भगवान शंकर ह्यांचे चमत्कारी मंत्र म्हणून तुरंत मनशांति मिळवा ते कसे ते आपण पहाणार आहोत
भगवान शिव ह्यांना प्रसन्न करणारे महामंत्र जे भगवान शंकर ह्यांचा मनासारखा आशीर्वाद देतात
हिंदू धर्मामध्ये भगवान शिव हे क्रोध म्हणजेच रागीट देवता मानतात. तसेच पंच देव व त्रीदेव ह्या देवां मध्ये सुद्धा शामील केले जाते. भगवान शिव ह्यांना शंकर, आशुतोष, महादेव व भोलेनाथ ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते.
The Shiva Mantras For Mental Peace In Marathi be seen on our You tube Chanel Shiva Mantras For Mental Peace
भगवान शिव हे भक्तांना लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ ह्या नावानी सुद्धा ओळखले जाते. जे भक्त भगवान शंकर ह्यांची श्रद्धा पूर्वक पूजा अर्चा करतात त्यांना ते लवकर प्रसन्न होतात. आज आम्ही आपल्याला श्री शंकर भगवान ह्यांचे असे चमत्कारी मंत्र सांगणार आहोत त्या मंत्राचा जाप केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतील.
पंचाक्षरी शिवा मंत्र…
ॐ नमः शिवाय।।
नमः शिवाय, ॐ नमः शिवाय।।
ॐ नम: शिवाय ह्याचा अर्थ असा आहे “मी भगवान शिव ह्यांना नमन करतो.” शिव मंत्रामध्ये हा मंत्र सर्वात लोकप्रिय आहे. असे म्हणतात की श्रावण महिन्यात ह्या मंत्राचा जाप केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. व शिवरात्री ह्या दिवशी ह्या मंत्राचा 108 वेळा जाप केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पान ह्या मंत्राचा अगदी बरोबर उच्चार करून शांत चिताने केल्यास आत्मा शुद्ध होतो असे म्हणतात.
रूद्र मंत्र…
ॐ नमो भगवते रुद्राय।।
ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की “ मी पवित्र रुद्र ह्यांना नमन करतो” असे म्हणतात की ह्या मंत्राचा जाप केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर भगवान शंकर ह्यांचा आशीर्वाद मिळतो. हा मंत्र रुद्र मंत्र म्हणून सुद्धा ओळखला जातो.
रूद्र गायत्री मंत्र…
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात।।
गायत्री मंत्र हा हिंदू धर्मात सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. तसेच हा रुद्र गायत्री मंत्र सुद्धा खूप प्रभवी आहे. ह्या मंत्राचा जाप केल्यास मन शांती व स्थिर मानसिकता मिळते.
महा मृतुन्जय मंत्र…
ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टि-वर्धनम उर्वारुकमिव बन्धनं मृत्योर्मुक्षीय मामृतात।।
ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की ॐ आम्ही तुमची मनापासून पूजा अर्चा करतो. शिव आमचे जीवन खुशाल ठेवता. व निरोगी आयुष्य देता. व पुढे चालण्याची वाट दाखवता. जसे काकडी कमजोर झालीकी वेला वरून पडते व मुक्त होते. त्याच प्रमाणे आम्हाला सुद्धा मृत्यू च्या भया पासून मुक्त करून अमर होण्याचा आशीर्वाद द्या.
पण ह्या मंत्राचा जाप अश्या वेळी करतात की एकाएक संकट येवून काही अनहोनी होण्याची भीती निर्माण होते. अश्या वेळी ह्या मंत्राचा जाप केल्यास भया पासून मुक्ती मिळते. मनात शक्ति मिळण्याचे आव्हान मिळते. बरेच जन ह्या मंत्राचा जाप शारीरिक, मानसिक व स्वास्थच्या साठी फायदेमंद आहे म्हणून करतात.