पितृदोष काय आहे? त्याची लक्षण, कारण व उपाय काय आहेत?
भाद्रपद महिना कृष्ण पक्ष हा काळ आपल्या पितरांसाठी खरी भक्ति दाखवण्याचा श्राद्ध पक्ष आहे. ह्या काळात जवळपास सर्व घरांमध्ये श्राद्ध केले जाते. असे केल्याने आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होऊन आपली संतान सुखी w समृद्ध होण्यासाठी आशीर्वाद देते. असे म्हणतात की पितृ दोष पासून मुक्ती मिळण्यासाठी हा काळ सर्वात चांगला मानला जातो.
The text What is Pitra Dosh, Symptoms, Remedies And Causes in Marathi be seen on our You tube Chanel What is Pitra Dosh, Symptoms, Remedies And Causes
आज आपण पितृ दोष म्हणजे काय हे पाहू या व त्याच बरोबर त्याची लक्षण काय आहेत व कारण व त्याच बरोबर उपाय काय आहेत ते सुद्धा पहाणार आहोत.
काय आहे पितृ दोष:
जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यावर त्याचा विधी पूर्वक अंतिम संस्कार केला नाही किंवा कोणाचा अकाली मृत्यु झाल्याने त्याच्याशी जोडले जाणारे परिवार मधीत सदस्य ह्यांना बऱ्याच पिढ्या पितृ दोषाचा त्रास सोसावा लागतो. त्याच बरोबर पितृ दोष चे अशुभ प्रभावा साठी जीवन भर त्याच्या साठी उपाय करावे लागतात.
पितृ दोष लक्षण:
पितृ दोष असल्यास व्यक्तिच्या जीवनात संतान सुख मिळत नाही. किंवा जर सुख मिळाले तरी विकलांग संतान होते. किवा मंद बुद्धी किंवा चरित्रहीन होते किंवा बाळाचा जन्म झाला की लगेच त्याचा मृत्यु होतो.
नोकरी व व्यवसाया मध्ये मेहनत करून सुद्धा हानी होते.
परिवार मध्ये नेहमी कलह होणे किंवा एकी नसणे त्याच बरोबर परिवारामध्ये शांतीचा अभाव होणे.
परिवारामद्धे कोणाचे नेहमी आजारपण किंवा अस्वस्थ असणे किंवा इलाज करून सुद्धा ठीक न होणे.
कुटुंबामध्ये विवाह योग्य व्यक्तीचा विवाह न होणे. किंवा विवाह झाल्यावर घटस्पोट होणे किंवा न पटणे.
पितृदोष असण्याने आपल्याच लोकांकडून धोका मिळतो. पितृ दोष असेलतर सारखे सारखे अपघात होतात. त्याच बरोबर जीवनातील मंगल कार्यामध्ये सारखे अडथळे येतात.
परिवारामधील सदस्यावर नेहमी प्रेत बाधाचा प्रभाव राहतो. घरात नेहमी तनाव व क्लेश होतात.
ह्या कारणांमुळे होतो पितृदोष:
पितरांचा विधिवत अंतिम संस्कार व श्राद्ध न होणे.
पितरांच्या विस्मृतिचा अपमान करणे.
धर्माच्या विरुद्ध आचरण करणे.
पिपळाचे, लिंबाचे किंवा वडाचे झाड कापणे.
नागाची हत्या करणे किंवा कोणाकडून करून घेणे.
पितृ दोषा निवारण उपाय:
कुंडलीमध्ये पितृ दोष असेलतर दक्षिण दिशेला आपल्या पितरांचे फोटो लावून रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे. असे केल्याने आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळून पितृ दोष समाप्त होऊ लागेल.
पूर्वजांच्या निधन तिथीला ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक भोजन देऊन दान करावे.
घरा जवळील पिंपळाच्या झाडाला दुपारी पाणी जरूर घालावे. मग पुष्प, अक्षता, दूध गंगाजल व काळे तीळ अर्पित करावे. मग आपल्याला पितरांचे स्मरण करावे.
संध्याकाळी रोज दक्षिण दिशेला दिवा लावावा. जर रोज दिवा लावणे शक्य नसेलतर पितृ पक्षात रोज संध्याकाळी दिवा लावावा.
कुंडलीमध्ये पितृ दोष असेलर काय करावे:
कुंडलीमधील पितृ दोष दूर करण्यासाठी कोणत्या सुद्धा गरीब मुलीचा विवाह करून ध्या किंवा विवाहा साठी मदत करा. त्यामुळे लाभ होईल.
पितृ दोषचा प्रभाव कमी करण्यासाठी महादेवच्या मूर्ती समोर पुढील मंत्र जाप करावा.
“ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात”
मंत्रा बरोबरच आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून मनोभावे प्रार्थना करावी. असे केल्याने आपल्या जीवनातील पितृ दोष हळू हळू कमी होईल व आपली कामे होत राहतील.
आपल्या कुंडलीमध्ये पितृ दोष असेलतर आपण अश्या मंदिरात जा जेथे पिपळाचे वृक्ष आहे. मग तेथे जाऊन दूध व पाणी मिक्स करून अर्पित करा. मग संध्याकाळी पिपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने पितृ प्रसन्न होऊन आपल्या दुखायचे निवारण होईल.
अमावस्याच्या दिवशी गाईला पाच फळ खाऊ घाला. त्याच बरोबर बाभळीच्या झाडाखाली जेवण ठेवा. अमावस्याच्या दिवशी आपल्या
पितरांसाठी मनापासून जेवण बनवा व गाईला व कावळ्याला तूप लावलेली रोटी खाऊ घाला. आपल्या पूर्वजांच्या नावांनी दूध, साखर, पांढरे वस्त्र कोना गरीब व्यक्तिला दान करा. असे केल्याने पितृ खुश होतात. व आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात व पितृ दोष समाप्त होतो.
मग पूजा झाल्यावर आपल्या पितरां विशइ आपल्या चुकीची माफी मागा असे केल्याने पितृ प्रसन्न होतील व आपल्या कुंडली मधील पितृ दोषचा प्रभाव कमी होईल.
टीप: आम्ही ह्या लेखात दिलेली माहिती फक्त आपल्या माहिती करिता देत आहोत. त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही. आपल्याला पटल्यास आपण हे उपाय करावे.