खरबुजचे सॅलड मस्क मिलन सलाद वेटलॉस रेसीपी
उन्हाळा सीझन आलाकी आपल्याला बाजारात सर्वत्र खरबूज दिसतात. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहित करतो.
खरबूज हे आपल्याला शारीरिक दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने बरेच रोग बरे होतात. खरबूज मध्ये कैल्शियम, आयरन, विटामिन ए व विटामिन सी आहे. टे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. खरबूजमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात व फायबर जास्त प्रमाणात आहे फायबर मुळे वजन कमी होण्यास मदत होते. खरबूजच्या सेवनाने लवकर भूक लागत नाही.
The Healthy Kharbuja Che Salad Musk Melon Salad For Weight Loss Video In Marathi be seen on our You tube Chanel Healthy Kharbuja Che Salad Musk Melon Salad
खरबूजमध्ये विटामीन सी व बिटा कैरोटीन आहे त्यामुळे कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. मधुमेही साठी खरबूज हे फायदेमंद आहे. त्याच बरोबर हृदयाचे आरोग्य चांगले राहते. डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे खरबूज. व मोतीबिंदू होण्यापासून बचाव होऊ शकतो. महिलांसाठी तर अगदी उपयुक्त आहे खरबूज
खरबूजचे सॅलड खूप छान टेस्टि लागते. तसेच बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. आपल्याला भूक लागली तर आपण पटकन असे सॅलड बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
2 कप खरबूज
2 टी स्पून साखर
¼ टी स्पून काळेमीठ
¼ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून पुदिना पाने
कृती: प्रथम खरबूज स्वच्छ धुवून, सोलून चिरून घ्या. पुदिना पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या.
एका बाउलमध्ये खरबूजचे तुकडे घ्या. त्यावर काळेमीठ, लाल मिरची पावडर, लिंबुरस व चिरलेली पुदिना पाने घालून मिक्स करून फ्रीजमध्ये सॅलड थंड करायला ठेवा.
थंडगार खरबूजचे सॅलड सर्व्ह करा.