हेल्दी पालक वडी महाराष्ट्रीयन स्टाइल खमंग कुरकुरीत स्पिनच वडी
पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. भारतात पालक हा मोट्या प्रमाणात वापरला जातो. पालकमध्ये एंटी-ऑक्सीडेंट्स आहेत. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, सोडियाम, कलोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज प्रोटीन, आयर्न, विटामीन सी, विटामीन ए भरपूर मात्रा मध्ये आहे.
The Tasty Maharashtrian Style Spinach Vadi Palak Vadi In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Maharashtrian Style Spinach Vadi Palak Vadi
पालक च्या सेवनाने शरीराचे वजन घटते म्हणजेच नियंत्रणात राहते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. हाडे मजबूत बनतात. मेदूचे स्वास्थ चांगले राहते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. ब्लड प्रेशर योग्य राहते. असा आहे बहुगुणी पालक.
पालकची आपण भजी, भाजी, पुऱ्या किंवा पराठे बनवतो. पालक पनीर किंवा पालक पनीर पुलाव आपल्या आवडतीचा. पालक च्या वड्या बनवून बघा मस्त टेस्टी, कुरकुरीत लागतात. आपण जेवणात साइड डिश म्हणून बनवू शकतो. पालक च्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 12 वड्या बनतात
साहित्य:
2 कप पालक (धुवून, चिरून)
1 टे स्पून तांदळाचे पीठ
3 टे स्पून बेसन
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून तीळ
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
½ टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून तेल
मीठ चवीने
तेल पालक वडी तळण्यासाठी
कृती:
प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
एका बाउलमध्ये चिरलेला पालक, तांदळाचे पीठ, बेसन, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, तीळ, तेल व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्याची एक घट्ट वळकुटि बनवा. एका स्टीलच्या प्लेटला तेल लाऊन त्यामध्ये बनवलेली वळकुटि ठेवा.
कुकरमद्धे पाणी गरम करून त्यामध्ये बनवलेली वळकुटि ठेवा व 15 मिनिट वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून वळकुटि बाहेर काढून थंड करायला ठेवा. वळकुटि थंड झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून कापलेल्या वड्या ठेवा मग बाजूनी परत थोडे तेल सोडा व छान खरपूस पालक वड्या शालो फ्राय करून घ्या.
गरम गरम पालक वड्या सर्व्ह करा.