शास्त्रानुसार महिलांनी ह्या दिवशी चुकून सुद्धा केस धुवू नये!
शास्त्रानुसार महिलांनी कधी केस धुवावे किंवा कधी केस धुवू नये त्याचे परिणाम काय होतात
विवाहित महिला किंवा मुलीनि केस धुण्याचे दिवस ठरलेले असतात त्याच दिवशी धुणे योग्य असते त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितिवर होतो.
The text According to Shastra, women should not wash their hair even by mistake on this day in Marathi be seen on our You tube Chanel According to Shastra, women should not wash their hair on this day
शास्त्रानुसार विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नये खर म्हणजे फक्त महिलाच नाही तर पुरुषांनी सुद्धा गुरुवारी केस धुवू नये. तसेच ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी चुकून सुद्धा केस धुवू नये.
भारतामध्ये नारी शक्तिचे विशेष महत्व आहे. त्याच बरोबर शास्त्रामध्ये महिलांसाठी काही नियम सुद्धा केले आहेत. त्यामधील एक नियम म्हणजे महिलांनी केस कधी धुवावे. असे म्हणतात की ज्या महिला ह्या नियमांचे पालन करीत नाही त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितिवर होतो.
शास्त्रा नुसार शुक्रवार ह्या दिवशी केस धुणे खूप शुभ मानले जाते कारणकी शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून महिलांनी शुक्रवारी जरूर केस धुवावे. त्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते व त्यांची कृपा नेहमी राहते. अजून एक गोष्ट आहे की आपल्याला एक मुलगी आहे व आपल्याला अजून एक मुलगा पाहिजे असेलतर शुक्रवार ह्या दिवशी जरूर केस धुवावे त्याच बरोबर शुकवार ह्या दिवशी केस कापणे सुद्धा शुभ मानले जाते.
महिलांनी केस कधी धुवावे व कधी धुवू नये:
अविवाहित मुलींनी चुकून सुद्धा बुधवारी केस धुवू नये. खास करून त्यांच्या पाठीवर लहान भाऊ असेलतर त्यांनी बुधवारी केस धुण्याची चूक करू नये. शास्त्रा नुसार असे म्हणतात की ज्या मुलींच्या पाठीवर लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुतले तर भावाला खूप कष्टाचा सामना करावा लागतो.
आपण प्रतेक शुभ प्रसंगाला किंवा सणावाराला महिला आपल्या केसांवर ट्रीटमेंट करून घेतात म्हणजे कापून धुवून घेतात त्या जरा सुद्धा विचार करीत नाहीत. पण ज्योतिष शास्त्रा नुसार शुभ दिवस, शुभ मुहूर्त, शुभ पर्व, खास करून पूर्णिमा, अमावस्या व एकादशी ह्या दिवशी कधी सुद्धा केस धुवू नये किंवा कापू सुद्धा नये. ही सर्व आपण शुभ तिथीच्या अगोदर करावे.
आपला कधी उपवास असतो त्या दिवशी चुकून सुद्धा केस धुवू नये. जर आपला सोमवार ह्या दिवसाचा उपवास आहे तर आधल्या दिवशी आपण केस धुवावे. जर काही कारणा मुळे आपल्याला केस धुवावे लागले तर केसांना थोडेसे कच्चे दूध लावावे मग धुवावे.
गुरुवारी केस धुवू नये तसेच शनिवार हा शनि देवाचा दिवस आहे तर त्या दिवशी केसांना तेल लावावे पण केस धुवू नये.