केवडा फक्त सुगंधच देत नाहीतर बऱ्याच रोगांवर फायदेमंद
केवडा हे रोप आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. केवडा हे एक सुगंधी झाडाची एक जात आहे. खरं म्हणजे केवडा हे जंगलमद्धे जास्ती करून येते. केवड्याचे झाड हे पातळ, दाट व त्याची पाने काटेदार असतात. केवडा ह्या झाडांमद्धे दोन प्रकारच्या जाती पहायला मिळतात. एक पांढरा केवडा व दूसरा पिवळा केवडा म्हणजे केतकी होय. केतकी म्हणजे पिवळा केवडा खूप सुगंधी असतो. व त्याची पाने सुद्धा छान कोमल असतात.
The text Health And Skin Benefits of Kewda Plant in Marathi be seen on our You tube Chanel Health And Skin Benefits of Kewda Plant
श्रावण भाद्रपद महिना आला की आपल्याला बाजारात केवडा पहायला मिळतो. आपण बाजारात गेलो की त्याचा मोहक सुगंध आपल्याला मोहून टाकतो. गणपती बाप्पाना आपण गणपती उत्सव मध्ये केवड्याचे पान अर्पित करतो कारणकी त्याना केवडा खूप प्रिय आहे तसेच गौरी च्या येथे पण आपण अर्पित करतो. आपल्या घरात केवड्याचा सुगंध छान दरवळतो त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते.
ओडीसा मध्ये केवड्याच्या फुलाला फुलांचा राजा मानले जाते. केवड्याचे फूल सुरवातीला पांढऱ्या रंगाचे असते म्हणून त्याला पांढरे कमळ असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये जडीबुटी वापरुन जवळपास 12 हजार औषधे बनवली जातात. त्याच्या मध्ये केवडा सुद्धा आहे. संशोधनात असे दिसून आलेकी केवडा मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आता आपण पाहू या ह्या औषधी सुगंधी केवड्यामध्ये काय काय फायदे व नुकसान आहे.
केवड्याचे आयुर्वेदिक गुणधर्म:
केवड्याच्या फुला पासून केवड्याचे पाणी व तेल बनवले जाते. ते आपले आरोग्य व अजून काही गोष्टीसाठी गुणकारी आहे.
केवड्याच्या पाण्याचा वापर म्हणजेच केवडा एसेन्स चा वापर मिठाई, एसेन्स व कोल्ड ड्रिंक बनवण्यासाठी केला जातो.
केवड्याचा सुगंधानी मनशांती मिळते.
केवड्यामध्ये एंटीफंगल एंटी बैक्टीरियल गुण आहेत त्यामुळे कोणतेसुद्धा रोग पसरण्यापासून थांबवले जाते.
केवड्याचा एसेन्स वापरुन बनवलेले पदार्थ आपले मन संतुष्ट करते.
केवड्याचे तेल आयुर्वेदिक दृष्टीने लाभदायक आहे ह्याच्या तेलाचा उपयोग डोकेदुखी व काही रोगांवर केला जातो.
केवड्याच्या फुलांमद्धे शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गुण आहेत.
केवड्याची पाने विषनाशक आहेत. त्याचा उपयोग विषाचा प्रभाव कमी करण्यास केला जातो. त्याच बरोबर केवड्याच्या पानांचा उपयोग खाज, कुष्टरोग बरा करण्यास सुद्धा केला जातो. केवड्याची पाने वाटून त्याचा लेप स्कीनवर लावला तर बरेच रोग बरे होण्यास मदत मिळते.
केवड्याची पान उकळून त्याचा काढा बनवून रोज सेवन केल्यास बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते. ते शरीर, हवा व वातावरणला सुवासिक बनवण्यास मदत करते.
केवड़ा चे हेल्थ बेनिफिट्स – Health Benefits of Kewra
डोकेदुखीवर फायदेमंद:
आपले किती सुद्धा डोके दुखू दे किंवा दुखत असेलतर केवड्याचे तेल डोकेदुखी मिनटात पळवून लावले. त्यासाठी डोके दुखी चालू झालीकी केवड्याचे तेल वापरुन मालीश करा.
