टेस्टी स्पायसी दम आलू बिर्याणी
आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी बनवतो. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, फिश बिर्याणी, व्हेज बिर्याणी इ. आपण आज टेस्टी स्पायसी दम आलू बिर्याणी कशी बनायची ते पाहणार आहोत.
The text Tasty Spicy Dum Aloo Biryani One Dish Meal in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Spicy Dum Aloo Biryani
टेस्टी स्पायसी दम आलू बिर्याणी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच झटपट होणारी आहे. आपण ह्याला वन डिश मिल सुद्धा म्हणू शकतो. बिर्याणी बरोबर फक्त रायता केले तरी चालते. आपण कोणी पाहुणे येणार असतील किंवा इतर वेळी सुद्धा बिर्याणी बनवू शकतो.
आपण नेहमी दम आलू बनवतो व पराठा बरोबर सर्व्ह करतो पण टेस्टी स्पायसी दम आलू बिर्याणी बनवून बघा सर्वाना आवडेल. तसेच नेहमी तेच तेच चपाती भाजी खाऊन सुद्धा मुले कंटाळतात मग टेस्टी स्पायसी दम आलू बिर्याणी बनवा सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
भात बनवण्यासाठी:
2 कप तांदूळ बासमती
1 तमालपत्र
7-8 मिरे
3-4 लवंग
2-3 हिरवे वेलदोडे
1 टी स्पून शहाजिरे
मीठ चवीने
1 चमचा तेल
दम आलू बनवण्यासाठी:
मॅरीनेट करण्यासाठी:
4 टे स्पून तेल (बटाटे तळण्यासाठी)
10-12 छोटे बटाटे (उकडून सोलून)
1/2 वाटी ताजे दही
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
दम आलू मसाला करिता:
2 टे स्पून तेल
1 मोठा कांदा (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
सजावटी करिता: 1 मोठा कांदा उभा पातळ चिरून छान खमंग होईल पर्यन्त तळून घ्या. 2 टे स्पून कोथिंबीर (धुवून चिरून) 1 टे स्पून पुदिना पाने (धुवून, चिरून)
कृती:
मॅरीनेट करण्यासाठी: प्रथम छोटे बटाटे धुवून, उकडून (अर्धवट) सिलून त्याला टोचे मारून तेलामध्ये छान खमंग तळून घ्या. मग एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये तळलेले बटाटे, 1/2 वाटी ताजे दही, 1 टी स्पून आल-लसूण पेस्ट, 1 टी स्पून लाल मिरची पावडर, 1/2 टी स्पून हळद, 1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर, मीठ चवीने घालून मिक्स करून 1 तास फ्रीजमध्ये झाकून ठेवा.
भात बनवण्यासाठी: तांदूळ धुवून 20 मिनिट बाजूला ठेवा. मग कुरकरमद्धे 3 3/4 कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झालेकी त्यामध्ये तेल, मीठ चवीने, 1 तमालपत्र, 7-8 मिरे, 3-4 लवंग, 2-3 हिरवे वेलदोडे, 1 टी स्पून शहाजिरे घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ घालून मिक्स करून 2 शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून भात थंड करायला ठेवा.
दमआलू बनवण्यासाठी: बटाटे तळून राहिलेल्या टेलातच चिरलेला बारीक कांदा थोडा गुलाबी रंगावर भाजून त्यामध्ये चिरलेला टोमॅटो व आले-लसूण पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्या. पाहिजे असेलतर तर अजून थोडेसे तेल घाला. मग त्यामध्ये मॅरीनेट केलेले बटाटे घालून 2-3 मिनिट परतून घ्या. दहयाचा वास गेला पाहिजे. मग झाकण ठेवून 2 मिनिट चांगली वाफ येऊ द्या.
दम आलू बिर्याणी कशी लावायची: शिजवलेल्या भाताचे 3 भाग करा. कुकरमद्धे प्रथम भाताचा एक लेयर द्या मग त्याच्या वर दम आलूचा निमा भागाचा लेयर देवून थोडा तळलेला कांदा घालून मग परत भाताचा एक लेयर द्या परत त्यावर राहिलेल्या दम आलूचा लेयर देऊन तळलेला थोडा कांदा व कोथिंबीर व पुदिना घाला मग त्यावर राहिलेला भात घालून थोडी कोथिंबीर घालून 1 टे स्पून साजूक तूप घालून कुकरचे झाकण लावा. मग कुकर मंद आचेवर तव्यावर 15-20 मिनिट ठेवा.
गरम गरम दमआलू बिर्याणी सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर, व तळलेला कांदा घालून रायता बरोबर सर्व्ह करा.