मार्गाशीष अमावस्या 2022 गुरुवार उद्यापन कसे करावे संपूर्ण माहिती
22 डिसेंबर 2022 गुरुवार ह्या दिवशी मार्गाशीष अमावस्या आहे तसेच ह्या दिवशी मार्गाशीष महिन्यातील 5 वा गुरुवार म्हणजेच शेवटचा गुरुवार आहे. तर ह्या दिवशी उद्यापन कसे करावे हा प्रश्न पडला असेल तर आपण उद्यापनाची संपूर्ण माहिती येथे बघणार आहोत.
The text Margashirsha Amavasya 2022 Guruwar Udyapan Kase Karawe in Marathi be seen on our You tube Chanel Margashirsha Amavasya 2022 Guruwar
मार्गशीर्ष महिना गुरुवार व्रत आरंभ 24 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाला असून त्याची समाप्ती 22 डिसेंबर 2022 गुरुवार ह्या दिवशी होणार आहे.
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार 22 डिसेंबर 2022 ह्या दिवशी आहे. अमावस्या ह्या दिवशी आपण गुरुवार महालक्ष्मी व्रतचे उद्यापन करू शकता. आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो तो सुद्धा दिवश अमावस्याचा असतो. अमावस्या हा दिवस लक्ष्मीची पूजा अर्चा करण्यासाठी चांगला आहे.
मार्गशीर्ष अमावस्या तिथी आरंभ व समाप्ती
अमावस्या आरंभ 22 डिसेंबर गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिट
अमावस्या समाप्ती 23 डिसेंबर 2022 शुक्रवार दुपारी 3 वाजून 27 मिनिट
मार्गाशीष अमावस्या गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिट पासून सुरू होत आहे. अमावस्या सुरू होण्याच्या अगोदर उद्यापन करू शकता. आपण जसे चारी गुरुवार महालक्ष्मीची पूजा अर्चा कलश स्थापना केली तसेच शेवटच्या गुरुवारी सुद्धा करायची पूर्ण दिवस उपवास करून 7 वाजून 14 मिनिट च्या आत आपण हळदी-कुंकू करून सवाष्ण महिलेची खाणा नारळांनी ओटी भरून मग आरती व त्याच बरोबर गोडाचा नेवेद्य दाखवून उपवास सोडावा.
समजा काही कारणा मुळे आपण अमावस्या सुरू होण्याच्या आता उद्यापन करू शकले नाही तर आपण अमावस्या सुरू झाल्यावर सुद्धा करू शकता. अमावस्या हा दिवस महालक्ष्मी देवीची पूजा अर्चा करण्यास चांगला दिवस आहे.
मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आपण कलशातील पाणी आपल्या घरात सर्व ठिकाणी शिंपडावे व राहिलेले पाणी तुळशीला घालावे. पाने फुले विसर्जन करायची. तांदूळ भात बनवण्यासाठी वापरावा.
आता महत्वाचे म्हणजे कलशावरील नारळ त्याचे काय करावे. काहींच्या मते नारळ फोडून आपण त्याचा गोड पदार्थ बनवावा. पण आपण पहिल्या गुरुवारी कलशावर नारळ ठेवतो व चारी गुरुवार त्याची पूजा करतो मग तो नारळ कसा बर फोडायचा तर कलशावरील नारळ आपण नदीमध्ये विसर्जित करावा. अश्या प्रकारे उद्यापन करावे.
मंत्र जाप मनोभावे 108 वेळा करावा
ॐ ऐं श्रीं महालक्ष्म्यै नमः: