31 डिसेंबरसाठी परफेक्ट चॉकलेट कॅरामल पुडिंग मुलांसाठी
आता 31 डिसेंबर आहे त्यासाठी मस्त पैकी पुडिंग बनवू या. ह्या चॉकलेट कॅरामल पुडीग हे पुडीग खूपच छान लागते. घरी छोट्या पार्टी साठी करू शकता. लहान मुलांना हे खूप आवडेल. त्यामध्ये दुध व अंडे आहे. त्यामुळे पौस्टिक तर आहेच व चॉकलेट मुळे चव छान लागते. जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून देता येते. आपल्या कडे कोणी पाहुणे येणार असतील तर ही पुडिंग बनवू शकता.
आपण पुडिंगचे विविध प्रकार पाहिले. आता आपण चॉकलेट कॅरामल पुडीग कसे बनवायचे ते पाहू या. चॉकलेट कॅरामल पुडीग हे आपण थंडीमद्धे, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा पावसाळा ह्या सीझनमध्ये सुद्धा बनवू शकतो. चॉकलेट कॅरामल पुडीग थंड करून सर्व्ह करावे म्हणजेत्याची टेस्ट खूप छान लागते. आपण कोको पावडर न टाकता सुद्धा अश्या प्रकारचे पुडिंग बनवू शकता.
चॉकलेट कॅरामल पुडीग बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
२ कप दुध
२ अंडी
१ टे स्पून कोको पावडर
2 टे स्पून साखर
१ ब्रेड स्लाईस
३-४ थेंब व्हनीला एसेन्स
कॅरामल करण्यासाठी:
2 टे स्पून साखर
२ टे स्पून पाणी
कृती:
प्रथम दुध गरम करून त्यामध्ये साखर व कोको पावडर विरघळून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये ब्रेडची स्लाइस कुस्करून दुधामद्धे मिक्स करून घ्या. अंडे काटे चमचानी फेटून घ्या. मग अंड्यामद्धे व्हनीला एसेन्स मिक्स करून घेऊन मिश्रण दुधामद्धे मिक्स करून घेऊन बाजूला ठेवा. कुकरमद्धे पाणी घालून गरम करायला ठेवा.
एक मध्यम आकाराच्या जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी पसरा. विस्तवावर भांडे गरम करायला ठेवून साखर ब्राऊन होई पर्यन्त भांडे विस्तवावर ठेवा. चमचानि सारखे हलवत रहा मग साखर ब्राऊन झाली की विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या. मग भांड्यामध्ये तयार केलेले दुधाचे मिश्रण ओता.
कुकर मध्ये पाणी गरम झाल्यावर मिश्रणाचे भांडे कुकर मध्ये ठेवा व त्यावर स्टेनलेस स्टीलची प्लेट ठेवा. कुकरचे झाकण लावून 6-7 शिट्या काढा. कुकरच्या शिट्या झाल्यावर विस्तव बंद करून घ्या. मग कुकर मधील भांडे बाहेर काढून थंड करायला ठेवा. भांडे थंड झाल्यावर एका काचेच्या खोलगट प्लेटमध्ये पूडिंग काढायचे आहे.
त्यासाठी भांड्यावर काचेची प्लेट ठेऊन भांडे उलटे करायचे आहे. पण अगदी हळुवार पणे करायचे आहे पुडिंगचा शेप बदलता कामा नये व जेणेकरून पुडिंगची खालची बाजू वरती आली पाहिजे म्हणजे कॅरामल केलेली बाजू वरती आली पाहिजे.
मग पूडिंगची प्लेट फ्रीजमध्ये 2 तास थंड करायला ठेवा म्हणजे पुडिंग मस्त थंड होईल. मग थंड झाल्यावर त्याचे पिसेस करून सर्व्ह करा.