मऊ लुसलुशीत चॉकलेट केक क्रिसमस साठी
केक म्हंटलेकी सर्वाना आवडतो. आता क्रिसमस हा सण येत आहे. मग आपण घरी केक तर बनवलाच पाहिजे. बाजारात आपल्याला नानाविध प्रकारचे केक पहायला मिळतात. पण त्याच्या किमती सुद्धा जास्त असतात. आपण तासाच बेकरी स्टाइल चॉकलेट केक घरी बनवू शकतो.
चॉकलेट केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. आपण इतर वेळी डेझर्ट म्हणून बनवू शकतो किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा बनवू शकतो. पण आता नाताळ येत आहे तर मग आपण अगदी बाजार सारखा मऊ लुशलूशीत चॉकलेट केक घरीच बनवू या.
चॉकलेट केक चे एक सीक्रेट आहे ते म्हणजे केक बनवताना गरम पाणी वापरले आहे त्यामुळे तो इतका छान मऊ होतो की तोंडात टाकताच विरघळतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 35-40 मिनिट
वाढणी: 8 मोठे पिसेस होतात.
साहीत्य: 1 कप मैदा
1 कप पिठीसाखर
1/2 कप कोको पावडर
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
1/2 टी स्पून मीठ
1 टी स्पून कॉफी पावडर
1/2 कप तेल
1/2 कप गरम पाणी
1/2 कप दूध
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
1 अंडे
कृती: प्रथम केकच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये भांड्याच्या साईजचा बटर पेपर कापून लावा व भांडे बाजूला ठेवा. पाणी गरम करून घ्या. एका बाऊलमद्धे अंडे चांगले फेटून घ्या.
मैदा, पिठीसाखर, बेकिंग पाऊडर, बेकिंग सोडा, कॉफी पाऊडर व कोको पावडर चाळून बाजूला ठेवा.
एक मोठ्या आकाराच्या बाऊलमद्धे तेल व गरम पाणी चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये दूध, अंडे व एसेन्स घालून चांगले मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये चाळलेला मैदा घालून हळुवार पाने मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एकदा टॅप करून घ्या.
केकचे भांडे मायक्रोओव्हनमध्ये ठेवून 180 डिग्रीवर 35-40 मिनिट केक बेक करून घ्या. केक बेक झाल्यावर मायक्रोवेव्ह् बंद करून 15 मिनिट केक आतच राहू द्या.
15 मिनिट झाल्यावर केक बाहेर काढून थंड करून मगच सर्व्ह करा.