केसांना मेहंदी लावताना एक सिक्रेट वस्तु टाका व केसांना मेहंदी कशी लावावी?
पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात बऱ्याच प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत. पण त्याचा उपयोग करणे आपल्या आरोग्याच्या दृषीने हानिकारक असते. कारणकी सर्व प्रकारच्या हेअर कलर्स मध्ये केमिकल्स वापरली जातात.
पण ह्याच्या शिवाय अजून एक उपाय आहे ज्याच्या मदतीने आपण आपले पांढरे झालेले केस लपवून छान मजबूत व चमकदार बनवू शकतो.
आज आपण मेहंदी लावण्याची योग्य पद्धत व त्यामध्ये काय सिक्रेट पदार्थ मिक्स करायचा आहे ते पाहणार आहोत.
महिला असो किंवा पुरुष सगळे आपल्या केसांची काळजी घेत असतात. पण वाढत्या वया बरोबर पांढरे केस म्हणजे एक समस्या जाणवू लागते. आता बदल्या जीवनशैली बरोबर लहान मुलांमध्ये सुद्धा पांढरे केस होण्याची समस्या दिसून येवू लागली आहे.
The text How To Apply Mehendi Henna On Hair And What To Add In Mehandi in Marathi be seen on our You tube Chanel How To Apply Mehendi Henna On Hair And What To Add In Mehandi
पुरुष आपले केस पांढरे होणे ह्या समस्यावर एडजस्ट करतात पण महिलांचे तसे नाही. महिलांमध्ये पांढरे केस होणे म्हणजे एक मोठी समस्या असे दिसून येते पण ह्याचे कारण नैसर्गिक सुद्धा असू शकतात.
खर म्हणजे बाजारात पांढरे केस काळे करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे डाय उपलब्ध आहेत. आपण त्याचा सरास वापर सुद्धा करतो कारणकी त्याचे रिजल्ट लगेच मिळतात पण आपल्याला माहीत आहेका त्याचे बरेच दुष्परिणाम सुद्धा आहेत. डाय मधील कलरमध्ये केमिकल वापरतात त्यामुळे त्याचा परिमाण आपल्या आपल्या स्कीनवर व डोळ्यावर होतो.
त्यामुळे असे डाय वापरण्यापेक्षा आपण घरगुती उपाय करून पांढरे केस काळे करू शकतो. त्यामुळे ते मजबूत होतील, चमकदार, रुक्ष होण्या पासून वाचतील व डैंड्रफच्या समस्या पासून सुद्धा वाचतील त्यासाठी मेहंदी वापरा.
आता आपण पाहू या की मंदी केसांना लावताना त्यामध्ये काय मिक्स करायला पाहिजे व केसांना मेहंदी कशी लावायची.
मेहंदी केसांना लावताना त्यामध्ये लवंग, सुकलेला आवळा, बीटरस, दालचीनी पावडर, कॉफी, चहा पत्तीचे पाणी, रिठा व शिकेकाई, लिंबुरस, मेथी पेस्ट, दही, अंडे घालू शकतो.
केसांना मेहंदी लावायची पद्धत काय आहे.
खर म्हणजे केसांना मेहंदी लावणे चांगले आहे. पण केसांना नुसती मेहंदी लावणे नुकसान दायक ठरू शकते. कारणकी मेहंदी मध्ये असे तत्व आहेत जे केसांना रुक्ष बनवतात व केस सारखे तुटतात. म्हणूनच केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये घरगुती काही वस्तु घालून मगच लावावी. त्यामुळे केस छान रहातात.
1. लवंग:
ह्याचा वापर थंडीमध्ये करणे लाभदायक आहे. त्यामुळे आपल्या डोक्यामद्धे थंडी लागत नाही व केस छान चमकदार होतात.
2. सुकलेला आवळा:
ह्याचा वापर आपण कधी सुद्धा करू शकता. ते केसांना मजबूत बनवून दाट करते. व त्याच बरोबर केस रुक्ष बनत नाही.
3. बीटरूट रस:
ह्या वापर मेहंदीचा कडकपणा कमी करण्यासाठी व केस मुलायम बनवण्यासाठी होतो. कारणकी मेहंदी लावल्यावर केस कडक होतात.
4. दालचीनी पावडर:
मेहंदी मध्ये ह्याचा वापर केल्यास केसांना फायदा होतो. त्यामुळे डैंड्रफ होत नाही.
5. कॉफ़ी:
ह्याला आपण पावडर किंवा लिक्विड दोन्ही रूपात वापर करू शकतो. कॉफी केसांना कलर व पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. लिक्विड कॉफी वापरायची असेलतर थोड्याश्या पाण्यात कॉफी मिस्क करून उकळी आल्यावर थंड करून त्यामध्ये मेहंदी मिक्स करून लावावी.
6. चहा पत्तीचे पाणी:
ह्याचा उपयोग सुद्धा केसांना कलर करण्यासाठी करू शकता. त्यासाठी चहा पत्तीला पाण्यात उकळून थंड करून गाळून त्यामध्ये मेहंदी मिक्स करून लाऊ शकता. त्यामुळे केस कडक व रुक्ष न होता छान मऊ राहतील.
7. रीठा व शिकाकाई:
केसांना मेहंदी लावताना ह्या दोन्ही प्रोडक्टसचा वापर केला जातो. ते केसांना मजबूत, दाट व चमकदार बनवते. त्यासाठी दोन्ही सम प्रमाणात घेऊन रात्री भिजत घाला मग सकाळी गाळून ते पाणी केसांना लावा.
8. लिंबुरस:
लिंबुरस केसांमधील डैंड्रफ दूर करून केसांमधील फंगल इन्फेक्शन नाहीसे करतो. त्यासाठी मेहंदी भिजवल्यावर त्यामध्ये थोडासा लिंबुरस घालून मिक्स करावे.
9. दही:
दही वापल्यामुळे केस मुलायम बनतात त्यामुळे केसांना चमक सुद्धा येते. व ते पहिल्या पेक्षा छान होतात.
10. अंडा:
आपल्याला पाहिजे असेलतर आपण मेहंदीमध्ये अंडे मिक्स करू शकता. त्यामुळे केस छान मुलायम, चमकदार व सुंदर बनतील. त्यासाठी मेहंदी मध्ये अंडे चांगले मिक्स करून लावावे.
केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत:
मेहंदी केसांना लावायची असेलतर त्यासाठी मेहंदी. पाणी. एक बाउल, हातांना ग्लोज, पेट्रोलियम जेली किंवा तेल, टॉवेल, मेहंदी लावण्यासाठी ब्रश, केसांना लावण्यासाठी शॉवर कॅप व आपल्याला मेहंदी मध्ये जी वस्तु मिक्स करायची आहे ती वस्तु अशी तयारी करून घ्यावी.
केसांना मेहंदी लावण्याच्या अगोदर केसांमध्ये तेल असता कामा नये. कारणकी तेल असेलतर मेहंदी नीट लागत नाही. जर तेल असेलतर प्रथम शांपु लाऊन केस स्वच्छ धुवून मग मेहंदी लावावी.
मेहंदी लावण्यासाठी:
प्रथम मेहंदी एका लोखंडी भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून एक पेस्ट बनवून घ्या.
मग थोडावेळ तसेच ठेवावे. जर आपण त्यामध्ये चहा पत्तीचे पाणी मिक्स करणार असाल तर रात्रीच करून ठेवा.
मेहंदी लावण्याच्या अगोदर केसांच्या बाजूला व कपाळावर तेल किंवा वैसलीन लावावे. त्यामुळे मेहंदीचा रंग स्कीनवर येणार नाही. मग हातात ग्लोज घालून चमचानि मेहंदी मिक्स करून घ्या.
मग ब्रशच्या सहयाणी लावावी. जेव्हा सर्व केसांना मेहंदी लाऊन झाली की त्यावर शॉवर कॅप घालावी.
त्यामुळे केस कडक नहोता ते चांगले साफ होण्यास मदत होते. मग 3-4 तास झालेकी केस धुवावे. पण शांपु करायचा असेलतर 24 तास झाल्यावर करावा. कारणकी मेहंदीच्या डार्क रंग येण्यास थोडा वेळ लागतो.
आपण मेहंदी लावताना आपल्याला वर सांगितल्या प्रमाणे जो पदार्थ पाहिजे तो मिक्स करू शकता आपण एका वेळी बरेच पदार्थ मिक्स करू नका. कारणकी ते हानिकारक ठरू शकते व केसांचे नुकसान होऊ शकते.