ग्रह दोषापासून देतात मुक्ती रोटी तोटके चपातीचे उपाय सर्व परेशानी होतील दूर
ज्योतिष शास्त्रमध्ये चपाती म्हणजेच रोटीचे काही उपाय सांगितले आहेत ते केल्याने ग्रह दोष दूर होईल. रोटीचे तोटके विशेष लाभकारी आहेत.
ज्योतिष शास्त्रमध्ये असेकाही उपाय आहेत ते केल्याने ग्रह शांत व मजबूत बनतात. आपल्या जीवनात सफलता व धनलाभ होण्यासाठी रोटीचे उपाय खूप फलदाई आहेत. ते केल्याने परेशानी पासून छुटकारा मिळून मनोकामना पूर्ण होतील.
The text Roti Che Totke Roti Che Upay For Grah Dosh in Marathi be seen on our You tube Chanel Roti Che Totke Roti Che Upay For Grah Dosh
प्रतेक व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच अडचणी येत असतात ते चांगल्या कामात अडचणी आणू शकतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण बरेच उपाय करीत असतो पण तरी सुद्धा काही वेळेस उपयोग होत नाही. त्यासाठी आम्ही एक सोपा सरल उपाय सांगत आहोत तो केल्याने आपल्या जीवनात बदल घडू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त एक रोटी पाहिजे त्याच्यामुळे आपल्या समस्या दूर होऊ शकतील.
रोटीचे चमत्कारी तोटके:
1) आपण रोज सकाळी रोटी म्हणजेच चपाती बनवतो. तेव्हाच एक रोटी एक्स्ट्रा बनवून ठेवावी. हा टोटका करण्यासाठी एका रोटीचे 4 भाग करून प्रतेक भागावर काही गोड पदार्थ ठेवावा. त्यातील पहिला भाग गाईला खायला देवून एक छोटीशी प्रार्थना करावी आपल्या जीवनातील परेशानी दूर होऊदे.
रोटीचा दूसरा तुकडा कुत्र्याला खायला देताना मनातल्या मनात एक प्रार्थना करा की यमराजचे अनुकरण करणाऱ्या शाम व शबलला मी अन्नाचा एक भाग देत आहे ते ग्रहण करावे.
रोटीचा तिसरा भाग कावळ्याला खायला देवून मनातल्या मनात प्रार्थना करा पश्चिम, उत्तर, दक्षिण व पूर्व दिशेला राहणारा कावळ्याला मी दिलेले अन्न ग्रहण कर असे म्हणावे.
मग रोटीचा चौथा हिस्सा भूत-प्रेतांच्या नावांनी कुठल्यापण चौकात ठेवून घरी परत या. रोटीचा हा उपाय नियमित केल्यास आपल्या सर्व समस्या दूर होतील व आपल्याला दुर्भाग्यचा सामना करावा नाही लागणार.
2) कुंडलीमधील राहूची स्थिति खराब असेल व राहू दोष दूर करायचा असेलतर रोटीचा उपाय फायदेशीर आहे. शिळी किंवा ताजी रोटी घेऊन त्यावर सरसुचे तेल लावून काळ्या कुत्र्याला ती रोटी खायला द्या. असे रोज 15 दिवस केल्यास राहू दोष दूर होईल.
3) कुंडलीमद्धे पितृदोष असेलतर अमावस्याच्या दिवशी दोन रोटी व भाताची खीर बनवा. मग रोटीवर खीर घालून कावळ्याला खायला द्या. असे केल्याने पितृ दोष निघून जाईल.
4) घरात रोज भांडण तंटे होत असतीलतर सकाळी रोटी बनवताना पहिली रोटी कुत्र्यासाठी काढून ठेवा. असे केल्याने परिवारातील भांडणे मिटून सुख शांती येईल.
5) आर्थिक तंगी असेलतर रोटी वरती साखर घालून मुंग्यानया खायला द्या. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल. व आर्थिक परेशानी पासून छुटकारा मिळेल.
6) रोटी खाताना प्रथम एक रोटी गाईच्या नावानी काढून तिला खायला द्या. असे केल्याने घरात सुख शांती येते. ग्रह दोषापासून मुक्ती पाहिजे असेलतर कच्ची डाळ रोटी मध्ये ठेवून गाईला खायला द्या.
7) मासे म्हणजेच मछलिला रोटीचे तुकडे करून खायला दिल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी येते.