वास्तु टिप्स: वास्तु शास्त्र नुसार घरात कोणत्या दिशेला तांब्याचा सूर्य लावल्याने समृद्धी मिळेल
आपल्या घरातील हॉल म्हणजेच ड्रॉइंग रूम मध्ये पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य लावल्याने आनंदी वातावरण राहील. पण एक लक्षात ठेवा तांब्याचा सूर्य बेडरूममध्ये कधी सुद्धा लाऊ नये.
वास्तु शास्त्रमध्ये मनुष्यच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची शक्ति आहे. त्यामुळे काही सरल, सटीक व सोपे उपाय आपण केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आनंदी वातावरण होऊ शकते.
The text Vastu Tips: Best Direction To Place Copper Sun Will Bring Prosperity in Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: To Place Copper Sun In Our House/ Work Place
आपल्या सर्वांची इच्छा असतेकी घरात सुख-समृद्धी असावी. त्यासाठी घरातील प्रतेक व्यक्ति प्रयत्न सुद्धा करीत असतो. असे बरेच लोक वास्तु शास्त्र मधील सांगितलेले उपाय सुद्धा करीत असतात व ते उपाय करून घरात सकारात्मकता सुद्धा ठेवत असतात.
वास्तु शास्त्रमध्ये असे बरेच सरल, सोपे व सटीक उपाय सांगितले आहेत त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहू शकते. त्यामधील एक उपाय म्हणजे तांब्याचा सूर्य घरात लावणे. त्यामुळे बरेच फायदे होतात. पण त्याची योग्य दिशा आहे त्याच दिशेला लावावे.
तांब्याचा सूर्य घरात लावण्याचे फायदे किंवा लाभ:
वास्तु शास्त्र नुसार जी कोणी व्यक्ति घरात तांब्याचा सूर्य लावत असते तर त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद, यश, किर्ती, व समृद्धी प्राप्त होते. तांब्याचा सूर्यला ऊर्जा निर्माण करणारे स्तोत्र मानले जाते.
तांबा हा एक प्रभावशाली धातू आहे. जसे घरात तांब्याचा सूर्य लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते तसेच घरातील सदस्यांमद्धे सामंजस्य येते. त्याच बरोबर तांब्याच्या सूर्या मधून जशी येते त्यामुळे घरातील वातावरण बदलते व शुद्ध होते. त्यामुळे पारिवारीक कलह होत नाहीत व तनाव कमी होतो.
आपल्याला वाटत असेल की आपण सफल व्हावे व लोकप्रिय बनावे तर घरात तांब्याच्या सूर्य जरूर लावावा. त्याच बरोबर आपण आपल्या कामाच्या जागी सुद्धा तांब्याचा सूर्य लाऊ शकता त्यामुळे सफलता मिळू शकेल.
आता आपण पाहू या तांब्याचा सूर्य लावण्याचे नियम काय आहेत:
1. वास्तुशास्त्र नुसार आपल्या घरात पूर्व दिशेला दरवाजा किंवा खिडकी नसेलतर त्या भिंतीवर आपण तांब्याचा सूर्य लावू शकता. असे केल्याने आपल्या घरात ऊर्जा निर्माण होते जी सूर्या कडून पूर्व दिशे पासून मिळते.
2. वास्तु शास्त्र नुसार आपण आपल्या पूजा घरच्या ईशान्य दिशेला सुद्धा तांब्याचा सूर्य लावणे शुभ आहे.
3. आपल्या हॉलमध्ये म्हणजेच लिविंग रूममध्ये पूर्व दिशेला लावणे शुभ आहे.
4. वास्तु शास्त्र नुसार आपण आपल्या कामाच्या जागी किंवा व्यापाराच्या जागी पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य लावू शकता त्यामुळे आपल्या नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल व आपला व्यवसाय असेल तर व्यवसायात म्हणजेच व्यापारात चांगली प्रगती होईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
वास्तु शास्त्र नुसार तांब्याचा सूर्य या ठिकाणी लाऊ नये:
1. वास्तु शास्त्र नुसार तांब्याचा सूर्य बेडरूममध्ये कधी सुद्धा लाऊ नये.
2. आपल्या घरात तांब्याचा सूर्य लावला तर नेहमी तो स्वच्छ ठेवावा नाहीतर नकारात्मक ऊर्जाचा परिणाम होऊ शकतो.
3. आपण आपल्या घरात तांब्याचा सूर्य लावला आहे व तो समजा खराब झाला किंवा तुटला तर लगेच काढून ठेवावा.