केक चांगला होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स व 40 केकच्या नानाविध
केकचे नानाविध असंख्य प्रकार पोस्टच्या सर्वात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी वापरावी तसेच ओव्हन नीट चालतो की नाही ते बघावे.
The text Tips For Baking Perfect Cakes | 40 Variety Of Cakes At Home in Marathi be seen on our You tube Chanel Tips For Baking Perfect Cakes At Home
केक करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या:
1) केक बनवताना आपल्याला जे साहीत्य लागते ते प्रमाण बद्ध म्हणजे बरोबर मोजून घ्यावे.
2) केक बनवण्याच्या आगोदर ओव्हन नीट चालतो का ते चालू करून बघावे. केक ओव्हनमध्ये ठेवण्या आगोदर ओव्हन गरम करून घ्या मगच भांडे आत ठेवा.
3)केक बनवताना मैदा ताजा व चांगल्या प्रतीचा वापरा.
4) केक बनवताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधी थोडा वेळ बाजूला काढून ठेवा. अंडी वापरताना चांगली फेटून घ्या.
5) केकचे मिश्रण बनवण्या अगोदर भांड्याला लोणी लावून ठेवा.
6) केक न फुगण्याची काही महत्वाची कारणे:
7) केकचे मिश्रण चांगले फेसले गेलेले नसल्यास
8) ओव्हन नीट गरम झाला नसल्यास किंवा व्होलटेज पुरेसे नसल्यास
9) साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यावर परत चपटा होतो.
10) बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जुना वापरल्यास किंवा दिलेल्या प्रमाणा पेक्षा बेकिंग पावडर जास्त झाल्यास केक फुगत नाही.
11) केक बनवताना लोणी घरगुती अथवा बाजारातील पांढरे लोणी वापरावे. जर पूर्ण लोणी वापरणे शक्य नसेल तर अर्धे लोणी व अर्धे डालडा वापरावे. केक बनवतांना साजूक तूप वापरू नये. लोण्या आयवजी मार्गारीन किंवा वनस्पती तूप वापरावे.
केकच्या नानाविध प्रकारच्या रेसीपी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा: 40 प्रकारचे नानाविध अप्रतिम केक