आज हिंदू पंचांग अनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीय ह्या तिथीला अक्षय तृतीया हा सण आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा. चंद्र गणनामध्ये सर्व तिथी क्षय होतात पण तृतीया तिथी कधीही क्षय होत नाही.
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे व संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी कोणतेसुद्धा चांगले काम केले जाते त्यासाठी मुहूर्त पहायची गरज नाही. ह्या दिवशी साखरपुडा, लग्न, गृह प्रवेश, नवीन वाहन, सोने-चांदी, व इतर नवीन खरेदी करण्यास शुभ दिवस आहे.
अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच ह्या दिवशी दान-धर्म करण्याचे पुण्य प्राप्त होते. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यासाठी देव घर किंवा पूजेची जागा स्वच्छ करून चौरंग मांडावा त्यावर लाल रंगाचे कापड घालावे व भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्याची मूर्ती अथवा फोटो ठेवून स्थापना करावी. भगवान विष्णु ह्यांना पांढरे फूल अर्पित करावे व माता लक्ष्मी ह्यांना लाल गुलाबाचे फूल अर्पित करावे. व धूप दीप लाऊन पूजा करून गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवावा.
अक्षय तृतीया ह्या दिवशी जलदान करण्याचे पुण्य मिळते कारण की ह्या महिन्यात खूप उष्णता असते व तहानलेल्या माणसाला किंवा प्राणी किंवा पक्षाला पाणी थंड पाणी देणे म्हणजे खूप पुण्याचे काम आहे.
अक्षय तृतीया ह्या दिवशी दोन कलश स्थापित करावे. पहिल्या कलशमध्ये पाणी भरावे मग चंदन, पिवळे फूल, पंचामृत घालावे, त्यावर मातीचे झाकण ठेवावे. झकणावर एक फळ ठेवावे. हा कलश विष्णु भगवान ह्यांच्यासाठी आहे.
दुसऱ्या कलशमध्ये पाणी भरावे, मग चंदन, काळे तीळ, व पांढरे फूल घालावे. दूसरा कलश आपल्या पितरांसाठी आहे. ह्या दोन्ही कलशची विधिपूर्वक पूजा करावी. मग दोन्ही कलश दान करावे. त्यामुळे भगवान विष्णु व पितर प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी व शांती येते व आपल्या घरावर कृपा राहते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
अक्षय तृतीया ही दिवशी वृक्षारोपण करणे, पशू-पक्षांना दाणा-पाणी देण्याचे काम करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. त्याच बरोबर ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या तिन्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. वृक्षारोपण केल्याने सावली मिळते.
अक्षय तृतीया ह्या दिवसाला सत्ययुग व त्रेता युगची सुरवात झाली.
अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी माता गंगा ह्याचा उगम झाला.
अक्षय तृतीया ह्या दिवशी वेद व्यास ह्यांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरवात केली होती.
अक्षय तृतीया ह्या दिवशी बद्रिनाथ ह्या चारधाम पैकी एक धाम ह्याचे दरवाजे उघडले जातात व त्या दिवशी पासून दर्शन घ्यायला मिळते.
अक्षय तृतीया ह्या दिवशी महाराष्ट्र मधील कोकण ह्या भागात पहिल्यांदा देवा समोर आंब्याच्या नेवेद्य दाखवतात मग बाजारात आंबे विकायला कढतात. अक्षय तृतीया ह्या दिवसाला आंब्याचे खूप महत्व आहे. तसेच आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यांच्या रंग व सुगंध आपल्याला मोहवून टाकतो. ह्या दिवशी जास्ती करून लोक आंब्याचा पदार्थ बनवून देवाला नेवेद्य दाखवतात.
आपण ह्या लेखात आंब्याचा रस वापरुन त्याच्या पासून नानाविध पदार्थ बनवू शकतो. त्याची लिंक खाली दिली आहे तेथे क्लिक करून आपण पाहू शकता.
आंब्याच्या अप्रतिम नानाविध पदार्थ
तसेच अक्षय तृतीया पूजाविधी, मुहूर्त काय आहे त्याची लिंक येथे दिली आहे.
अक्षय तृतीया 2022 शुभ मुहूर्त, पूजाविधी, दानधर्म
तसेच अक्षय तृतीया ह्या दिवशी कोणत्या रशिनी कोणती खरेदी करायची व काही उपाय दिले आहेत.
अक्षय तृतीया 2022 जरूर करा हे उपाय आपले भाग्य चमकेल व राशीनुसार खरेदी