हेल्दी गव्हाच्या पिठाचे चॉकलेट बिस्किट अगदी बेकरी सारखे
बिस्किट हा पदार्थ असा आहे की सर्वाना आवडतो. लहान असो किंवा मोठे असो. बिस्किट कधी सुद्धा खायला आवडतात भूक लागली तर किंवा ब्रेकफास्ट किंवा दुपारी चहा बरोबर किंवा घरात पाहुणे आले की सुदा पटकन सर्व्ह करता येतात.
आपण घरच्या घरी झटपट अगदी बेकरी सारखी चॉकलेट बिस्किटस घरी बनवू शकतो. चॉकलेट बिस्किट किंवा चॉकलेट कुकीज बनवायला अगदी सोपी आहेत व झटपट काही कष्ट ण करता पाहिजे तेव्हा बनवू शकतो.
आपण आज गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवणार आहोत त्यामध्ये कोको पावडर घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. तसेच आपण तूप वापरणार आहोत. गव्हाचे पीठ, तूप कोको पावडर व पिठीसाखर वापरल्यामुळे बिस्किट छान हेल्दी बनतील.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 20 मिनिट
वाढणी: 40 बिस्किट बनतात
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
½ कप बेसन
½ कप कोको पाऊडर
¾ कप तूप
¾ कप साखर (ग्राइंड करून घ्या)
1 टी स्पून वेलची पावडर
2-3 टे स्पून दूध
¼ टी स्पून मीठ
कृती: एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, बेसन, कोको पाऊडर, मीठ मिक्स करून बाजूला ठेवा. किंवा चाळून घेतले तरी चालेल.
दुसऱ्या एका बाउलमध्ये तूप व पिठीसाखर चांगली मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू गव्हाचे पीठ घालत मिक्स करत जा. आता त्यामध्ये थोडे थोडे दूध मिक्स करत जा हळू हळू पीठ घट्ट होत जाईल आता त्याचा एक चांगला घट्ट डो बनवून घेऊन मग त्याचे दोंन भाग करून घ्या.
एक भाग घेऊन पोळपाटावर परत मळून घ्या. मग त्याची एक वळकुटि बनवून घ्या. आता सूरीच्या सहायानी गोल गोल पातळ चकत्या कापून घ्या. मग दूसरा भाग घेऊन त्याची छान गोल वळकुटि बनवून त्याच्या पण गोल गोल पातळ चकत्या कापून घ्या.
बेकिंग ट्रेला थोडेसे तूप लाऊन त्यावर जेव्हडया बसतील तेव्हडया कापलेल्या चकत्या ठेवा. मायक्रोवेव्ह् ओव्हन प्रीहीट करून कनव्हेकशन मोड वर सेट करून 20 मिनिट बेक करून घ्या. अश्या प्रकारे सर्व्ह चॉकलेट बिस्किट बेक करून थंड करून मग सर्व्ह करा किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवा.