देवउठनी (प्रभोधीनी) एकादशी 2022 मुहूर्त, व्रत देते मोक्ष, कथा व दानधर्म
4 नोव्हेंबर 2022 शुक्रवार ह्यादिवशी देवउठनी म्हणजेच प्रभोधिनी एकादशी आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी श्रीहरी स्वरूप शालिग्राम व तुळशी विवाह च्या नंतर कथा जरूर आइकावी.
हिंदू धर्मामध्ये मध्ये एकादशी ह्या व्रताचे खूप महत्व आहे. वर्ष भरातील एकादशी मधील देवउठनी एकादशी हिचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी चार महिन्यानंतर श्रीहरी निद्रामधून जागे होतात मग चतुर्मासाची समाप्ती होते. ह्या दिवशी व्रत करणे चांगले मानले जाते.
The text Dev Uthani Ekadashi 2022 Muhurat, Vrat V Katha in Marathi be seen on our You tube Chanel Dev Uthani Ekadashi 2022 Muhurat, Vrat V Katha
असे म्हणतात की देवउठनी एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मृतू नंतर वैकुंठ धाम चा मार्ग मोकळा होतो. भगवान श्री कृष्ण ह्यांनी एकादशीचे महत्व युधिष्ठिरना सांगितले होते. असे म्हणतात की देवउठनी एकादशीच्या प्रदोष काळात उसाचा मंडप बनवून श्रीहरी स्वरूप शालिग्राम व तुळशी ह्याच्या विवाहा नंतर कथा जरूर आईकली पाहिजे. ही कथा आईकल्यावर सर्व पाप धुतले जातात.
देवउठनी एकादशी कथा व मुहूर्त2022 (Dev uthani ekadashi 2022 Muhurat)
देवउठनी एकादशी मुहूर्त:
कार्तिक शुक्ल देवउठनी एकादशी तिथि प्रारंभ – 3 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 7.30
कार्तिक शुक्ल एकादशी तिथि समाप्त – 4 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 06.08
देवउठनी एकादशी व्रत पारण वेळ – सकाळी 06.39 – सकाळी 08.52 (5 नोव्हेंबर 2022)
देवउठनी एकादशी कथा:
पौराणिक कथा अनुसार एका राज्यामध्ये एक दिवस सर्व प्रजा व पशु अन्न ग्रहण करीत नसत किंवा किंवा काही विकत सुद्धा नसत. एक दिवस भगवान विष्णु ह्यांनी राजाची परीक्षा घेण्यासाठी एका सुंदरीचा वेश धारण करून स्त्याच्या कडेला बसले. राजा जेव्हा त्या वाटे वरून जात होते तेव्हा त्यांनी सुंदरील येथे बसण्याचे कारण विचारले. तेव्हा त्या सुंदरीने राजाला उत्तर दिलेकी ह्या जगात तिचे कोणी सुद्धा नाही तर राजा तिच्या रूपा भाळून म्हणलाल की तु माझ्याशी विवाह करून माझ्या राजवाड्यावर चल.
मग सुंदरीने राजाला एक अट घातली:
सुंदरीने राजाशी विवाह करण्यास तयारी दर्शवली पण एक अट तिने राजा समोर ठेवली की विवाह नंतर संपूर्ण राज्याचे अधिकार तिला सोपवावे व ती म्हणेल तसे वागावे व जेवणात जे बनवले ते राजानी सेवन करायचे. मग राजा नी शर्त मानली. दुसऱ्या दिवशी एकादशी होती त्या दिवशी सुंदरीने बाजारात अन्न पदार्थ विकण्यास आदेश दिला व राजाला मांसाहारी भोजन करण्यास आग्रह करू लागली. मग राजानी सुंदरीला सांगितले की आज एकादशी आहे तर मी फक्त फलाहार करणार आहे. मग तिने राजानी दिलेले वचन सांगितले मग म्हणाली की जर तुम्ही हे जेवण नाही केलेतर मी राजकुमारचे डोके कापून टाकीन.
भगवान श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णु ह्यांच्या परीक्षेत राजा पास झाले:
राजानी ही गोष्ट मोठ्या राणीला सांगितली मग महाराणीने राजाला आपल्या धर्माचे पालन करायला सांगून आपल्या राजपुत्राचा सीरच्छेद करण्यास परवानगी दिली. राजपुत्रनी सुद्धा राजाला आपल्या धर्माचे पालन करायला सांगून खुशी खुशी आपले सीरच्छेद करण्यास तयार झाला. राजा हताश झाला व सुंदरीचे म्हणणे न आईकता राजकुमारचे सीरच्छेद करण्यास परवानगी देवू लागला. तेव्हा भगवान विष्णु ह्यांनी परत वेश पालट करून परत विष्णु रूपात येऊन त्यांना दर्शन देवून तुम्ही माझ्या परीक्षेत पास झाला असे सांगितले.
मग श्रीहरिनि राजा ला वर मागायला सांगितला मग राजाणी ह्या जीवनात प्रभूचे धन्यवाद मानून राजाचा उद्धार करावा असे सांगितले श्रीहरिनि राजाचे म्हणणे आईकले व त्यांना मृतू नंतर वैकुंठची प्राप्ती झाली.
देवउठनी एकादशी पासून मंगलकार्य सुरू होतात व पावसाळा हा सीझन संपून जातो. ह्या दिवशी तुळशी विवाह सुद्धा करतात. तुळशीला भगवान विष्णु ह्यांचे प्रतीक मानले जाते. तुळशीचे धार्मिक महत्वच्या बरोबर औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.
कार्तिक शुक्ल एकादशी हा दिवस भगवान विष्णु ह्यांचा जागरण दिवस आसतो. देवउठनी एकादशी हा दिवस चातुर्मास मधील अंतिम दिवस आहे. आषाढ शुक्ल एकादशी ह्या दिवसा पासून भगवान विष्णु ह्यांचा विश्राम प्रारंभ सुरू होत असून कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी ह्यादिवशी समाप्ती होते. ह्या दिवशी व्रत, पूजा व दान धर्मचे विशेष महत्व आहे.
दान करण्याचे महत्व:
देवउठनी एकादशी ह्या दिवशी दान करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी नवीन गहू, धान्य, मका, बाजरी, उडीद, गुळ, वस्त्र चे दान करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर सिंगाडा, बीट, बोर, उस दान करण्याचे महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी दान धर्म केलेकी भगवान विष्णु ह्यांची कृपा प्राप्त होते. आपल्या भाग्यमध्ये वृद्धी होते व सुख शांती प्राप्त होते.