नवीन वर्षातील पहिली शनि अमावस्या | २१ जानेवारी मौनी अमावस्या मुहूर्त दान काय करावे-करू नये
माघ महिन्यातील मौनी अमावस्या २१ जानेवारी २०२३ शनिवार ह्या दिवशी आहे. नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या टे सुद्धा शनिवारी येणारी. मौनी अमावस्या ह्या दिवशी स्नान मुहूर्त तसेच ह्या दिवशी काय दान करावे. स्कंद पुराणामध्ये अमावस्या ह्या तिथीला पर्व म्हणतात.
The text Mauni Amavasya 2023 Muhurat, Dan, Kay Karave-Karu Naye in Marathi be seen on our You tube Chanel Mauni Amavasya 2023 Muhurat, Dan, Kay Karave-Karu Naye
मौनी अमावस्या ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास आपले दोष दूर होतात. ह्या दिवशी व्रत, तर्पण व दान केल्याने असंभव कार्य पूर्ण होतात. चला तर मग पाहू या मौनी अमावस्याची सही तारीख, स्नान मुहूर्त व ह्या दिवशी काय करावे.
पंचांग नुसार मौनी अमावस्या २१ जानेवारी २०२३ शनिवार
अमावस्या आरंभ: सकाळी ६ वाजून १७ मिनिट ते
अमावस्या समाप्ती: २२ जानेवारी २०२३ पहाटे सकाळी २ वाजून २२ मिनिट
२० वर्षा नंतर मौनी अमावस्या ही शनिवार ह्या दिवशी येण्याचा संयोग आला आहे.
ज्योतिषींच्या अनुसार २० वर्षा नंतर हा संयोग आला आहे. त्याच बरोबर ३० वर्षा नंतर मौनी शनिवार अमावस्या ह्या दिवशी शनिदेव कुंभ राशीमध्ये विराजमान होतील. शनिवार ह्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला शनि अमावस्या म्हटले जाते. ह्या दिवशी मौन व्रत ठेवून तर्पण व दान केल्याने व्यक्तिला पितृदोष, कालसर्प दोष व त्याच बरोबर शनि दोषा पासून मुक्ती मिळते.
शनि अमावस्या ह्या दिवशी काय दान करावे?
1) शनि अमावस्या ह्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा बघावा मग ते तेल दान करावे. असे केल्याने आपल्या जीवनातील बरेच कष्ट नष्ट होतात त्याच बरोबर शरीरीक पीडा पासून छुटकारा मिळतो.
2) मौनी अमावस्याच्या दिवशी पाण्यात काळे तिळ घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. त्याच बरोबर काळे तिळ दान करावे. त्यामुळे बिघडलेली कामे सुरळीत होतात.
3) सरसुचे तेल म्हणजेच मोहरीचे तेल, उडीदडाळ, कंबळ, लोखंडे दान करणाऱ्या व्यक्तिला शनिची कृपा मिळते. त्याला धनाची कमी कधी सुद्धा होत नाही. त्याच बरोबर पितरांचे आशीर्वाद मिळतात.
मौनी अमावस्याच्या दिवशी पुढील ५ कामे करणे महापाप:
१) शास्त्रा नुसार अमावस्या ह्या तिथीला पितरांची पूजा तसेच तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पुण्य मिळते. असे म्हणतात की अमावस्या ह्या दिवशी पितरांच्यासाठी केलेले दान किंवा पूजाविधी मुळे पुण्य मिळते. पण ह्या दिवशी जो कोणी पितरांच्या बद्दल अपशब्द ऊचार करील किंवा त्याना कोसेल किंवा त्यांची उपेक्षा करेल त्याना जीवनात बरेच कष्ट भोगावी लागतील.
२) ह्या वर्षी मौनी अमावस्या शनिवार ह्या दिवशी येण्याचा संयोग बऱ्याच वर्षांनी आला आहे. असे म्हणतात की शनि अमावस्या ह्या दिवशी शनि भगवान ह्यांच्या संबंधित उपाय केले तर कुंडली मधील शनिदोष दूर होतो. जर ह्या दिवशी शनि संबंधित वस्तुची उपेक्षा केली तर त्याची वाईट फळे भोगावी लागतात. म्हणूनच ह्या दिवशी गरीब व्यक्ति, प्राणी किंवा दिव्यांग ह्यांना सतावू नये.
३) ज्योतिष शास्त्रा नुसार ह्या दिवशी मौन पाळण्याचा नियम सांगितला आहे. म्हणूनच ह्या दिवशी मौन पाळले पाहिजे कोणा बद्दल अपशब्द बोलू नये. असे म्हणतात की अमावस्याच्या दिवशी कोणा बरोबर वाद झाला तर तो बरेच दिवस चालू रहातो. त्यामुळे बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते.
४) अमावस्या ह्या दिवशी पूर्ण घराची साफ-सफाई केल्याने लक्ष्मी माताची कृपा राहते. जर घराची साफ सफाई नकरतां घरात तसाच पसारा ठेवला तर आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते.
५) शास्त्रा नुसार अमावस्या ह्या दिवशी उशिरा पर्यन्त झोपू नये. रात्री सुनसान जागी जाऊ नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जामुळे नुकसान होऊ शकते.
नोट: ही माहिती आपल्या जाणकारी साठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा पुष्टी आम्ही घेत नाही.