कराची बिस्किट्स हैद्राबादचे टूटी फ्रूटी कराची बिस्कीट
कराची बिस्किटस हे हैद्राबाद येथील लोकप्रिय बिस्किटस आहे. आपण हैद्राबादला गेलो व तेथून कराची बिस्किटस आणले नाही तर नवलच. पण आपण घरीच मस्त टेस्टि हैद्राबाद येथील कराची बेकरी सारखे बिस्किटस आपण बनवू शकतो. ह्या बिस्किटसना कराची टूटी फ्रूटी बिस्किटस सुद्धा म्हणतात.
कराची बिस्किटस हे मस्त टेस्टि लागतात. आपण ह्या अगोदर काही बिस्किटसचे पदार्थ पाहिले आता आपण कराची बिस्किटस अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहू या. हे बिस्किटस आपण नाश्ताच्या वेळी किंवा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा मुलांना शाळेत जाताना डब्यात सुद्धा देवू शकतो.
कराची बिस्किटस बनवताना आपण मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरू शकतो. तसेच आपण त्यामध्ये साजूक तूप व ड्रायफ्रूट वापरले आहेत त्यामुळे ते पौष्टिक सुद्धा आहेत. Binaa andyache biscuits
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 30-35 मिनिट
वाढणी: 20-21 बिस्किटस बनतात
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ (आटा) किंवा मैदा
1/4 कप कस्टर्ड पावडर
1 टी स्पून बेकिंग पावडर
एक चिमूट मीठ
1 टी स्पून वेलची पावडर
1/3 कप तूप (साजूक)
1 कप पिठीसाखर
10-12 बदाम (चिरून)
10-12 काजू (चिरून)
10-12 पिस्ते (चिरून)
2 टे स्पून टूटी फ्रूटी
2 टे स्पून दूध
कृती:
प्रथम गव्हाचे पीठ, किंवा मैदा, बेकिंग पावडर, मीठ व कस्टर्ड पावडर चाळून बाजूला ठेवा.
एका स्टीलच्या बाउलमध्ये तूप (थोडे पातळ करून) व पिठीसाखर चांगली मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर किंवा रोज
एसेन्स व दूध घालून परत हलक्या हातानी फेटून घ्या.
आता त्यामध्ये चिरलेले 3/4 ड्रायफ्रूट घालून मिक्स करा बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट आपण सजावटीसाठी वापरणार आहोत.
मग त्यामध्ये चाळलेला मैदा थोडा थोडा घालून मिक्स करत जा. आता आपला मिश्रनाचा एक गोळा तयार झाले.
आता आपण एक पातळ प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यावर बनवलेला गोळा ठेवून त्याला लांबट वळकुटि सारखा आकार द्या. आकार देताना प्लॅस्टिक पेपरचाच वापर करा ज्यावर आपण गोळा काढला आहे तो.
मग ती वळकुटि घट्ट करून बाजूनी रबर बॅन्ड लाऊन वळकुटि फ्रीजमध्ये 2 तास सेट करायला ठेवा. नंतर फ्रीजमधून वळकुटि काढून त्याच्या छोट्या छोट्या चकत्या कापून घ्या. व बेकिंग ट्रेमध्ये अरेंज करून ठेवा.
आपण जर बिस्किटस मायक्रोवेव्ह् बनवणार असाल तर प्रथम प्री-हिट करून घेऊन मग 25-30 मिनिट बेक करून घ्या.
थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.