वास्तु टिप्स: स्नेक प्लांट घरात लावण्याचे फायदे व दिशा
वास्तु शास्त्रा नुसार घरात स्नेक प्लांट लावण्याचे बरेच फायदे होतात.
वास्तु शास्त्रा नुसार घरात नकारात्मक ऊर्जा चा संचार वाढत असेलतर त्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होताना दिसतो. पण आपल्याला ह्याचा उपाय वास्तु शास्त्रामध्ये अगदी सहज मिळतो.
The text Vastu Tips: Benefits Of Snake Plant And DirectionIn Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Benefits Of Snake Plant And Direction
आपण आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी घरात किंवा बाल्कनीमध्ये किंवा घरा समोरील बागेत नानाविध प्रकारची झाडे किंवा रोपे लावतो त्याच्या मुळे घरातील शोभा वाढते व त्याच बरोबर त्या रोपांच्या आपल्या शरीरावर किंवा आपल्या घरातील सदस्यांवर चांगला प्रभाव पडतो. त्यातील काही रोपे ही वास्तु शास्त्रा नुसार शुभ सुद्धा मानली जातात.
मानवी जीवन हे अनेक समस्या व परेशानीनी व अनेक चढ उतरांनी भरलेले आहे. आपल्या जीवनात कोणती समस्या कधी येईल ते सांगणे कठीण आहे किंवा आपल्याला त्याची कल्पना सुद्धा येत नाही. वास्तु शास्त्रा नुसार आपण घरात काही सजीव किंवा निर्जीव वास्तु ठेवतो त्याचे काही नियम सुद्धा आहेत. आज आपण स्नेक प्लांट घरात ठेवल्याने त्याचे काय फायदे होतात ते पाहणार आहोत.
स्नेक प्लांट हे एक वास्तु शास्त्रा नुसार घरात लावण्याचे फायदेमंद रोप आहे. ते दिसायला आकर्षक दिसते तसेच ते आपण कुंडीत लावू शकतो त्याला खूप कमी पाणी लागते. जास्त पाणी घातले तर ते रोप टिकत नाही त्याच बरोबर त्याला कमी उन लागते. त्याची पाने ही वरच्या बाजूनी वाढतात व ती तलवारी सारखी दिसतात. पण ती थोडी विषारी असतात त्यामुळे लहान मुळांपासून दूर ठेवावी.
1. उन्नती व धन आकर्षणसाठी:
वास्तु शास्त्रा नुसार घरात स्नेक प्लांट लावल्याने परिवारातील सदस्यांची उन्नती होण्यास सुरवात होते. स्नेक प्लांट घरात लावणे खूप शुभ मानले जाते. त्याच्या सकारात्मक ऊर्जा मुळे घरात धन आकर्षण होण्यास मदत होते.
2. परिवारातील सडस्यांण मध्ये प्रेम वाढते:
वास्तु शास्त्रा नुसार स्नेक प्लांट चा प्रभाव आपल्या घरावर अश्या प्रकारे होतो की घरातील वातावरण खुश म्हणजेच आनंदी होते. व परिवारातील सदस्यांमद्धे प्रेम वाढते.
3. स्नेक प्लांट ला नेचुरल एयर प्यूरीफायर मानले जाते. त्याच बरोबर घरात हे रोप लावल्याने मानसिक शांती व सुकून प्राप्त होतो.
4. घरात स्नेक प्लांट लावल्याने नोकरी व व्यापारमध्ये लाभ प्राप्त होतात.
5. आपल्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेलतर मुलांच्या स्टडी टेबलवर स्नेक प्लांट ठेवा. त्यांच्या मुळे मुलांच्या मनाची एकाग्रता वाढेल त्याच बरोबर जर आपल्याला ऑफिसमध्ये उन्नती पाहिजे असेलतर ऑफिस मधील टेबलवर स्नेक प्लांट ठेवा.
6. रात्रीसुद्धा घरातील हवा फिल्टर करते:
स्नेक प्लांट घरातील हवा फिल्टर करते. स्नेक प्लांट रात्री ह्याची एक चांगली गोष्ट ही आहे की रात्री सुद्धा कार्बन डाइऑक्साइड (CO2) ला ऑक्सीजन मध्ये बदलू शकते. हे रोप बेडरूममध्ये ठेवण्यासाठी एक आदर्श मानले जाते कारणकी ते कार्बन डाइऑक्साइड (CO2)ला ऑक्सीजनमध्ये बदलण्यास मदत करू शकते. त्याच बरोबर हवेतील विषारी वायु कण नष्ट करू शकते.
स्नेक प्लांट घरात कोणत्या दिशेला लावावे:
वास्तु शास्त्र नुसार घरात स्नेक प्लांट लावण्याची सर्वात चांगली दिशा म्हणजे दक्षिण-पूर्व हा कोन किंवा दक्षिण-पूर्व दिशा मानली जाते. स्नेक प्लांट ला दुसऱ्या कोणत्या सुद्धा रोपान बरोबर किंवा झाडान बरोबर ठेवू नये. किंवा जर आपण ड्रॉइंग रूम म्हणजेच हॉलमध्ये ठेवणार असाल तर अश्या ठिकाणी ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्याच्या वर डायरेक्ट पडेल.