शंकर भगवान ह्यांचे सोमवारचे 10 शुभ उपाय, दान धर्म व मंत्र
धार्मिक शास्त्रा नुसार सोमवार हा दिवश भगवान शंकर ह्यांना प्रसन्न करणार दिवस मानला जातो. शिव हे देवांचे देव मानले जातात. जर आपण कोणत्या संकटात किंवा परेशानी मध्ये आहात तर भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा, दान धर्म व मंत्र जाप केल्यास आपली संकटा पासून मुक्ती होऊ शकते.
The text Shiv Bhagwan Ke Powerful Upay Dan And Mantra Marathi be seen on our You tube Chanel Shiv Bhagwan Ke Powerful Upay Dan And Mantra
शंकर भगवान ह्यांना प्रसन्न करण्यासाठी 10 शुभ उपाय, 10 दान व 5 मंत्र दिले आहेत.
सोमवार ह्या दिवशी 10 सरळ सोपे उपाय:
1. सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून त्या पाण्यानी आंघोळ करा.
2. गंगा जल किंवा पाण्यानी भगवान शिव ह्यांना अभिषेक करा.
3.सोमवार च्या दिवशी आपल्या कामात सफलता मिळण्यासाठी शिवलिंगवर दूध अर्पित करा.
4.जर सोमवार ह्यादिवशी शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठी देवळात जाणे संभव नसेलतर घरातून निघताना दूध किंवा पाणी पिऊन निघा.
5.आपल्या महत्वाच्या कामात जर अडचणी येत असतील तर सोमवार ह्या दिवशी दूध व तांदूळ ह्याची खीर बनवून ती भगवान शंकर ह्यांना भोग म्हणून दाखवावी किंवा गरीब लोकांना दान करावी त्यामुळे पुण्य मिळेल व आपल्या कामात सफलता मिळेल.
6.पांढरा रुमाल आपल्या बरोबर ठेवा.
7.पांढऱ्या रंगाचे फूल शंकर भगवान ह्यांना अर्पित करा.
8.आपली मनोकामना किंवा हेतु पूर्ती होण्यासाठी दूध, दही, मध, काळे तीळ, ह्या मधील कोणत्या सुद्धा एकाचा अभिषेक शिवजी ह्यांच्या वर करावा.
9.घरातून बाहेर निघताना किंवा कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाताना ॐ श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम: हा मंत्र म्हणून घराच्या बाहेर पडावे.
10.ज्या व्यक्तिना जास्त प्रमाणात राग येतो त्यांनी सोमवार च्या दिवशी चांदीच्या अंगठीत मोती धारण करावा.
सोमवारच्या दिवशी 10 दान काय करावे.
तांदूळ, दूध, साखर, पांढरे वस्त्र किंवा शिवलेले वस्त्र, नंदी बैलला हिरवा चारा खाऊ घाला, चांदी, गरीब लोकांना जेवण, काळ्या मुंग्याना साखर, पांदऱ्या गाईला रोटी व गुळ, मछली म्हणजे मासे हयाना पिठाचे गोळे खाऊ घालावे.
सोमवारी म्हणायचे 5 मंत्र:
1. ॐ शिवाय नम:
2. ॐ ह्रीं नम: शिवाय ह्रीं ॐ।
३. ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रुद्र प्रचोदयात।
४. ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम मंत्र|
५. ॐ नमः शिवाय।