक्स पावडर जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायची असेलतर एयरटाइट डब्यात भरून ठेवा. फ्रीजमद्धे ठेवू नये.