शास्त्रानुसार या दिवशी महिलांनी केस धुणे आहे शुभ, श्रीमंत बनण्याच्या बरोबर वाढेल सुंदरता ते कसे
हिंदू धर्मामध्ये केस कापणे किंवा नख कापणे ह्याचे दिवस ठरलेले आहेत. जर आठोडयातील विशिष्ट दिवशी केस धुतले तर सुंदरता अधिक वाढते त्याच बरोबर घरात धन आकर्षण होते.
खर म्हणजे आपण कोणता सणवार असला किंवा कुठे कार्यक्रमाला जाताना केस धुतो पण तसे न करता शास्त्रा नुसार केस धुतले तर त्याचे फायदे सुद्धा आपल्याला होऊ शकतात.
The text Aauspicious Days To Washing Hair For Women V in Marathi be seen on our You tube Chanel Aauspicious Days To Washing Hair For Women
केस धुण्याचा सर्वात शुभ दिवस:
हिंदू धर्मामध्ये केस धुण्याचे शुभ-अशुभ दिवस सांगितले आहेत. त्याच्या मध्ये महिलांसाठी काही वेगळे नियम आहेत. म्हणजेच विवाहित महिला किंवा कुमारिका मुली म्हणजेच अविवाहित महिला किंवा मुली ह्यांच्यासाठी केस धुण्याचे वेगवेगळे दिवस आहेत. जर धर्म व ज्योतिष शास्त्र नुसार केस धुतले तर अजून सुंदरता मध्ये वाढ होते. त्याच बरोबर घरात सुख संपत्ति येते. पण जर चुकीच्या दिवशी केस धुतलेतर जीवनात नकारात्मकता वाढते.
चला तर मग बघूया कोणत्या दिवशी केस धुतल्यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो.
सोमवार: धर्मशास्त्रानुसार विवाहित महिलांनी सोमवार ह्या दिवशी केस धुवू नये त्यामुळे परिवारातील उन्नती मध्ये बाधा येवू शकते. पण अविवाहित महिला किंवा मुली ह्या ह्या दिवशी केस धुवू शकतात.
मंगळवार: मंगळवारी सुद्धा विवाहित महिलांनी केस धुवू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. त्याच बरोबर अविवाहित महिला किंवा मुलींनी सुद्धा ह्या दिवशी केस धुवू नये.
बुधवार: बुधवार ह्या दिवशी विवाहित किंवा अविवाहित महिला, मुली किंवा पुरुष सर्वजण केस धुवू शकतात. त्यामुळे घरात धन-समृद्धी येवून व्यापारात वृद्धी होते.
गुरुवार: गुरुवार ह्या दिवशी कोणी सुद्धा म्हणजे विवाहित-अविवाहित महिला अथवा पुरुष केस ह्यांनी केस धुवू नये जर धुतले तर आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते.
शुक्रवार: शुक्रवार ह्या दिवशी केस धुणे सर्वात शुभ मानले जाते कारणकी शुक्रवार हा दिवस लक्ष्मी माताचा आहे व त्याच बरोबर शुक्र देवची कृपा मिळते. धन संपत्ति प्राप्त होते त्याच बरोबर सुंदरता मध्ये वृद्धी होते.
शनिवार: शनिवार ह्या दिवशी केस धुतले नाही पाहिजे खास करून विवाहित महिलांनी त्यामुळे शनिदेव नाराज होतात.
रविवार: रविवार हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून सर्वजण शांपु लाऊन केस धुतात पण विवाहित महिलांनी केस धुवू नये.
तसेच अमावस्या, पूर्णिमा किंवा एकादशी ह्या दिवशी सुद्धा विवाहित महिलांनी केस धुवू नये. तसेच गुरुवारी कोणी सुद्धा केस धुवू नये.
(Disclaimer: ह्या लेखात दिलेली माहिती ही फक्त आपल्याला माहिती साठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.