संकष्टी चतुर्थी विनायकी चतुर्थी गणेश भगवान प्रभावी मंत्र सर्व मनोकामना पूर्ण करील
प्रतेक महिन्यात गणेश संकष्टी चतुर्थी व विनायकी चतुर्थी येते. संकष्टी चतुर्थी ही कृष्णपक्ष मध्ये येथे तर विनायकी चतुर्थी ही शुक्लपक्ष मध्ये येते. ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा करतात. भगवान गणेश ह्यांना विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, गणपति, बप्पा, गणेश ह्यांना नावांनी संभोधले जाते. असे म्हणतात की जो भक्त गणेश भगवान ह्यांची भक्ति भावाने पूजा अर्चा व मंत्र जाप करेल त्याच्या जीवनातील सर्व कष्ट, दुख व संकट दूर होतील. व जीवनात सर्व मंगल होईल.
The text Powerful Ganesh Chatrurth Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Powerful Ganesh Chatrurth Mantra
नारद पुराणा नुसार संकष्टी चतुर्थी ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास करावा. संध्याकाळी गणेश भगवान ह्यांची पूजा आरती करून गणेश व्रत कथा आइकावी. संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची मनोभावे पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. व घरात शांती राहून सर्व परेशानी दूर होतात. त्याच बरोबर गणेश भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी रात्री चंद्र दर्शन घेणे शुभ मानले जाते. सूर्य दर्शन झाल्यावर सुरू होणारे व्रत चंद्रदर्शन झाल्यावर समाप्त होते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत नियम पाळून पूर्ण दिवस उपवास करून गणेश भगवान ह्यांचा मंत्र जाप केल्यास सुख शांती, वैभव, यश स्वास्थ प्राप्त होते म्हणून पुढे दिलेला मंत्र जाप मनोभावे व श्रद्धापूर्वक करावा. गणेश भगवान आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
गणेश जी के मंत्र | Mantra OF Lord Ganesha
* ॐ गं गणपतये नम:
* वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्य समप्रभ। निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
श्री गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्॥