तापामध्ये फायदेमंद: Beneficial in Feaver
ताप आला असेलतर शरीरामद्धे कमजोरी म्हणजेच थकावट येते त्यामुळे आपल्याला आपण जास्तच आजारी आहोत असे वाटते. अश्या वेळी केवड्याचा रस 40 ते 60 मिलिलीटर सेवन केल्यास ताप निघून जाईल व शरीर ताजे तवाने वाटेल.
सांधेदुखी पासून आराम:
केवड्याचा अर्क शररातील काही दुखरे भाग म्हणजेच सांधेदुखी पासून आराम देते. रोज केवड्याचा तेलानी मालीश केल्यास गाठिया सारखे रोग अगदी मुळा पासून नष्ट होतात.
मासिक पीरियड मध्ये लाभकारी – Beneficial in Periods
जर कोणत्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी नेहमी पेक्षा जास्त रक्त स्त्राव होत असेलतर केवड्याच्या मुळाचा काही भाग पाण्यामध्ये उगाळून साखरे बरोबर सेवन केल्यास मासिक पाळीच्या वेळी होणारा जास्तीचा रक्त स्त्रावच्या परेशानी पासून आराम मिळतो.
पोटा संबंधित तक्रारी:
पोटाच्या आजारांपासून त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी केवडा खूप फायदेमंद आहे. त्याचा उपयोग पोटातील जळजळ, पोटदुखी, गॅस ब्लोटिंग सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
तनाव करते दूर:
एक्स्पर्टच्या म्हणण्या नुसार केवडा हा तनाव दूर करण्यास प्रभावी व रामबाण उपाय आहे. खर म्हणजे केवड्याच्या पानात एंटी- स्ट्रेस एजेंट आहेत. ते आपला तनाव व मानसिक असंतुलन ठीक करते. त्याच बरोबर त्याचा सुगंध मानसिक शांती देते.
कॅन्सर पासून बचाव: Prevent Cancer
काही शोधामध्ये केवडा कॅन्सरच्या इलाजासाठी फायदेमंद आहे. खर म्हणजे केवडा मध्ये असे काही एंटी ऑक्सीडेंट आहेत जे कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार करण्यास फायदेमंद आहेत.
भूक वाढवण्यास मदत करते:
केवडा भूक वाढवण्यास मदत करते. केवडायचा अर्क नियमित पणे सेवन केल्यास भूक वाढवण्यास मदत करते.
केवड्याचे ब्युटी बेनीफिट:
केवडा हा एक पारदर्शक पदार्थ आहे. ते साधारणपणे गुलाब पाणी सारखेच असते. आपल्याला केवड्याचे सुगंधी पाणी माहीत असेलच. केवड्यामध्ये बेस्ट एंटीऑक्सीडेंट गुण आहेत. गुलाबपाणी सारखे केवडा पाणी सुद्धा स्कीन साठी फायदेमंद आहे. केवड्याचे पाणी स्कीनला चमकदार, मुलायम व बेदाग ठेवण्यास मदत करते. चलातर मग आपण पाहूया केवड्याचे आपल्या सौदऱ्यासाठी काय काय फायदे आहेत.
स्किनसाठी केवड़ा के फायदे – Kewra Benefits for Skin
केवडा एक चांगले क्लींजर म्हणजे स्कीन स्वच्छ करण्याचे काम करते व स्कीन मधील घाण किंवा शुद्ध घाण मोठ्या सफाईनी बाहेर काढते.
एक चांगले टोनरचे काम करते. ते स्कीनची उघडी छिंद्र बंद करते. चेहऱ्यावर चमक आणते. केवड्या मधील एंटी एंजिग गुण स्किनला पोषण देते. त्यामुळे आपली स्कीन ताजीतवानी व तरुण राहते. केवडाचे पाणी अगदी कमी खर्चात चांगले रेजल्ट देते. केवड्याचे पाणी आपली स्कीन बेदाग, मुरूम पुटकुल्या कमी करण्यास मदत करते.