Tulsi Vivah 2022 Muhurat Puja Sahitya Puja Vidhi V Mahatva In Marathi

Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022 Muhurat Puja Sahitya Puja Vidhi V Mahatva

तुळशीचे लग्न २०२२ तुळशी विवाह मुहूर्त, पूजा साहित्य, पुजाविधि व महत्व

हिंदू धर्मानुसार कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला तुळशी विवाह करण्याची पद्धत आहे. ह्या वर्षी तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022 शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी देवी तुळशी बरोबर विष्णु स्वरूप शालिग्राम ह्यांचा विवाह विधीपूर्वक केला जातो. ह्या दिवशी जगाचे पालनहार श्रीहरी आपल्या चार महिन्याच्या निद्रेनंतर जागे होतात. म्हणूनच ह्या दिवसाला देव उठनी एकादशी म्हणतात ह्या दिवसा पासून तुळशी विवाह झाला की आपल्या कडे मंगलकार्य करण्याची सुरुवात होते. भगवान विष्णु यांना तुळशी खूप प्रिय आहे. तिचे दुसरे नाव वृंदा असे आहे.

The text Tulsi Vivah 2022 Muhurat Puja Sahitya Puja Vidhi V Mahatva in Marathi be seen on our You tube Chanel Tulsi Vivah 2022 Muhurat Puja Sahitya Puja Vidhi V Mahatva

आपल्या मध्ये पूर्वीच्या पासून एक पद्धत आहे की घरातील जी जेष्ठ कन्या असेल तिचा विवाह प्रथम केला जातो तर मग घरातील जेष्ठ कन्या म्हणजे तुळशी होय. तुळशीचा विवाह श्री कृष्ण ह्यांच्याशी लावल्यावर आपल्या कडील विवाह करण्याची पद्धत आहे. तुळस ही आपल्या अंगणाची शोभा वाढवते. दरवर्षी तुळशीचे लग्न अगदी धूम धडाक्यात लावले जाते. काही ठिकाणी सार्व जनिक विवाह सुद्धा केला जातो. कारण काही ठिकाणी स्पीकर लावून मंडप घालून हा विवाह मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

आपल्या हिंदू धर्मात बहुसंख्य लोकांच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले असते. तसेच फ्लॅट मध्ये राहणाऱ्या कडे सुद्धा बाल्कनी मध्ये तुळशीचे रोप लावलेले दिसते. तुळशी ला आपण देवाच मानतो व रोज तिच्या समोर सडा, रांगोळी काढून दिवा आगरबती लावतो. कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्याने आपलयाला भगवान विष्णु यांचे आशीर्वाद मिळतात व फळ प्राप्ती होते.

तुलसी विवाह तिथि व शुभ मुहूर्त:
कार्तिक द्वादशी तिथि आरंभ- शनिवार 05 नोव्हेंबर 2022 संध्या 06:08 पासून
कार्तिक द्वादशी तिथि समाप्त- रविवार 06 नोव्हेंबर 2022 संध्या 05:06 पर्यन्त
ह्या वर्षी तुलसी विवाह पर्व शनिवार 05 नोव्हेंबर 2022 ला साजरा करायचा आहे.

Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022 Muhurat Puja Sahitya Puja Vidhi V Mahatva

तुलसी विवाह पूजा साहित्य:
तुलसी रोप , भगवान विष्णु प्रतिमा, चौकी, उस, मूली, आंवला, बेर, शकरकंद, सिंघाड़ा, सीताफल, पेरू व काही फळ, धूप, दीपक, वस्त्र, फूल व हार, सौभाग्य सामान, सौभाग्य आलंकार, लाल ओढणी, साडी, हळद

तुळशी विवाह पूजा विधी:
• तुळशी विवाह ह्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभीत करतात. त्याच्या पुढे सडा रांगोळी काढतात.
• तुळशी वृंदावनच्या वर उसाचा मंडप बांधतात. तुळशीला हळद-कुंकू लावतात. मग तुळशी पुढे आवळा व चिंच ठेवावे.
• मग कलश तयार करावा. त्यासाठी स्वच्छ कलश घेऊन त्यावर चारी बाजूनी हळद-कुंकूची बोटे लावावी. म्हणजेच हळद कुंकुवाची बोटांनी पाच रेघा उमटाव्या. मग कलशमध्ये पाणी, पाच विडयाची पाने व नारळ ठेवावा.
• तुळशी जवळ समई लावावी व गणपतीची प्रतिमा ठेवून हळद-कुंकू लावून फूल वाहून गणेश पूजन करावे.
• मग शालिग्राम घेऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करून तुळशी वृंदावनच्या जवळ ठेवावे.
• तुळशील हिरवे वस्त्र, फुलाची वेणी व कापसाचे वस्त्र वाहावे. नंतर तुळशीच्या वर लाल रंगाचे छोटेसे वस्त्र घालावे. तुळशीला पाणी घालून वाटी बांगडी, सौभाग्य अलंकार घालावे.
• मग शंख पूजन करून हळद-कुंकू वाहून फूल अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा.
• तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता, हळद-कुंकू, पान सुपारी, हळकुंड, बदाम, केळी मोसंबी, व नारळ ठेऊन ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडवळ्या बांधाव्या.
• श्री कृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद-कुंकू, अक्षता फुले, हार घालून पूजन करावे. तुळशी वृंदावनला हार घालावा.
• तुळशी वृंदावन समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभीत करावे व श्री कृष्णची प्रतिमा ठेऊन मध्ये अंतर पाट ठेवून मंगल अष्टक म्हणावे. आरती म्हणून प्रसाद म्हणून मिठाई, फराल व बतासे वाटतात।

तुलसी विवाह का महत्व
तुळशी विवाह केल्यास घरामध्ये सुख शांती व समृद्धी येते. व ह्या दिवशी व्रत केल्यास एक हजार अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. तसेच तुळशी विवाहच्या दिवशी तुळशी व शालिग्राम ह्यांचा विवाह केल्यास भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची कृपा मिळून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.