लेमन राइस | वरण-भात डाळ-भात खाऊन कंटाळा आला लिंबुचा भात बनवा मुले खुश
लेमन राईस ही एक मस्त पोटभरीची डिश आहे. मुलांना भूक लागली किंवा शाळेत जाताना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे किंवा नुसता लेमन राईस व एखादा तोंडी लावायला पदार्थ बनवला तरी चालते किंवा दुपारचा भात राहिला तर रात्री अश्या प्रकारचा मस्त भात बनवला छान आहे.
The Maharashtrian Style Tasty Lemon Rice Limbu Rice For Kids Video In Marathi be seen on our You tube Chanel Maharashtrian Style Tasty Lemon Rice Limbu Rice
लेमन राईस बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे व टेस्ट पण छान लागते. लेमन राईस बनवताना तुपाची फोडणी तयार करून त्यामध्ये लाल सुकी मिरची व काजू घातले आहेत त्यामुळे दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. जर आपण काजूच्या आयवजी चनाडाळ, उदीडदाळ व शेंगदाणे वापरले तरी चालेल छान टेस्ट येते.
लेमन राईस खरंहणजे साऊथ इंडियन डिश आहे. पण बनवताना ती महाराष्ट्रियन पद्धतीने बनवली आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 कप भात (मोकळा शिजलेला)
फोडणी करिता:
3 टे स्पून तूप
1 टी स्पून मोहरी
¼ टी स्पून हिंग
10-15 कडीपत्ता पाने
4-5 लाल सुक्या मिरच्या
मूठभर काजू पाकळ्या
1 लिंबू (रस काढून)
मीठ चवीने
कृती: प्रथम भात बनवून घ्या. भात बावताना त्यामध्ये थोडेसे मीठ व एक चमचा तेल किंवा तूप घाला मग थंड होऊ ध्या.
एक पॅनमध्ये तूप गरम करून मोहरी घाला, मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग, कडीपत्ता पाने, लाल सुक्या मिरच्या व काजू पाकळी घालून थोडेसे परतून घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घालून मिक्स करा. मग त्यामध्ये शिजलेला भात घालून मिक्स करून थोडा परतून घ्या. मग लिंबू रस घालून मिक्स करून विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून ठेवा.
गरम गरम लेमन राईस सर्व्ह करा मुले अगदी आवडीने खातील.