चेहऱ्यावर बेसन व लिंबुरस लावल्याने 5 समस्या दूर होतात तसेच चेहऱ्यावर कसे लावावे
चेहऱ्यावर बेसन लावणे खूप फायदेमंद आहे. त्याच बरोबर लिंबुरस लावल्याने चेहऱ्यावरील बऱ्याच समस्यापासून छुटकारा मिळू शकतो. जेव्हा बेसन व लिंबू एकत्र चेहऱ्यावर लावल्याने स्कीनवर त्याचे चांगले परिणाम होऊन बरेच फायदे होतात. हा उपाय बऱ्याच पूर्वी पासून केला जात आहे. चेहऱ्यावर नैसर्गिक परिणाम होतो किंवा चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी सुद्धा हा प्रयोग उत्तम आहे. बेसन व लिंबुरस हे कॉम्बिनेशन खूप फायदेमंद आहे.
The text Besan And Lemon Face Pack Benefitsl in Marathi be seen on our You tube Chanel Besan And Lemon Face Pack Benefits
चेहऱ्यावर बेसन व लिंबुरस लावण्याने 5 समस्या दूर होतील: Benefits Of Applying Besan And Lemon On Face:
1. मुरूम पिंपल्स पासून छुटकारा:
खराब खाणे-पिणे, प्रदूषण, चेहऱ्यावरील जास्तीचे एल किंवा तेलकट त्वचा व घाण त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पिंपल्स येतात. चेहऱ्यावर बेसन व लिंबुरस लावल्याने चेहरा साफ होऊन जास्तीचे तेल व घाण निघून स्कीन साफ होते. त्याच बरोबर पिंपल्स मुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते.
2. चेहऱ्यावरील काळेपण दूर होते:
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी बेसन खूप फायदेमंद आहे. त्याच बरोबर लिंबुरस लावण्याने चेहरा साफ होते. बेसन व लिंबुरस मिक्स करून लावल्याने चेहरा टैनिंग होऊन चेहरा व ओठावरील जमलेले पिगमेंटेशन, दाग-धब्बे साफ होतात व चेहऱ्यावर निखार येतो.
3. ऑयली स्कीन पासून छुटकारा मिळतो:
ऑयली स्कीन मुळे चेहऱ्यावरील ब्रेकआउट्स, चिपचीपापण, व बंद छिद्र ]च्या समस्या होतात. बेसन व लिंबुरस दोन्ही सुद्धा चेहऱ्यावरील जमलेले तेल साफ करण्यास मदत करते व त्यामुळे ऑईली स्कीन पासून छुटकारा मिळतो.
4. चेहऱ्यावरील नको असल्याला केसांपासून छुटकारा मिळतो:
पूर्वी पासून बेसनचा प्रयोग शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी केला जातो. जर आपण बेसन मध्ये लिंबुरस, सरसुचे तेल व हळद मिक्स करून उटण्यासारखा उपयोग केलातर नको असलेले केस काढण्यास मदत होऊ शकते. आपल्याला फक्त हे उटणे चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मालीश करायचे आहे.
5. डेड स्किन पासून छुटकारा मिळतो:
बेसन व लिंबुरस लावल्याने स्कीनवरील मृत त्वचा किंवा छिद्र काढण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे स्कीन सॉफ्ट राहून टाइट होते. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात व स्कीन सॉफ्ट व साफ राहण्यास मदत होते.