झणझणीत कोकणी पद्धतीने सोडे भात ड्राय प्रॉन राईस
कोकण ह्या भागात मासे हे मुबलक प्रमाणात मिळतात. त्याच बरोबर येथे सुके मासे, सोडे सुद्धा मिळतात. आपण ह्या अगोदर सोडे वापरुन पोहे कसे बनवायचे ते पहिले आता आपण सोडे वापरुन भात कसा बनवायचा ते पाहू या.
The Kokani Style Sode Bhat Dry Prawns Rice Video In Marathi be seen on our You tube Chanel Kokani Style Sode Bhat Dry Prawns Rice
सोडे भात बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. त्याच बरोबर तो मस्त टेस्टी सुद्धा लागतो. सोडे म्हणजेच सुकवलेली कोळंबी होय. प्रतेक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने सोडे भात बनवला जातो. पण आपण आज कोंकणी पद्धतीने सोडे भात कसा बनवायचा ते पाहू या तेपण मस्त झणझणीत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 1/2 कप बासमती तांदूळ
3/4 कप सोडे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 मध्यम आकाराचा बटाटा
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून ओला नारळ वाटून
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
1 अंडे (उकडून सजावटी करिता
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 तमालपत्र
1 टी स्पून शाहजिरे
3 लवंग
10-12 मिरे
1 दालचीनी तुकडा
कृती: प्रथम सोडे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ धुवून बाजूला झाकून ठेवा. कांदा चिरून घ्या. बटाटा धुवून, सोलून चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या. ओला नारळ वाटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचीनी, मिरे, शहाजिरे घालून परतून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून थोडे परतून मग चिरलेला बटाटा व भिजवलेले सोडे घालून 1-2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, ओला नारळ घालून मिक्स करून तांदूळ घाला. आता तांदूळ थोडे परतून चवीने मीठ घालून मिक्स करून 3 कप पाणी घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेवून 10 मिनिट मंद विस्तवावर भात शिजवून घ्या. मधून 1-2 वेळा झाकण काढून भात वरखाली करून घ्या.
भात शिजल्यावर झाकण काढून विस्तव बंद करा. मग गरम गरम सोडे भात सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर व उकडलेले अंडे घालून सर्व्ह करा.