आपणा सर्वांना दसरा विजया दशमी हार्दिक शुभेछा माता दुर्गा तुम्हाला सुख समृद्धी व उत्तम आरोग्य देवो हीच देवीच्या चरणी प्रार्थना
दसरा विजया दशमी 2022 मुहूर्त तिथी महत्व पूजाविधी झंडूफूल व शमीचे महत्व
दसरा ह्या सणाचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. कोणतेसुद्धा चांगले कार्य किंवा काम करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे शुभ वेळ किंवा शुभ मुहूर्त पहाण्याची जरूरत नाही. जर आपण कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा नवीन खरेदी करणार असालतर त्यासाठी योग्य दिवस आहे. हिदू पंचांग नुसार वर्ष भरातील साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो.
दसरा हा सण आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष ह्या तिथीला साजरा केला जातो. ह्या वर्षी दसरा 5 ऑक्टोबर 2022 बुधवार ह्या दिवशी आहे. दसरा हा दिवस धर्म व अधर्म ह्या रूपात साजरा केला जातो. पौराणिक कथा नुसार दसरा ह्या दिवशी श्री राम ह्यांनी लंकापती रावण ह्याचा वध केला होता. व दुर्गा मातानी महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून ही दिवशी विजया दशमी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ही दिवशी रावणाच्या पुतळ्या सोबत मेघनाथ व कुंभकर्ण ह्याच्यापण पुतळ्याचे दहन केले जाते. मग ही दिवसा पासून दुर्गापूजा संपन्न होते.
दसरा पूजा मुहूर्त व महत्व:
दसरा तिथी प्रारंभ 4 ऑक्टोबर 2022 मंगळवार दुपारी 2 वाजून 20 मिनिट
दसरा समाप्ती 5 ऑक्टोबर 2022 बुधवार दुपारी 12 वाजता
4 ऑक्टोबर 2022 रात्री 10 वाजून 51 मिनिट पासून 5 ऑक्टोबर 2022 बुधवार रात्री 9 वाजून 15 मिनिट पर्यन्त श्रवण नक्षत्र आहे हा मुहूर्त पूजेसाठी शुभ मानला जातो.
विजय मुहूर्त – 5 ऑक्टोबर, बुधवार दुपारी 2 वाजून 13 मिनट पासून 2 वाजून 54 मिनट पर्यन्त
अमृत काल- 5 ऑक्टोबर, बुधवार सकाळी 11 वाजून 33 पासून दुपारी 1 वाजून 2 मिनट पर्यन्त
दसरा महत्व:
दसरा ह्या दिवसाचे महत्व म्हणजे सत्याचा असत्यवर विजय व चांगल्या कर्माची वाईट कर्मावर मात हयाचे प्रतीक आहे. ही दिवशी 10 दिवस चालणाऱ्या युद्धाचा अंत म्हणजे माता दुर्गानी महिषासुर नावाच्या राक्षसाचा केलेला वध. व त्याच बरोबर भगवान राम ह्यांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला होता. म्हणूनच ही दिवशी शस्त्र पूजा, दुर्गा पूजा राम पूजा व शमी पूजा करण्याचे महत्व आहे. ह्या दोन्ही महत्व पूर्ण घटनांमुळे विजयादशमी ह्या रूपात हा दिवस साजरा केला जातो. ही दिवशी माता दुर्गा च्या प्रतिमेला विसर्जित केले जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी चंडी किंवा सप्तशती चा पाठ व हवन करणे विशेष महत्वाचे मानले जाते.
दसरा साजरा करण्याची दोंन कारणे आहेत:
धार्मिक मान्यता नुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता त्याला ब्रह्म देवा कडून आशिर्वाद मिळाला होता की पृथ्वीवर कोणी सुद्धा व्यक्ति त्याला मारू शकणार नाही. ह्या आशीर्वादाच्या मुळे महिषासुरने पृथ्वीवर नुसता हाहाकार चालू केला होता. त्यामुळे ब्रह्मा, विष्णु व शिव हयानी आपल्या शक्तीने तसेच कल्पकतेने माता दुर्गाला महिषासुर शी युद्ध करायला पाठवले. माता दुर्गाने 9 दिवस महिषासुर बरोबर युद्ध केले मग दहाव्या दिवशी महिषासुरचा वध केला. त्यामुळे पृथ्वीवरील लोकाना महिषासुरच्या त्रासा पासून मुक्ती मिळाली व लोकानी आनंद उत्सव मानवण्यास सुरवात केली. कारण ह्यादिवशी माता दुर्गानी महिषासुरवर विजय मिळवला होता म्हणून ह्या दिवसाला विजया दशमी ह्या रूपात साजरा करतात.
दसरा साजरा करण्याचे अजून एक कारण आहे. ह्या दिवशी श्री राम यांनी अत्याचारी रावणाचा वध केला होता. असे म्हणतात की नऊ दिवस श्री राम यांनी देवीच्या नऊ रूपाची नऊ दिवस अगदी विधि पूर्वक पूजा केली होती. व देवीच्या आशीर्वादाने दहाव्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता. कारण रावण हा अधर्म होता म्हणूनच असे म्हणतात की अधर्मवर धर्मची जीत झाली होती. म्हणून हा दिवस साजरा करतात. तसेच भारतात बऱ्याच राजात रावणची प्रतिमा बनवून जाळली जाते.
दसरा पूजाविधी:
दसरा हया सणाच्या दिवशी दुपारी पूजा करणे जास्त शुभ मानले जाते. ही दिवशी ईशान्य कोनमध्ये कमळाच्या आकाराचे अष्टदल चक्र बनवा चक्र बनवताना अपराजिताय नमः: हा मंत्र जाप करा. माता दुर्गाच्या बरोबर श्री राम ह्यांची सुद्धा पूजा अर्चा केली पाहिजे. माता ची स्थापना केल्यावर माला ला हळद-कुंकू, अक्षता, फूल रोली अर्पित करून भोग दाखवा. माताची आरती म्हणा. आपल्या घरातील विद्यार्थीनी आपल्या वह्या व पुस्तकांची पूजा करावी. व्यापारी वर्गनी सुद्धा पुस्तकांची पूजा करावी. त्याच बरोबर शस्त्र ठेवून त्याची पूजा करावी. ह्या दिवशी दान धर्म करावे. व घरातील वृद्ध लोकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
दसऱ्याच्या दिवशी झेंडू फुलाचे काय महत्व आहे:
दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावतात. तसेच वाहनाची पूजा करून वाहनावर पण झेंडूच्या फुलांची माळ लावली जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. म्हणून दसरा, दिवाळी ह्या सणाला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांचा हार दरवाजाला लावला जातो व पूजेमद्धे सुद्धा झेंडूची फुले वापरली जातात. तसेच ह्या दिवशी घरातील मुले आपल्या पुस्तकांची पूजा (सरस्वती माताची पूजा) करतात. व महिला आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तूच्या पूजा करतात.
दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने किंवा आपट्याची पाने काय महत्व आहे.
श्री राम लक्ष्मण व सीता माता जेव्हा वानवासाला गेले होते तेव्हा एक वर्ष ते अज्ञात वासामद्धे गेले होते. तेव्हा त्यानी आपली शस्त्रे शिमीच्या झाडांमद्धे लपवून ठेवली होते नंतर एक वर्षानी ते आले तेव्हा तो दिवस दसरा हा होता. त्यादिवशी त्यांनी शमीच्या झाडांची पूजा करून आपली शस्त्रे काढून घेतली होती त्यामुळे दसाऱ्याला आपट्याच्या पानाचे महत्व आहे.