सरसुचे तेल मोहरीचे तेल मस्टर्ड ऑइल आरोग्यदाई फायदे उपयोग व नुकसान
सरसूच्या तेलाचा सर्दीच्या सीझनमध्ये उपयोग केला जातो. कारणकी ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. खर म्हणजे जास्ती करून लोक ह्याचा वापर खाण्यासाठी करतात. पण ह्या तेलाचा वापर आपल्या शरीराच्या छोट्या मोठ्या समस्यासाठी खूप फायदेशीर आहे.
The text Sarso Tel | Mustard Oil| Mohriche Tel Health Benefits in Marathi be seen on our You tube Chanel Sarso Tel | Mustard Oil| Mohriche Tel Health Benefits
पण ह्याचा उपयोग म्हणजे 100% होईलच असे नाही. जर काही गंभीर आजार असेलतर त्याचा डॉक्टरी सल्ला घेणेच फायदेशीर व योग्य आहे. सरसूच्या तेलाचे फायदे व त्याच बरोबर त्याचे काय तोटे सुद्धा आहेत हे आपण ह्या लेखात पाहू या.
प्रथम आपण सरसुचे तेल म्हणजे काय ते पाहू या.
सरसुचे तेल काय आहे? What is Mustard Oil?
सरसुचे तेल म्हणजे मोहरीचे तेल हे मोहरीच्या बिया पासून काढतात. मोहरी ही लाल व पिवळ्या रंगाची असते. मशीनच्या मदतीने त्याचे तेल काढले जाते. भारतात ह्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. म्हणजेच जेवणात ह्याचा वापर करतात. त्याचा वापर करून बनवलेले जेवण खूप चविष्ट लागते.
आता आपण सरसूच्या तेलाचे प्रकार पाहणार आहोत.
रिफाइंड सरसुचे (मोहरीचे) तेल : सरसूच्या बियापासून मशीनच्या द्वारे ह्याचे तेल काढले जाते. त्याचा स्वाद कडवट असतो. ह्या तेलाचा वापर भरतात जेवण बनवण्यासाठी केला जातो. रिफाइंड सरसुकहीए तेल काळ्या, भूऱ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या सरसूच्या बियापासून बनवले जाते.
ग्रेड-1 (कच्ची घानीचे तेल) : ह्या तेलाला कच्या घण्याचे तेल म्हणून ओळखले जाते. हे तेल शुद्ध असते. म्हणूनच भारतातील महिला हे तेल वापरणे पसंद करतात. अश्या प्रकारचे तेल आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
ग्रेड-2 : अश्या प्रकारचे तेल जेवण बनवण्यासाठी नाहीतर थेरपीच्या साठी वापरले जाते.
सरसूच्या तेलाचे आरोग्यदाई फायदे: Health Benefits of Mustard Oil
आता आपण पाहू या सरसुचे तेल आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेमंद आहे.
1. सांधेदुखी/ गाठी/मासपेशीचे दुखणे:
पूर्वीच्या काळापासून सांधे दुखी/गाठी किंवा मासपेशीच्या दुखण्यावर सरसूच्या तेलाचा वापर करीत असत. नियमित पणे ह्या तेलानी मालीश केले तर रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे सांधेदुखी व मांसपेशिच्या समस्या दूर होतात. त्याच बरोबर सरसूच्या तेलामधील ओमेगा-3 फैटी एसिड सांधेदुखीवर गुणकारी आहे.
2. हृदय स्वास्थ्य:
सरसुचे तेल हृदय विकारावर फायदेशीर आहे. सरसूच्या तेलामधील
मोनोअनसैचुरेटेड व पॉलीअनसैचुरेटेड फैटी एसिड च्या बरोबर ओमेगा-3 व ओमेगा-6 फैटी एसिड आहे. त्यामुळे हृदय संबंधित तक्रारी कमी होतात. ते खराब कोलेस्ट्रॉल (LDL) चा स्तर कमी करण्यास मदत करते. व चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) चा स्तर वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हृदय रोगाची समस्या कमी होते.
