श्रावण महिन्यात सुख समृद्धीसाठी 5 सोपे सटीक उपाय करून शिव परिवारची मिळवा कृपा
श्रावण महिन्यात मनुष्य, निसर्ग व सर्व जीवजंतु ह्यांच्या साठी आनंदी असतो. कारणकी ह्या महिन्यात चारी बाजूला आपल्याला हिरवी गार झाडे व फुले दिसतात. श्रावण महिना भगवान शिव ह्यांना खूप प्रिय आहे. तसेच श्रावण महिन्यातील केलेले उपास व पूजा अर्चा त्यामुळे आपल्याला तुरंत फळ प्राप्त होते.
The text Shravan Mahina 5 Satik Upay Sukh Samridhi Sathi in Marathi be seen on our You tube Chanel Shravan Mahina 5 Satik Upay Sukh Samridhi Sathi
सुख समृद्धीसाठी श्रावण महिन्यात 5 सोपे उपाय करून शिव परिवाराची कृपा मिळवा.
श्रावण आता चालू झाला आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण ह्या महिन्याचे खूप महत्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांचे सोमवारचे व्रत केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात व आपल्या भक्तांची मनोकामना लवकर पूर्ण करतात. आता आपण पाहू या की श्रावण महिन्यात कोणते असे.
भगवान शिव ह्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात. असे म्हणतात की ते आपल्या भक्तांच्या एका हाकेला धाउन येतात. आपण पहात असालकी भगवान शिव ह्यांचे भक्त हे इतर देवांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच श्रावण महिन्यात शिव भक्त जास्त पहायला मिळतात. कारण की भगवान शिव ह्यांची श्रावण महिन्यात पूजा अर्चा व्रत केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते. त्याच बरोबर सांसारिक व आध्यात्मिक सुख प्राप्त होते.
चला तर मग आता पाहू या की असे कोणते उपाय आहेत ते केलेतर सुख समृद्धी प्राप्त होईल.
- सोमवार ह्या दिवशी उपवास केल्यास विशेष लाभ होतात:
श्रावण महिन्यात सोमवार ह्या दिवसाचा उपवास केला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनातील चंचलता दूर होईल. त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्याच बरोबर अशुभ ग्रह व नक्षत्राचा प्रभाव दूर होतो. तसेच मुश्किल काळात म्हणजेच कठीण काळात सुद्धा आपण परिस्थितीशी सामना करू शकतो. भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद मिळतो.
- शिवलिंगवर दुधाचा अभिषेक करा:
तसे पहायला गेले तर भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा केल्याने शुभ फळ मिळते व श्रावण महिन्यात शिवलिंगवर दूध अर्पित करणे शुभ मानले जाते. व त्यांचा आशीर्वाद मिळतो. आपले मन घट्ट होते. कारणकी मनाचा कारक चंद्र आहे जो भगवान शिव ह्यांच्या डोक्यावर विराजमान आहे. श्रावण महिन्यात शिव लिंगवर रोज दुधाचा अभिषेक केल्याने आपला चंद्र हा ग्रह मजबूत होतो. व मनाची चंचलता कमी होते. त्याच बरोबर भगवान शिव ह्यांना केशर मिक्स करून खीर अर्पित करा असे केल्याने नोकरी व्यवसायात लाभ होतात.
- महामृत्युंजय मंत्र चा जाप जरूर करावा:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।
श्रावण महिन्यात रोज महामृत्युंजय मंत्र जाप करावा असे केल्याने आपले आरोग्य चांगले रहाते. शास्त्रामध्ये स्वस्थ शरीर हेच संपन्नताचे प्रतीक आहे. आपले आरोग्य चांगले असेलतर आपल्याला आपल्या जीवनात सफलता मिळू शकेल. म्हणूनच श्रावण महिन्यात रोज महामृत्युंजय मंत्र म्हणा. तसेच मंत्र जाप केल्याने आपले मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते.
- ह्या वस्तु भगवान शिव ह्यांना अर्पित करा:
भगवान शिव ह्यांना भांग, धतुरा व बेलपत्र म्हणजेच बेलाची पाने अर्पित करणे शुभ मानले जाते. जर श्रावण सोमवारी ह्या वस्तु शिवालयमध्ये जाऊन अर्पित केल्यास भोलेनाथ ह्यांचा आशीर्वाद मिळतो व जीवनात धन-धान्याची कमतरता होत नाही व जीवनातील सर्व बाधा व अडचणी निघून जातात.
- श्रावण महिन्यात खाण्या पिण्यावर लक्ष ठेवा:
भगवान शिव ह्यांची कृपा मिळण्यासाठी खाण्या पिण्यावर विशेष लक्ष ठेवा. ह्या महिन्यात आपल्याला मांस, मासे दारू व त्याच बरोबर तामसी भोजन करणे टाळावे. ह्या महिन्यात दूध नाही पिले पाहिजे कारणकी आपण श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांना दूध अर्पित करतो. त्याच बरोबर श्रावण महिन्यात दूध न पिण्याची अजूनही काही कारणे आहेत.