३ वेळा हनुमान चालीसा वाचण्याचे ४ अद्भुत चमत्कारी फायदे
हिंदू धर्मामध्ये हनुमानजिना जागृत देवताच्या रूपात मानले जाते. असे म्हणतात की पूर्ण दुनियामध्ये फक्त हनुमानजी भूतलावावर उपस्थित आहेत. म्हणूनच हिंदू धर्मा मध्ये हनुमानजीची पूजा अर्चा केली जाते. असे म्हणतात की हनुमान भगवान ह्यांची मनापासून उपासना केलीतर मनुष्यच्या जीवनातील सर्व संकटांचे निवारण होते.
The text 3 Wela Hanuman Chalisa Vachnyache 4 Chamatkari Fayde in Marathi be seen on our You tube Chanel 3 Wela Hanuman Chalisa Vachnyache 4 Chamatkari Fayde
हनुमानजीनची विशेष कृपा मिळण्यासाठी हनुमान चालीसाचे पाठ करणे फायदेमंद मानले जाते. तसे पहिलेतर हनुमान चालीसाचे जाप करण्याचे बरेच फायदे आहेत. आज आपण हनुमान चालीसा ३ वेळा वाचण्याचे काय फायदे आहेत ते पहाणार आहोत.
3 वेळा हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे
१) आत्मविश्वास वाढतो:
बरेच वेळा आपण पहातो की काही जणांमद्धे आत्मविश्वास कमी असतो. त्यांचा त्यांच्यावर सुद्धा विश्वास नसतो. अश्या लोकांसाठी हनुमान चालीसाचे वाचन करणे खूप लाभदायक असते. अशी लोक रोज सकाळी व संध्याकाळी ३-३ वेळा हनुमान चालीसाचे वाचन करतील तर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल.
२) नकारात्मक ऊर्जा दूर होते:
बरेच वेळा खूप लोक डोक्यात नुसता नकारात्मक विचार करीत असतात. म्हणूनच ते आपले काम नीट पूर्ण करू शकत नाही. अशी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज ३ वेळा हनुमान चालीसाकहा जाप करा. रोज हनुमान चालीसाचा जाप केल्याने आपल्या विचारात वृद्धी होते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
3) रोगांपासून मिळते मुक्ती:
जर कोणी बरेच दिवसांपासून कोणत्या रोगांपासून त्रस्त आहे व खूप उपचार करून सुद्धा रोगा पासून मुक्ती मिळत नाही अश्या व्यक्तिनि रोज ३ वेळा हनुमान चालीसाचे वाचन करावे त्यामुळे रोगा पासून मुक्ती मिळू शकते.
४) मनोकामना पूर्ण होते:
रोज हनुमान चालीसाचे ३ वेळा वाचन केल्यास आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर आपल्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळते.
हनुमान चालीसाचा जाप करताना पुढे दिलेले नियम पाळावे:
१) जेव्हा पण हनुमान चालीसाचा जाप कराल तेव्हा आपल्या समोर भगवान राम ह्याचा फोटो स्थापित करावा मग जाप सुरू करावा.
२) हनुमान चालीसाचा जाप करण्याच्या अगोदर श्री राम ह्यांच्या फोटोच्या जवळ एक पाण्याचा कलश जरूर ठेवावा.
३) हनुमान चालीसाचा जाप रोज ठरलेल्या वेळीच करावा. म्हणजे आपण रोज सकाळी ८ वाजता जाप करायचा ठरवले तर रोज सकाळी ८ वाजताच जाप करावा.
४) हनुमान चालीसाचा जाप करताना उच्चार अगदी बरोबर करावे.
५) जो पर्यन्त आपण हनुमान चालीसाचा जाप करताल तो पर्यन्त सात्विक भोजन करावे मांस-दारू इ चे सेवन करू नये.
६) हनुमानजीनची पूजा करण्याच्या अगोदर श्री राम ह्यांची पूजा करावी.
अश्या प्रकारे हनुमान चालीसाचा जाप करताना नियमांचे पालन करावे. हनुमान चालीसाचा जाप केल्याने मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पीडा व दुख दूर होतात व सुख शांती प्राप्त होते.