श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त, महत्व पूजाविधी व कथा
श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष ह्या तिथीला जी एकादशी येते तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. एक पुत्रदा एकादशी पौष महिन्यातील शुल्क पक्ष ह्या तिथीला येते व दुसरी पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यात शुल्क पक्ष ह्या तिथीला येते. ह्या वर्षी 8 ऑगस्ट 2022 सोमवार ह्या दिवशी पुत्रदा एकादशी ह्या दिवशी उपवास करायचा आहे. पुत्रदा एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी उपवास केल्यास संतान प्राप्ती होते व त्याना कष्टा पासून मुक्ती मिळते.
The text Shrawan Putrada Ekadashi 2022 Shubh Muhurtha, Mahatw, Puja Vidhi W Katha Sathi in Marathi be seen on our You tube Chanel Shrawan Putrada Ekadashi 2022
पुत्रदा एकादशी 2022 शुभ मुहूर्त:
श्रावण पुत्रदा एकादशी सोमवार 08 ऑगस्ट 2022
एकादशी प्रारंभ 7 ऑगस्ट रविवार सकाळी 11 वाजून 50 मिनिट
एकादशी समाप्ती 8 ऑगस्ट मंगळवार रात्री 9 वाजे पर्यन्त
पुत्रदा एकादशी महत्व:
असे म्हणतात की पुत्र प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी च्या दिवशी व्रत ठेवले जाते. ज्यांना पुत्र नाही त्यांच्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत हे लाभदायक आहे. तसेच ह्या दिवसाचे व्रत ठेवल्यास भगवान विष्णु ह्यांची कृपा राहते.
एकादशी व्रत पूजा अथवा पूजा विधि:
सकाळी लवकर उठावे व स्वच्छ स्नान करावे.
घरातील पूजायघर स्वच्छ करून दिवा लावावा.
भगवान विष्णुना गंगाजल नी अभिषेक करा.
भगवान विष्णु ह्यांना फूल व तुलसी अर्पित करा.
शक्य असेलतर ह्या दिवशी उपवास करावा.
भगवान ह्यांची आरती करावी.
मग भगवान विष्णु ह्यांना भोग म्हणजेच नेवेद्य दाखवावा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भोग दाखवताना सात्विक पदार्थाचा भोग दाखवावा. त्यामध्ये तुलसी पत्र जरूर ठेवावे. असे म्हणतात की भगवान विष्णु ह्यांना तुळस प्रिय आहे त्यामुळे भोगमध्ये जरूर ठेवावे नाहीतर ते भोग ग्रहण करीत नाहीत.
पुत्रदा एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी. पूजा करताना पुढील गोष्टी जरूर वापराव्या. धूप, दीप, फूल व हार, रोली, व नेवेद्य च्या बरोबर 16 अजून साहित्य भगवान विष्णु ह्यांना अर्पित कराव्या. भगवान विष्णु हयना तुळस जरूर अर्पित करावी. त्याच्या शिवाय त्यांची पूजा अपुरी आहे. कथा वाचून आरती करावी.
पुत्रदा एकादशी कथा (Putrada Ekadashi Vrat Katha):
प्राचीन काळच्या एका कथा नुसार भद्रवती राज्यात सुकेतुमान नावाचा राजा राज करीत होता त्यांच्या पत्नीचे नाव शैव्या होते. राजाच्या जवळ सुख संपत्ति व धन-धान्य भरपूर होते पण त्याच्या कडे त्याच्या संपत्तिला कोणी वारस नव्हता. त्यामुळे ते दोघे नेहमी चिंतेत असायचे. एक दिवश राजाला एक चिंता सतत सतावत होती की त्यांच्या मृत्यु नंतर पिंडदान कोण करणार. ते अजून एका चिंतेत होते की त्यांच्या नंतर राज्य कारभार कोण चालवणार. अश्या चिंतानी कंटाळून एक दिवस त्यांनी प्राण त्याग करायचा निर्णय घेतला पण पाप लागेल म्हणून हा निर्णय रद्द केला.
मग एक दिवश जंगाला जवळ शिकार करण्यासाठी गेला असता पशू पक्षांना पाहून त्याच्या मनात वाईट विचार यायला लागले व दुखी झाला. मग एका तळ्याच्या काठावर जाऊन बसला त्याच तळाच्या किनाराला ऋषि मुनींचा आश्रम होता तेथे राजा गेला. राजाला पाहून ऋषि मुनि सुद्धा खुश झाले. मग ऋषि मुनि राजाला त्याची काय इच्छा आहे ते विचारू लागले. मग राजानी सांगितले की त्याची कोणी संतान नाही. ,ग ऋषिनी राजाल पुत्रदा एकादशीचे व्रत बद्दल सांगितले. मग राजांनी हे व्रत केल्यावर त्याना पुत्र प्राप्ती झाली.