१० आरोग्यदायी रताळे | (शकरकंद|स्वीट पोटयाटो) सेवनाचे फायदे
रताळी म्हणजेच स्वीट पोटयाटो सेवनाचे थंडीमध्ये जास्त फायदे होतात. कारणकी त्याच्या मध्ये शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे फायदे जास्त प्रमाणात आहेत. खर म्हणजे बरेच जण बटाटा व रताळी ह्याचे समान फायदे आहेत असे म्हणतात पण रताळ्यामध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्व आहेत.
The text 10 Amazing Health Benefits Of Eating Ratalu Sweet Potato in Marathi be seen on our You tube Chanel Benefits Of Eating Ratalu Sweet Potato
* रताळे सेवनाचे फायदे थंडी ह्या सीझनमध्ये आहेत. कारणकी ते आपले शरीर गरम ठेवते. रताळ्यामध्ये बीटा-कैरोटीन व विटामिन ए भरपूर प्रमाणात आहे. १०० ग्राम रताळ्यामध्ये ४०० ग्राम विटामीन ए असते.
* रताळ्यामध्ये आयर्न, फोलेट, कॉपर, मैगनीशियम, विटामिन्स आहे. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढते. त्याच्या सेवनाने त्वचेवर चमक येते. चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. त्यामधील विटामीन सी त्वचेमधील कोलजिन निर्माण करते. त्यामुळे तुम्ही नेहमी सुंदर व जवान दिसता.
* रताळीमध्ये डायट्री फाइबर व कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात आहे. रताळी ही चवीला गोड लागतात. त्याच्या सेवनाने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. शरीरातील शक्ति वाढवते. ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते. त्यामधील विटामीन बी ६ डायबीटीक हार्ट डिजीज मध्ये फायदेमंद आहे.
* रताळे हे भरपूर प्रमाणात स्टार्च असलेले फूड आहे. ते चवीला गोड आहे. त्याच्या सेवनाने शरीराचे वजन कमी होते व त्याच बरोबर हृदयरोग व हार्ट डिजीज पासून मृत्यूची जोखीम कमी होते.
* जर आपली ब्लड शुगर लेवल काही सुद्धा खण्याने वाढत असेलतर लगेच रताळे सेवन करावे. त्यामुळे लगेच ब्लड शुगर नियंत्रणात येईल व इंसुलिन वाढणार नाही.
* रताळीमध्ये कॅलरी व स्टार्च थोडेसे आहे. सैचुरेटेड फैट व कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात आहे. तसेच त्यामध्ये फाइबर, एंटी-ऑक्सीडेंट्स व विटामिन भरपूर प्रमाणात आहे.
* रताळी मध्ये भरपूर प्रमाणात विटामीन बी ६ आहे. जे आपल्या शरीरामधील होमोसिस्टीन नावाचे अमिनो एसिडचा स्तर कमी करण्यास मदत करते. अमिनो एसिडचे प्रमाण वाढले तर शरीरातील रोग वाढण्याची शक्यता असते.
* रताळी मध्ये विटामीन डी भरपूर प्रमाणात आहे हे विटामीन दांत, हाडे, त्वचा, व नसा मजबूत बनवण्यास मदत करतात. त्यामध्ये विटामीन ए पण आहे. त्याच्या मुळे शरीरालाला ९०% विटामीन ए मिळते.
* रताळीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे. शरीरातील आयर्न कमी झाले तर आपल्याला एनर्जी राहात नाही. रोग प्रतिकार शक्ति कमी होते. ब्लड सेल्स नीट निर्माण होत नाहीत. रताळी आयर्न ची कमी दूर करण्यास मदत करते.
* रताळ्यामध्ये पोट्याशियाम पण आहे. ते नर्वस सिस्टिमला नीट ठेवते. त्याच बरोबर किडनीचे स्वास्थ नीट ठेवण्यास महत्वपूर्ण योगदान देते.