घरचा वैद्य | आजीचा बटवा | आजीचे 5 घरगुती अचूक उपाय डॉक्टर सुद्धा मानतात
Home Remedies backed by Doctors and Medical Science
आपण आपल्या घरात पहात असाल की आपली आजी तब्येत बरी नसली की घरगुती उपाय सांगत असते व ते घरगुती उपाय इतके सोपे व बिन खर्चाचे असतात व त्याच्या मुळे लवकर आराम सुद्धा मिळतो. असे आजीचे उपाय हे पूर्वीच्या काळा पासून चालत आले आहेत व घरातील व्यक्ति सुद्धा हे उपाय नियमित करीत आहेत.
The text Home Remedies | Gharcha Vaidya | Aajicha Batwa in Marathi be seen on our You tube Chanel Home Remedies | Gharcha Vaidya | Aajicha Batwa
आपली तब्येत बरी नसली तर लगेच एलोपेथी औषधे घेण्याच्या अगोदर आजीच्या बटव्या मधील आधी घरगुती औषध उपचार करून पहा व हे उपाय करताना भरोसा ठेवून करा त्यांनी नक्की लवकर बरे वाटेल कारण की डॉक्टर सुद्धा हे घरगुती उपाय आचरणात आणून त्यावर विश्वास ठेवून करायला सांगत असतात.
आजीचे घरगुती उपाय किंवा आजीच्या बटव्यातील अचूक उपाय काय आहेत ते आपणच उघडून पाहू या:
आपल्याला माहिती असेलच की सर्दी-खोकला किंवा डोके दुखत असेलतर आपण तुळशीच्या पानांचा काढा किंवा तुळशीच्या पानांचा चहा सेवन केला की आराम मिळतो. जर पडून लागले किंवा जखम झाली तर हळदीचे दूध सेवन केल्यास दुखणे कमी होते. मध व आल सेवन केल्यास खोकला बरा होतो. असे काही घरेलू उपाय आहेत जे आपण पूर्वीच्या काळा पासून करीत आलो आहोत. तसेच आपण आपल्या घरात सुद्धा पहात असाल की आपली आजी सुद्धा हे उपाय करायला सांगते. व डॉक्टर सुद्धा असे उपाय करायला सांगतात कारणकी हे उपाय ते सुद्धा मानतात.
आपण जे हे घरगुती उपाय करतो त्याचा काही दुष्परिणाम होत नाही.
आपण जे घरगुती उपाय करीत असतो त्यामध्ये आपण साध्या सोप्या वास्तु वापरत असतो जसे की मध, फळ, नैचरल ऑइल किंवा जड़ी बुटी वगैरे. सर्दी खोकला हे कॉमन आजार आहेत व त्यासाठी घरगुती इलाज केले तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होत नाहीत. पण त्याचे अति सेवन सुद्धा करू नये.
आज कालच्या काळात हे घरगुती उपाय खूप लोकप्रिय होत चालले आहेत. त्यातील पाच महत्वाचे घरगुती नुस्खे म्हणजेच उपाय आपण पाहणार आहोत.
1. पोट दुखत असेलतर लिंबाच्या रसात सेंधा नमक काळे मीठ घालून सेवन करा.
नैचरल मिनरल्स युक्त काळे मीठ सर्वात शुद्ध असते व पांढऱ्या मीठा पेक्षा चांगले असते. तसेच ते पचाण क्रिया चांगली करते. तर लिंबाच्या रसामद्धे काळे मीठ घालून सेवन केल्यास पोटातील गॅसच्या समस्या सुद्धा दूर होतात. त्याच बरोबर ढेकर येवून गॅस बाहेर येतो. त्याच बरोबर जर पोत फुगले असेलतर ते सुद्धा कमी होते.
2. हळद दुधामध्ये उकळून घेणे हे एक सर्वात चांगले कॉम्बिनेशन आहे. दुधामध्ये प्रोटीन आहे ते जखम भरण्यासाठी मदत करते. त्याच बरोबर हळदीमध्ये ऐंटी-इन्फ्लेमेट्री प्रॉपर्टीज आसतात ते मसल्स वरती आलेली सूज व जळजळ कमी करते. हळदी मध्ये कर्क्यूमिन आहे ते स्ट्रॉन्ग ऐंटिऑक्सिडेंट आहे जे इम्यून सिस्टम मजबूत बनवण्यास मदत करते.
पण गोष्ट लक्षात ठेवा हळदीच्या दुधाचा वापर हा छोटी जखम असेलतर करावा नाहीतर डॉक्टरी इलाज घ्यावा.
3. मध व आले कफ दूर करते
आले पाण्यात उकळून घ्या मग मधा बरोबर सेवन करा. जर घशात कफ असेल किंवा घसा खवखवत असेलतर त्यासाठी आले व मध सेवन करावे. कारण ह्याच्यामध्ये ऐंटिऑक्सिडेंट सुद्धा आहे. जे बीमारी पासून राहत देते. आले मधा नरोबर सेवन केल्याने घशतील सूज व जळजळ कमी होते. जर डायबीटीज असेलतर त्यांनी मध कमी प्रमाणात सेवन करावे.
मधामध्ये मिरे पावडर मिक्स करून त्याचे चाटण एक-एक तासांनी घ्यावे घशातील कफ कमी होतो.
4. फ्लू व कॉमन कोल्ड दूर करण्यासाठी सेवन करा सूप
फ्लू व कॉमन कोल्ड झाले असेलतर ऐंटिबायॉटिक्सचा फारसा उपयोग होत नाही. कारणकी हा आजार वायरास पासून होतो. तसेच कॉमन कोल्डसाठी औषध घेऊन लगेच ठीक होऊ शकत नाही. फक्त इलाज करून ठीक करू शकतो. अश्या वेळी मस्त पैकी गरम गरम सूप घेतले तर त्याचा फायदा होतो. घशात खवखव होत असेलतर ती कमी होते. तसेच शरीर सुद्धा हाइड्रेट होते. व रिकवर होण्यास मदत होते. सूप पिण्याने आपल्याला बरे वाटते पण 36 तास होऊन सुद्धा बरे वाटत नसेलतर डॉक्टरि इलाज जरूर घ्यावा.
5. माइग्रेन व ऐंग्जाइटीसाठी लैवेंडर ऑइल
जर डोके दुखत असेल किंवा माइग्रेनचा अटैक असेल किंवा बेचैनी व चिंता वाटत असेलतर अश्या वेळी लैवेंडर ऑइलचा वास घेतल्यास आपला त्रास कमी होऊ शकतो. लैवेंडरचा चहा किंवा लैवेंडर ऑइल रुमालाला लाऊन किंवा टिशू पेपरवर लाऊन वास घेत राहिल्यास ऐंग्जाइटी कमी होते. त्याच बरोबर डोके व शरीर रिलैक्स होते. व स्ट्रेस लेवल पण कमी होते.
जर माइग्रेनचा त्रास होत असेलतर लैवेंडर हे औषध म्हणून उपयोग होऊ शकत नाही कारणकी फक्त थोडा वेळ बरे वाटेल अश्या वेळी डॉक्टरचा सल्ला घेणे उचित आहे.