घरच्या साहित्यामध्ये 5 मिनिटात मॅंगो कुल्फी बिना गैस बिना दूध
आता आंब्याचा सीझन चालू आहे. तर आपण आंब्याचा रस वापरुन बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये गरमी सुद्धा खूप आहे तर रोज आपल्याला मिल्कशेक किंवा आइसक्रीम किंवा कुल्फी थंडगार खावीशी वाटते.
The Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Video In Marathi be seen on our You tube Chanel Mango Kulfi Without Milk And Gas
आपण ह्या अगोदर 2-3 प्रकारची कुल्फी कशी बनवायची ते पहिले पण त्यासाठी दूध आटवावे लागते मग कुल्फी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो.
आज आपण बिना गॅस बिना दूध कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अश्या प्रकारची मॅंगो कुल्फी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. आपल्याला फक्त कमी साहित्य ब्लेंड करून कुल्फी बनवायची आहे. आपण मिक्सरच्या ज्यूसरच्या भांड्यात किंवा हँड मिक्सर किंवा विस्क करून सुद्धा कुल्फीचे मिश्रण बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 6 कुल्फी
साहित्य:
1 कप मॅंगो पल्प
1 कप क्रीम (अमूल किंवा वीप्पक्रीम)
4 टे स्पून पिठीसाखर
4 टे स्पून मिल्क पाउडर
रेफ यल्लो कलर (एच्छीक)
कृती: हापूस आंब्याचा रस काढून घ्या. मिक्सरच्या ज्यूसर भांड्यात आंब्याचा रस, मिल्क पाउडर, क्रीम व एक चिमूट रेफ यल्लो कलर (एच्छीक) घालून ब्लेंड करून घ्या.
मग कुल्फी बनवण्याचे मोल्ड घेऊन त्यामध्ये बनवलेले मिश्रण घालून फ्रीजरमध्ये 2-3 तास सेट करायला ठेवा.
2-3 तासा नंतर थंडगार कुल्फी सर्व्ह करा.