3. कॅन्सर:
कॅन्सर रोग हा घातक आहे. त्याच्या पासून प्रेतक जण वाचण्यासाठी जागृत रहात असतो. सरसूच्या तेलामध्ये एंटी कॅन्सरचे गुण आहेत.
जे कॅन्सरचे सेल्स तयार होण्यापासून बचाव करते. तरी पण आपण सरसूच्या तेलाचा वापर करण्यासाठी एकदा डॉक्टरी सल्ला जरूर घ्या.
4. दांत संबंधी समस्या:
सरसुचे तेल दातांच्या समस्यासाठी फायदेशीर आहेत. शास्त्रा नुसार सरसुचे तेल व हळद ह्याचा वापर हिरड्या व सूज ह्यावर प्रभावी आहे. तसेच सरसुचे तेल व मीठ तोंडाची स्वच्छता चांगली ठेवते. त्यासाठी 1/2 चमचा सरसुचे तेल, 1 चमचा हळद व 1/2 चमचा मीठ मिक्स करून त्याची पेस्ट बनवून हिरड्यावर त्याने मालीश करा असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. असे केल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते.
5. अस्थमा:
अस्थमा श्वसन तंत्रच्या संबंधित एक समस्या आहे. त्याच्या त्रासा पासून सुटका करण्यासाठी पिवळ्या मोहरीचे तेल फायदेमंद आहे. ह्या तेलामधील सेलेनियम अस्थमाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.
6. ब्रेन फंक्शनला बूस्ट करण्यासाठी:
सरसुचे तेल ब्रेन फंक्शन ला चलना देते. ह्या तेलामधील फैटी एसिड सबसेलुलर मेम्ब्रेंस च्या रचनेमद्धे बदलाव करण्यास मदत करते. तसेच मेंदूचे कार्य रेग्युलर करते. म्हणूनच असे म्हणतात की सरसुचे तेल मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.
7. एंटी बैक्टीरियल, एंटीफंगल व एंटीइंफ्लेमेटरी:
सरसुचे तेल एंटी बैक्टीरियल, एंटीफंगल व एंटीइंफ्लेमेटरी गुणांनी समृद्ध असते. ते सूज येण्याच्या समस्यावर प्रभावी आहे. अनावश्यक बैक्टीरिया व रोग होण्याच्या समस्या पासून बचाव होतो. त्याच बरोबर फंगसचा प्रभाव कमी करतो. व स्कीनवर होणारे रैशेज व संक्रमण वर इलाज करण्यास मदत करतो.
8. कीट निवारक:
सरसुचे तेल स्कीनवर लावल्यावर मच्छर अ अन्य किडे मकोडे पासून बचाव होतो.
9. संपूर्ण स्वास्थ्य:
सरसुचे तेल सेवन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते. आपली सांधेदुखी, मांसपेशी, कॅन्सर व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयरोगा पासून आराम मिळतो. स्कीन पण चांगली राहते. ओठ फाटणे, स्कीन रैशेजचा त्रास होत नाही.
10 . त्वचा के लिए (एंटी-एजिंग)
सरसुचे तेल स्कीनवर लावल्यास त्याचे बरेच फायदे होतात. खास करून वाढते वय होय. सरसूच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फैटी एसिड , एंटीऑक्सीडेंट व विटामिन ई भरपूर मात्रा आहे. ते स्कीनसाठी वाढत्या वयाच्या समस्यावर फायदेशीर आहे.
टीप: आपल्याला काही शारीरिक समस्या असतील तर डॉक्टरी सल्ला घेऊन मगच सरसुचे तेल वापरावे. ते सुद्धा अति प्रमाणात वापरू नये त्याचे काही साइड इफेक्ट होऊ शकतात. तसेच ही माहिती आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.